विषय असा आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेची लढाई
सुरु केली होती तिकडे ब्रिटीश सरकारने भारताला स्वातंत्र देण्यासाठी औपचारिक घोषणा
केली होती.मात्र स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे स्थान काय...? असा प्रश्न डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.यासाठी
ब्रिटीश सरकारने स्वतंत्र भारताचे प्रश्न जाणून घेण्यासाठी १९२७ मध्ये सर जॉन
सायमन यांचे अध्यक्षतेखाली सायमन कमिशनची स्थापन केली होती.त्यासाठी सायमन कमिशन
भारतात येणार होते परंतु या कमिशनला विरोध करण्यात आला.तरीही सायमन कमिशन भारतात
येऊन त्यानी त्यांचा अहवाल ब्रिटीश सरकारकडे जमा केला.याच आधारे ब्रिटीश सरकारने
भारताला स्वतंत्र देण्यासाठी तीन गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.पहिल्या दोन परिषदा
या १९३१ मध्ये आयोजित केल्या होत्या आणि तिसरी गोलमेज परिषद १९३२ मध्ये आयोजित केलेली
होती.पहिल्या गोलमेज परिषदेचे मुस्लिम लीगचे मौलाना मोहम्मद अली जौहर, मोहम्मद शफी, आगा खान, मोहम्मद अलि जीना,मोहम्मद ज़फ़रुल्ला खान, ए के फजलुल हक हे होते...तर हिंदू
महासभेच्या वतीने बी.एस.मुंजे
आणि एम. आर. जयकर होते..तर उदारवादी तर्फे तेज बहादूर सप्रू,सी. वाय. चिंतामणि आणि श्रीनिवास शास्त्री होते तर...शिखांच्या वतीने सरदार उज्जल सिंह
होते.तर केथोलिक खिश्चन यांचे वतीने ए.
टी. पन्नीरसेल्वम होते...तर
अस्पृश्यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते.तर संस्थानिक अक़बर हैदरी (हैदराबाद के दीवान), मैसूर
के दीवान सर मिर्जा इस्माईल ग्वालियर चे कैलाश नारायण हक्सर, पटियाला चे महाराजा भूपिंदर
सिंह, बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड़ तृतीय, जम्मू
आणि कश्मीर चे महाराज हरी
सिंह,
बीकानेर चे महाराजा गंगा सिंह, भोपाळ चे नवाब
हमीदुल्ला खान, नवानगर के के. एस. रणजीतसिंहजी,
अलवर कचे महाराज जय सिंह प्रभाकर आणि इतर काही उपस्थित होते.याच परिषदेत डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यासाठी वेगळ्या प्रतीनिधीत्वाची मागणी केली. आणि मोहन
करमचंद गांधी विरुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात संघर्षाचा वादाची ठिणगी पडली पहिल्या
गोलमेज परिषदेमध्ये....आणि सुरु झाली डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांची बौध्द धर्माकडे वाटचाल...!(क्रमश😊
No comments:
Post a Comment