मनोहर भिडे यांनी छत्रपती संभाजी
महाराज यांचे संभाजी हे नाव धारण करून झालेले संभाजी भिडे जर मनुस्मृतीची पुन्हा
एकदा अमलबजावणी करा म्हणून जाहीर सांगत असतील तर हाच खरा देशद्रोह आहे.महात्मा
ज्योतिबा फुले यांनी समतावादी छत्रपती शिवरायांचे दर्शन आम्हाला देऊन समतेचे
स्वराज्य दाखविले अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना जर हाच मनोहर भिडे देशद्रोही
म्हणत असेल तर हा संभाजी भिडे स्वराज्यद्रोही आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतले
पाहिजे.असा देशद्रोही व स्वराज्यद्रोही जर पुन्हा एकदा भीमा कोरेगावचे निमित्त
साधून स्वराज्याच्या अलुतेदार व बलुतेदार यांच्यावर हल्ला करीत असेल तर अशा
व्यक्तीचे संभाजी नाव काढून त्याला देशद्रोही आणि स्वराज्यद्रोही ठरवून तुरुंगात
डांबून टाकले पाहिजे.अशी असणारी खरी परिस्थिती असताना जर केवळ या देशाचे
प्रधानमंत्री श्री मोदी यांचे संभाजी भिडे गुरु आहेत म्हणून त्यांना क्लीन चीट
देणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडवणीस सुध्दा दोषी आहेत अशी असणारी
परिस्थती आहे.अलुतेदार आणि बलुतेदार यांचे हे राज्य चालवीत नसून मनुवादी
व्यवस्थेचे राज्य चालवीत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.छत्रपती संभाजी
महाराज यांचा सत्य इतिहास रयतेसमोर येऊ नये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन
केलेली मनुस्मृती पहाता हे राज्य साविधांनाचे आहे याची सल वारंवार या मनुवादी
व्यवस्थेला होत आहे.हीच मनुवादी व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश
आंबेडकर यांना बदनाम करून अलुतेदार व बलुतेदार यांच्या पासून तोडण्याचे हे एक
मनुवादी षड्यंत्र आखीत आहे. म्हणून प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहेत असा प्रचार
करण्याचा प्रयत्न जोरात सुरु झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.एखादी खोटी
गोष्ट १०० वेळा बोलली की,ती खरी वाटायला लागते त्यामुळे ही खोटी गोष्ट पोलिसांच्या
माध्यमातून जनते समोर पोहचविण्याचा डाव या मनुवादी षडयंत्राने आखला आहे.पुणे
शहराचे सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र कदम यांचे माध्यमातून एक वातावरण निर्माण
करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.आता प्रश्न असा आहे की,या रवींद्र कदम यांना डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू श्री प्रकाश आंबेडकर हे नक्षलवादी आहेत असे सांगायला कोण लावले
आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.यल्गार परिषद कोण
भरविली..? त्याला निधी
कोणी दिला...? हे
सर्वांना माहित आहे.असे असताना जर एकटेच प्रकाश आंबेडकर जर टार्गेट होत असतील तर
हे मनुवादी षड्यंत्र आखले गेले आहे असे आपल्याला मान्य करावेच लागेल.कारण या
मनुवादी व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला १०० वर्ष
पूर्ण होऊ द्यायची नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.भारत देशाची राज्यघटना बदलणे
हेच “एकमेव ध्येय” या मनुवादी व्यवस्थेचे असल्यामुळे आणि या राज्यघटनेचे संरक्षणार्थ
एकमेव प्रकाश आंबेडकरच आहेत हे मनुवादी व्यवस्थेच्या लक्षात आलेले आहे.त्यामुळे “नक्षलवादी”
म्हणून प्रकाश आंबेडकर यांना बदनाम केल्यास विरोध करणारा कोणीही व्यक्ती शिल्लक
रहात नाही.पुढील काळात भारताचे संविधान बदलणे हाच एकमेव उपक्रम मनुवादी व्यावस्थेचा
असून प्रकाश आंबेडकर यांना “नक्षलवादी”
म्हणणे ही एक नांदी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या मनुवादी व्यवस्थेचे काही रमणाधारी
लोक आपल्या चळवळीमध्ये आहेत हे विसरून चालणार नाही.त्यामुळे जर स्वतंत्र भारताला
संविधान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी
नक्षलवादी आहे...!
होय मी नक्षलवादी आहे.....!
१ छत्रपती शिवरायांचे स्वराज्य
पुर्नस्थापित करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर
होय मी नक्षलवादी आहे...!
२ छत्रपती शिवरायांचे समतावादी स्वराज्य
दाखविणारे महात्मा फुले यांना गुरु मानणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
३ जातीवादी पेशवाईचा अंत करून
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचे सरदार
सिद्धनाक महार यांची शौर्य गाथा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ दाखविणारे डॉ
बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
४ चवदार तळ्याचा सत्याग्रह करून
अस्पृश्यांना न्याय देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर
नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
५ चातुवर्ण व्यवस्थेचे प्रतिक
मनुस्मृती दहन करून मनूच्या विळख्यातून मानवाला मुक्त करणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी
आहे...!
६ छत्रपती राजश्री शाहू महाराज जर डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करीत असतील अशा डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी
आहे...!
७ भारतीय रिजर्व्ह बँक ज्या
व्यक्तीच्या आभ्यासावर स्थापन झाली अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
८ संपूर्ण मागासलेल्या लोकांचे
गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
९ स्वातंत्र भारताला अशोक स्तंभ देऊन
भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१० स्वातंत्र भारताचा ध्वज स्वराज्याचा
भगवा ध्वज असावा म्हणून आग्रही राहणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
११ स्वातंत्र भारताच्या तिरंग्यामध्ये
अशोक चक्र देऊन भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१२ स्वातंत्र भारताच्या प्रत्येक
नागरिकांना मुलभूत हक्क व अधिकार देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१३ स्वातंत्र भारताला शांततेचा
मार्ग जगातला पहिला धर्म बौध्द धर्म दाखविणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
असेच आहे आणि
असेच असेल तर..........होय मी नक्षलवादी आहे...! होय मी नक्षलवादी आहे...!! होय मी
नक्षलवादी आहे...!!!
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी
समाज
श्री भिडे गुरुजी यांच्या ज्योतिबा फुले हे देशद्रोही होते या मताशी मी बिलकुल सहमत नाही ते अत्यंत मोठे देशभक्त होते फक्त त्यांचा देश इंग्लंड असावा १) ज्योतिबा फुले आपल्या मृत्युपत्रात आपल्या यशवन्त नावाच्या दत्तक मुलास उपदेश करतात "आपल्याला तारणाऱ्या इंग्रज सरकारच्या हरेक कामी उपयोगी पडण्याकरिता आपल्या जिवाकडे पाहू नये " (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय 3ri avrutti पान न ५२२ मृत्युपत्राचे पान न ६/८ ) इंग्रज सरकारसाठी आपला जीव सुद्धा देण्यास कमी करू नकोस असे आपल्या मृत्युपत्रात लिहिणारे फुले हे केव्हढे मोठे देशभक्त होते
ReplyDelete२)ज्योतिबा फुले आपल्या इशारा या पुस्तकात लिहितात (संदर्भ म फुले समग्र वैङ्मय ३ री आवृत्ती पान न ३३०/३३१) " सर्वशक्तिमान जो परमेश्वर याने कनवाळू होऊन आपले दुःख्खानी पीडित अशा शूद्रादि अतिशूद्र प्रजेस परमन्यायि ,हितावह ,सौख्यकारक ,सदाचारी ,आणि शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अमलाखाली प्राप्त करवून दिले .सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे व त्यास रात्रंदिवस अशी प्रार्थना करीत आहे कि "हे प्रभो ,अहमस हे राज्य चिरकाल असू दे " इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानवर चिरकाल असू दे आणि हे राज्य हिंदुस्थानवर आल्याने भारतातील लोक ईश्वराचे फार ऋणी आहेत असे लिहिणारे फुले केवढे मोठे देशभक्त आहेत फक्त त्यांचा देश इंग्लंड असावा याचा अर्थ फुले हे इंग्लड देशाचे फार मोठे देशभक्त होते त्यामुळे श्री भिडे गुरुजी यांच्या ज्योतिबा फुले हे देशद्रोही होते या मताशी मी बिलकुल सहमत नाही
"ज्योतिबा फुले यांनी समतावादी छत्रपती शिवरायांचे दर्शन आम्हाला देऊन समतेचे स्वराज्य दाखविले " असे हे राजेश खडके वर लिहितात याबद्दल फुले शिवरायांबद्दल काय लिहितात ते पाहूया म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत
ReplyDelete"आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते "
फुले पुढे लिहितात
"शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही "
याउलट शिवरायांनी ब्रह्मन् समाजासाठी आपले राज्य स्थापन केले आणि शिवरायांच्या काळात शूद्र अतिशुद्रांची स्तिथी मुसलमानांच्या काळात जी स्तिथी होती त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती शिवरायांच्या राज्यात झाली असे हे ज्योतिबा फुले म्हणतात यात समता कुठे आली बरे खडकेसाहेब
भारतीय राज्यघटना हि एक नवी मनुस्मृती आहे घटनेच्या Preamble मध्ये कोणत्याही भारतीय माणसाबरोबर धर्म जात लिंग भाषा आणि जन्माचे ठिकाण यामुळे कोणताही भेदभाव करता येणार नाही असे लिहिले आहे आणि हिंदूंसाठी वेगळे कायदे आहेत तर मुसलमानसाठी वेगळे कायदे आहेत जर एखाद्या हिंदूने दोन स्त्रीयनबरोबर लग्न केले तर त्याला शिक्षा तर मुस्लमानाने केले तर त्याला शिक्षा नाही हिंदू पुरुषाला आपल्या बायकोला घटस्फोट द्याचा झाला तर त्याला बऱयाच अटी आहेत आणि कोर्टात जावे लागते आणि तो दीर्घकाळनंतर मंजूर होतो आणि घटस्फोट घेतल्यावर त्या स्त्रीच्या चरितार्थासाठी पोटगी द्यावी लागते त्यांच्या मुलाची कस्टडी कोणाकडे हा निर्णय न्यायाधीशावर अवलंबून असतो मुसलमानाला मात्र तीन वेळेस तलाक म्हंटले कि घटस्फोट देता येतो शिवाय लग्नाच्या वेळेस घेतलेला मेहेर परत केला कि झाले, पोटगी द्याची आवश्यकता नाही आणि मुलांची कस्टडी पुरुषाकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,आणि इतर मागासवर्गीय जाती याना विशेष अधिकार दिलेले आहेत एकाद्या दलिताचा उल्लेख दलितेतर माणसाने जातीवरून केला तर त्याला शिक्षा आणि नुसती तक्रार केली कि पोलीस कस्टडी आणि त्याला जामीन पण मिळत नाही पण तोच दलित ब्राह्मणाला जातीवरून कितीही शिव्या देऊ शकतो त्याला काही शिक्षा नाही दलिताला शिक्षणात विशेषाधिकार नोकरीत विशेषाधिकार आणि राजकारणात विशेषाधिकार आहेत आणि भारतात काश्मीरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी स्वतंत्र ३७० कलमाद्वारे विशेष अधीकार दिलेले आहेत त्यामुळे काश्मिरी माणूस भारतात इतर ठिकाणी जाऊन राहू शकतो मालमत्ता खरेदि करू शकतो पण काश्मीर सोडून इतर ठिकाणी राहणाऱ्या माणसाला मात्र काश्मीरमध्ये जाऊन मालमत्ता खरेदी करता येत नाही हि नवीन मनुस्म्रीती आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंद्र राज्य विधयेकावरून २ सप्टेंबर १९५३ रोजी राज्यसभेत केलेले भाषण
ReplyDelete:" आपण परंपरेचा वारसा घेतला आहे .लोक मला एकसारखे म्हणतात कि ,अहो तुम्ही तर घटनेचे शिल्पकार ! माझे त्यांना उत्तर असे आहे कि ,मी भाडोत्री लेखक होतो .जे मला करायला सांगितले होते ते मी माझ्या मनाच्या विरुद्ध केले महाराज लोक मला म्हणतात ,मी राज्यघटना केली परंतु माझी असे म्हणायची तयारी आहे कि राज्यघटना प्रथम मीच जाळून टाकेन .मला ती नको आहे ती कोणाच्या सोयीची नाही मला परवानगी मिळाली तर सर्वप्रथम मी हे संविधान जाळून टाकेन " ( संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेखक धनंजय किर चौथी सुधारित आवृत्ती सातवे पुनर्मुद्रण पान न ४९८ व ४९९)
बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ भाग ११ वा संपादक चां भ खैरमोडे पान न ३०
बाबासाहेबानी केलेले पुणे येथे लोकशाही या विषयावर केलेलं भाषण
"चौथी संजीवनी म्हणजे संसदीय नीतिमत्ता आणि सारासार विचार यांचे काटेकोर पालन करणे .आपल्या राज्यघटनेबद्दल बरीच लोकांना आदराचे उमाळे येतात .मला तसले उमाळे येत नाहीत . ती घटना रद्द करावी निदान तिच्यात खूप फेरबदल घडवून आणावेत ,असे मला वाटते .कारण आपल्या घटनेत कायदेशीर हक्कांचे अवडंबर माजविले आहे "
बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ भाग ११ वा संपादक चां भ खैरमोडे पान न ४३
"राज्यसभेत आंद्र राज्य विदेयकावर बोलताना बाबासाहेब म्हणतात "घटना व प्रांत तयार करताना काँग्रेस पक्षापुढे दराफ्टिंग कमिटीला मुठीत नाक धरून नांवे लागले ,आणि आपणालाही इच्छेविरुद्ध काँग्रेसला हवी तशी घटना तयार करणे भाग पाडले .गाडीला जुंपलेल्या घोडयांपेक्षाही आपल्याला सदर कमिटीत जास्त महतव नव्हते .अशा परिस्तितीत तयार करण्यात आलेली घटना कोणाच्याही हिताची नाही .आणि असली घटना जाळावयाची ठरले तर प्रथम त्या घटनेला मी आग लावेन "
सदरचा चरित्र ग्रंथ इंटरनेट वर उपलब्द असून https/msblc.maharashtra.gov.in/pdf असे गूगल वर जाऊन टाइप करा म्हणजे हा ग्रंथ वाचा येईल
तेव्हा हि सर्व घटना पूर्णपणे बदलून बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा लोकांनी पूर्ण करावी आणि घटनेच्या Preamble मध्ये कोणत्याही भारतीय माणसाबरोबर धर्म जात लिंग भाषा आणि जन्माचे ठिकाण यामुळे कोणताही भेदभाव करता येणार नाही आणि याला कोणताही अपवाद करता येणार नाही हे पाहणे आपले कर्तव्य आहे