या क्रीडा प्रबोधिनीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करणे हा असल्याने राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहे.
या प्रबोधिनीत क्रीडा प्रशिक्षण, अत्याधुनिक क्रीडा सुविधा, मोफत शालेय शिक्षण, निवासाची सोय. वैद्यकीय सुविधा, सकस व पौष्टीक आहार मोफत दिला जातो.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी श्री. बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रायगड जिल्हा क्रीडा प्रबोधिनीच्या उपक्रमासाठी ठराव करुन घेऊन आर्थिक तरतूद केली.
भारतीय खेळाचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्ह्यातील २२८ केंद्रातील केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना क्रीडा प्रज्ञा शोध चाचण्यांची माहिती दिली व गुणांकन तक्ता समजावून सांगितला. क्रीडा प्रबोधिनीत निवडण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवडीची पद्धत तपशिलवार सांगण्यात आली.
त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातील गटसंमेलन आयोजन करुन सर्व शाळेतील शिक्षकांना माहिती देऊन विद्यार्थी निवडण्यास सांगितले.
केंद्रीय स्तरावर ३०,००० विद्यार्थ्यांची बॅटरी ऑफ टेस्टची चाचणी तालुका स्तरावर घेण्यात आली. यात ८९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विभागीय स्तरावर पनवेल, महाड, अलिबाग व रोहा येथे चाचण्या घेऊन त्यातून २३० विद्यार्थ्यांची निवड केली.
जिल्हा स्तरासाठी जिल्हास्तरावर चाचणी घेऊन १२० विद्यार्थ्यांची निवड केली.
रायगड जिल्हा क्रीडा नैपुण्य चाचणीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी, पनवेल येथे ०९ फेब्रुवारी ते १३ मार्च पर्यंत ३० दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात क्रीडा मार्गदर्शन, सकस आहार, निवासाची उत्तम सोय, शिक्षण व इतर सुविधा मुलांना देण्यात आल्या.
दादोजी कोंडदेव क्रीडांगण, ठाणे येथे विभागीय स्तरावर क्रिडा प्रबोधिनीच्या नैपुण्य चाचण्या पार पडल्या.
कोकण विभागातील ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी व सात महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ६४ नैपुण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.त्यापैकी ५९ मुलांची निवड झाली.
यातील काही निष्णात व चुणचुणीत २५ मुलांना संधी देऊन एकंदर ६४ मुलांना १९ मार्च ते २७ एप्रिल पर्यंत कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी, पनवेल येथे कॅम्प घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांना पुणे येथील बालेवाडी येथे क्रीडा प्रबोधिनीत पाठविण्यात येणार आहे.
क्रीडा प्रज्ञाशोध चाचण्या विद्यार्थ्यांची वजन, उंची, ३० मीटर भरधाव, खडी लांब उडी, मेडिसीन बॉल थ्रो, ६ x १० शटल रन, लवचिकता, उडी पोच, ८०० मीटर धावणे आदी ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या क्रीडा नैपुण्य चाचण्या घेण्यात येतात.
नऊ चाचण्यांसाठी प्रत्येकी तीन गुण असतात.
या २७ गुणांपैकी १७ किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या मुलामुलींची निवड होते.
३० मीटर भरधाव धावणे किंवा ८०० मीटर धावणे यापैकी एका चाचणीत तीनपैकी तीन गुण प्राप्त करणाऱ्या मुलामुलींची निवड होते.
कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी, पनवेल येथे रायगड क्रीडा प्रबोधिनी क्रीडा उपक्रमांर्तगत घेण्यात आलेल्या निवासी शिबिरात निरीक्षक म्हणून प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. एच.एच.खाडे, पनवेलचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती. मीना ह. यादव, केंद्रप्रमुख सर्वश्री रा.गो.पाटील, बबन म्हात्रे, क्रिडा समन्वयक श्री. जयेश पाटील व १४ शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment