Wednesday, June 13, 2018

(भाग – ३५) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मृत्युच्या अहवालाची मागणीसाठी २० वर्ष झाले आंदोलन....! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी जर दिल्लीत असती..तर मोहन गांधी यांचे स्थान कमी झाले असते...!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या काळचे विधी तज्ञ बी.सी.कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू अहवालाची लगेच सरकारकडे मागणी केली.यावरून सगळ्या समाजाचे लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घातपात झाला की काय....? असा प्रश्न पडला.साहजिकच आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर व चंद्रपूर येथील धम्म दीक्षेचा कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधून काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर बुध्द आणि कार्ल मार्क्स  या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये  दोन भाषणे दिली.दिल्लीमध्येही विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे प्रकरण लिहून पूर्ण केले.याचा अर्थ ते तंदुरुस्त होते असे असताना त्यांचा रात्री १२.१५ मिनिटांनी महापरिनिर्वाण होते ही बाब संशयित होती.मग त्यांच्या मृत्यूचे कारण काय आणि दोषी कोण...? असा प्रश्न उपस्थित करून आता समाज रस्त्यावर येऊन बी.सी.कांबळे यांच्या पाठीशी उभा राहिला.या मृत्युच्या अहवालाची मागणी एक विधी तज्ञ करतात म्हणून भावनिक झालेला समाज बी.सी.कांबळे यांच्या पाठीशी उभा राहिला खरा पण याबाबत राजकारण सुरु होते याचे समजाला आकलन झाले नाही.परंतु याच काळात समाजाची धुरा कोणी हाती घ्यायची असा प्रश्न कोणीही उपस्थित केला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली चळवळीचे नेतृत्व कोणी करायचे असा प्रश्न उपस्थित कोणी केला नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेची आखलेली गणित कोणी सोडावयाची असा प्रश्न कोणी केला नाही.बौध्द धर्माची वाटचाल पुढे काय असेल असा कोणी प्रश्न केला नाही.कारण समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवालात अडकविले गेले.ज्या व्यक्तीने आपल्या विद्वत्तेच्या जोरावर भारतातील प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळवून दिला.भारत देशाचे नाव संपूर्ण जगात रोषण केले अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी दिल्ली मध्ये का नाही असा प्रश्न कोणी उपस्थित केला नाही.ज्या महामानवाचे कार्य दिल्लीत येणाऱ्या संपूर्ण राज्यातील समाज घटकासाठी असताना त्यांना महाराष्ट्र पुरते मर्यादित का ठेवण्यात आले असा प्रश्न कोणी उपस्थित केला नाही.जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जर समाधी दिल्लीत असते तर प्रत्येक व्यक्तीला त्यांचे दर्शन घ्यावे लागले असते.जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी जर दिल्लीत असती तर राजघाटावरील मोहन गांधी यांचे स्थान कमी झाले असते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment