डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या १९२० पासून ते १९३५
पर्यंत संपूर्ण कार्याचा आढावा घेतला तर स्पष्टपणे असे लक्षात येथे की,त्यांनी सिंधू संस्कृतीला कोठेही विरोध केलेला नाही याउलट
सिंधू संस्कृतीतील सभ्यता काय आहे हे साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.त्यानी कधीही
आर्य – वर्णाश्रम धर्म – वैदिक धर्म – सनातनी धर्म – हिंदू धर्माला मान्यता दिलेली
नाही.शुद्रातून अति शुद्र म्हणून अस्पृश्य कसे झाले...? यावर प्रकाश टाकलेला आहे.छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि शंभूराजे
यांची समता पुढे आणण्याचे कार्य केले आहे.चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून
छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा घात कसा झाला हे दाखविण्याठी त्यानी रायगडाच्या
परिसरात मनुस्मृतीचे दहन केले.सनातनी मराठ्यांचा विरोध स्वराज्याला किती मोठ्या
प्रमाणात होता हे दाखविण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे.जेव्हाही मानवा कल्याणाचा
बाब पुढे येते तेव्हा सनातनी कसे जागरूक होऊन एकसंघ होऊन आपल्यातील व्यक्ती कसे
फोडतात हे दाखविण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे.याठिकाणी फरक एकच दिसतो की,छत्रपती शिवाराय व शंभूराजे यांच्या तलवारी मध्ये सिंधू
संस्कृती होती तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणात व कार्यात सिंधू संस्कृती
होती हे आपल्याला दिसून येते.त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी मानव कल्याणच
दिसून येते जसे छत्रपती शिवराय व शंभूराजे यांच्या कार्याचा इतिहास महात्मा फुले
यांनी जागरूक केलेला आहे तसा मनुवादी व्यवस्था किती भयानक होती व आहे याचे
प्रत्यक्ष दर्शनच १९२० पासून ते १९३५ पर्यंतच्या काळातून डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी आपल्याला
दाखविलेले आहे.(क्रमश😊
No comments:
Post a Comment