Wednesday, June 13, 2018

(भाग – ३६) जसे छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यात बदनाम करण्यात आले त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्यात आले होते...!


विषय असा आहे की,जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर चळवळीचे नेतृत्व त्यांचेकडे जाणे गरजेचे होते आणि ते आवश्यकही होते.असे असताना शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे नेतृत्व यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचेकडे जाणे आवश्यक होते.जरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना भारतीय रिपब्लिकन पक्षाची होती असे जरी मानले तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे रुपांतर भारतीय रिपब्लिकन पक्षात करून त्याचे नेतृत्व त्यांना का देण्यात आले नाही असा माझा प्रश्न आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजहित लक्षात ठेऊनच निस्वार्थ भावनेने कार्य केले.मग ही भावना लक्षात ठेऊन समाजातील इतर नेतृत्वाने समाजाचे एकसंघ नेतृत्व यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या हातात का नाही दिले.ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय करण्याकडे लक्ष दिले.परंतु याबाबत समाजामध्ये धुसफूस चालूच होती याची खबर काही लोकांना लागली यातच ही बाब जेव्हा बी.सी.कांबळे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यानी राजगृहाचा मुद्दा उपस्थित केल्याचे चळवळीच्या प्रामणिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. डॉ सविता कबीर यांनी राजगृहाचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून कोर्टात मध्ये केस दाखल केली होती.परंतु समाजाची भावना जेथे जुडली आहे असे “राजगृह” समाजाच्या ताब्यात असावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना वात होते म्हणून त्यांनी त्या केसच्या विरोधात जाऊन न्यायालाकडे अशी विनंती केली की त्या राजगृहाच्या बदल्यात जी रक्कम असेल तर ती मी देण्यास तयार आहे.या बाबी समाजा समोर आल्या पाहिजेत आजही हा त्रास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला भोगाव्या लागत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आजही समाजात रत्नाकर गायकवाड सारखे लोक अजगरा सारखे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे संपविण्याचे कटकारस्थान करीत आहेत.तेव्हा कोर्टाने जी रक्कम द्यायला सांगितली डॉ सविता कबीर यांना द्यायला सांगितली तेवढी रक्कम गोळा करण्यासाठी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत फिरावे लागले.तेव्हा आजही आपल्यला ते “राजगृह” पाहिला मिळत आहे हे आपण लक्षात का घेत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांनाही आपल्याच लोकांकडून खूप त्रास झाला आणि त्यांच्या मुलालाही आपल्याच लोकांकडून खूप त्रास झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आणि आजही त्यांच्या नातवांना असाच त्रास होताना आपण पहात आहोत.त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र होताना दिसत आहे.जसे छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यात बदनाम करण्यात आले त्याच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्यात आले होते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment