मेळघाटातील जंगलामध्ये ६० पेक्षा जास्त वाघ आहेत. याचबरोबर या भागात अनेक विविध प्रकारचे जंगली प्राणीसुध्दा आहे. मेळघाटाला मध्यप्रदेशची सीमा लागून असल्याने मध्यप्रदेशासह इतर राज्यातील शिकारी टोळ्या मेळघाटात सक्रिय झालेल्या आहेत. वनविभाग राज्य राखीव दल व पोलीसांच्या नजरा चुकवून शिकारी घनदाट जंगलातील छुप्या मार्गाने येऊन मेळघाटात आणि जंगलातील शेकडो प्राण्यांची शिकार करतात. जंगली प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरे लावलेले आहे. प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कॅमेरे प्राण्यांच्या हालचालीचे स्थळ, पानवठ व पाण्याचा स्त्रोत असलेल्या ठिकाणी जमिनीपासून साधारणत: दोन फुट उंचावर लावण्यात येतात. प्राणी कॅमेऱ्यापासुन गेला की त्याचे चलचित्र टिपले जाते. मात्र, जंगलात लाकूड वेचणारे व शिकारी ट्रॅप कॅमेरे दिसले की फोडतात, नाही तर लंपास करतात. कित्येकदा अशा कॅमेरामध्ये मनुष्यांचे पायापर्यंतचे चित्र टिपले गेले आहे.
वनविभागाजवळ अत्यल्प मनुष्यबळ असल्यामुळे जंगलातील कानाकोपऱ्यामध्ये लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे शिकाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून हे अत्याधुनिक कॅमेरे जंगलामध्ये एका विशिष्ट उंचीवर कुणाला दिसणार नाही असे बसविण्यात येणार आहे. मेळघाटात पहिल्या प्रयोगादरम्यान सुमारे २० कॅमेरे बसविण्यात येणार आहे. प्रत्येक कॅमेरा जंगलातील ३० मीटर अंतरावर वर्तुळ आकारात लक्ष ठेवणार आहे. या कॅमेऱ्याची चित्रीकरण साठवण्याची क्षमता ८ जीबी आहे.
कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जंगलामध्ये विशिष्ट प्रकारच्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. संबंधित तज्ज्ञ वेळोवेळी साठवलेल्या चित्रीकरण तपासणी दरम्यान शिकार करतांना कुणी दिसले तर त्याला जेरबंद करण्यास मोलाची मदत होईल.
No comments:
Post a Comment