Wednesday, April 4, 2012

सशस्त्र ध्वजदिन निधी अंतर्गत उपक्रम

परकीयांच्या आक्रमणाला चोख उत्तर देणारे आणि देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारे जवान धन्य आहेत. स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून अनेक वीर देशभक्ती व देशप्रेमापोटी वैयक्तिक, भौतिक सुखाचा त्याग करतात. संकटकालीन युध्दजन्य स्थितीत लढता लढता काही जणाना वीरगती मिळते तर काही निवृत्तीनंतर सुखरुप घरी परतात. खरोखरच या वीर जवानांच्या कार्याची दखल घेणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. यामुळेच सैन्यातून निवृत्त होणारे माजी सैनिक किंवा लढाईत शत्रूच्या हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान यांच्या कुटुंबाचे जीवन सुसहय करण्याच्या हेतूने सशस्त्र सेना ध्वज निधीच्या संकलनाव्दारे विविध कल्याणकारी उपक्रम शासनाच्या वतीने राबविण्यात येतात.

No comments:

Post a Comment