दुसरा दिवस
२१ सप्टे १९३२ रोजी मुंबईहून आलेले पुढारी सकाळीच
कारागृहात जाऊन गांधींची भेट घेतात. बाबासाहेबांचे मत गांधीपुढे मांडतात.
त्यावर गूढ व्यक्तिमत्व परत घोळ घालतो. शांत चित्ताने सगळं ऐकुन झाल्यावर गांधी
म्हणतात की विचार करुन सांगतो. ही गांधीची टिपिकल स्टाईल होती. कार्यकर्त्याना
शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रमात ठेवण्यात त्यांचा हतखंडा होता. सरदार पटेल व
सरोजीनी नायडू गांधीच्या सेवेत होतेच. गांधीची प्रकृती खालावत चालली होती.
तुरूंगाबाहेर गांधीवाद्यांचा जमावडा वाढला होता. सप्रूनी दुपारी फोन करुन
बाबासाहेबाना कळविले की लवकरात लवकर पुण्यास निघून यावे. गांधीची हालत खराब होत
आहे. ही तार मिळताच बाबासाहेब रात्रीची गाडी धरुन पुण्यास निघाले. आता
पुढचा सगळा खेळ पुण्यात खेळला जाणार होता.
दिवस-३
२२ सप्टे १९३२ रोजी सकाळी बाबासाहेब पुण्यात पोहचतात.
याच दिवशी गांधीजीनी डॉ. राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी याच्या सोबत विचार विनिमय
करुन पुढची स्ट्रॅटजी ठरविली. बाबासाहेबांच्या मागण्या काय आहेत हे तर मुंबईहुन
आलेल्या प्रतिनिधीनी आधीच सांगितले होते. आता त्यावर गांधीनी या दोघांसोबत बसुन
सखोल चर्चा केली व पुढचे पाऊल काय असेल ते ठरविले. “अस्पृश्य वर्गाच्या सर्व जागाना
निवडणुकीच्या प्राथमिक व दुय्यम पद्धती लागु करण्यात याव्या.” हे गांधीनी ठरविले.
बाबासाहेब पुण्यात पोहचले होते. नॅशनल होटेल मधे ते
उतरले होते. गांधींचे म्हणने बाबासाहेबाना कळविण्यात आले. गांधीवादी पुढारी मात्र
बाबासाहेबांवर दबाव आणण्याचे काम करु लागले. तणाव वाढत चालला होता. बाबासाहेबानी
मुकाट्याने ब्रिटिश पंतप्रधाना तार करुन दिलेले दोन्ही अधिकार (स्वतंत्र मतदार संघ, दुहेरी मतदानाचा अधिकार) रद्द करण्या
बाबत निवेदन दयावे अशी मागणी कार्यकर्त्यानी लावून धरली. थोडक्यात काय तर धाक
दाखवून मिळालेले अधिकार सोडावे ही गांधीवाद्यांची युक्ती. पण या सगळ्य़ा शेळ्या
मेंढ्याना भीक न घालणारा सिंह गरजून उठला. असल्या बुड शेंडा नसलेल्या मागण्या
करणा-या पुढा-यांपुढे डरकाडी फोडून बाबासाहे म्हणाले “माझ्या समोर पर्यायी
योजना आल्याशिवाय मी ब्रिटिश पंतप्रधानाना काहीच कळविणार नाही, मग काही झाले तरी
झेलायची आपली तयारी आहे.” बाबासाहेबांचा दृढ निश्चय व भीम
गर्जना इतकी प्रभावी अन भेदक होती की सर्व पुढा-यानी झटक्यात माघार घेतला.
आता सर्व पुढारी पर्यायी योजना दिल्याशिवाय बाबासाहेब ऐकणार नाही या मतावर आले.
पर्यायी योजना देणे आता परिहार्य झाले होते. बाबासाहे या मुद्यावर लढण्यास सज्ज
आहेत व सर्वोतोपरी युद्धाची सिद्धता करुन आले आहेत हे कळताच गांधीवादयानी मवाळ
भूमिका घेतली.
दुपार पर्यंत वातावरण अत्यंत तापले होते. जयकर, सप्रू, पी.
बाळू व एम. सी. राजा यानी दुपारी गांधीजींची भेट घेऊन समेट घडवून आणण्याची खात्री
दिली.
याच दिवशी संध्याकाळी बाबासाहेब गांधीजीना भेटण्यास
तुरुंगात गेले. त्यांच्या सोबत जयकर, बिर्ला, चुनीलाल मेथा
व राजगोपालाचारी होते. गांधींची प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती. ते मृत्युच्या
देशेनी बरेच पुढे निघून गेले होते. त्यांची हि अवस्था पाहून बाबासाहेबांचे हृदय
द्रवेल व ते आपला निर्णय लगेच जाही करतील असा गांधीवादयांचा अंदाज होता. बाहेर
गांधीवादयांनी बाबासाहेबांच्या विरोधात गगनभेदी आरोळ्यानी आकाश दणाणून सोडले होते.
या घोंघवत्या आवाजात बाबासाहेबांचा हट्ट विरघळून जाईल अशी सगळ्याना आशा होती.
परंतू झाले उलटेच.... युगानूयुगे गुलामीत जगणा-यांच्या अधिकारावर घाला घालणारे
गांधी दिसताच बाबासाहेब अधिक दृढ निश्चयी व कठोर बनतात. आपल्या बांधवांच्या
हक्कासाठी सर्वतोपरी लढा देणारे बाबासाहेब मनोधैर्य एकवटून म्हणतात, “गांधीजी तुम्ही माझ्यावर अन्याय करित आहात. तुम्हाला
काही झाले तर काहीच कारण नसताना मला दोषी ठरविण्यात येईल. तुमचे प्राण आम्हाला
महत्वाचे आहेत. पण आमचे अधिकारही तेवढेच महत्वाचे आहेत.” तेंव्हा गांधी
म्हणतात, “डॉक्टर, तुम्ही
सुचविलेली पॅनलची पद्धती मी मान्य करतो. पण तुम्ही तुमचे दोन्ही अधिकार सोडून
दयावे अन ही पॅनलची पद्धती सर्व आरक्षित जागांवर लागू करावी.” बाबासाहेबानी गांधीची ही सुचना
मान्य केली. मुलाखत संपली पण आता ईतर पुढा-यांसोबत पॅनलमधे
किती उमेदवार असावेत, प्रत्येक प्रांतात अस्पृश्याना किती
राखीव जागा दयाव्यात, प्राथमिक निवडनुकीची पद्धत किती
वर्षे चालवावी, राखीव जागांची सवलत किती वर्षे असावी अशा
अनेक मुद्यांवर चर्चा करण्यास सुरुवात झाली.
No comments:
Post a Comment