राजा-मुंजे करार (फितूरी आपल्याच माणसाची)
बाबासाहेब जीवाचं रान करुन
जेंव्हा लोथियन समितीसोबत देशाचा दौरा करुन स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी
मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते तेंव्हा एक अत्यंत
महत्वाचा अस्पृश्य नेता फोडण्यात हिंदु महासभा आघाडी घेते. सावरकरांच्या
प्रभावाखाली चालणारी हिंदु महासभा त्या काळात बाबासाहेबांच्या बाजूनी होती
असे ब-याच ठिकाणी जाणवते. पण डॉ. मुंज्यानी मात्र यावर बोट उचलण्यास भाग
पाडणारी फितूरी घडवून आणली. जेंव्हा बाबासाहेब गोलमेज-२ गाजवत होते तेंव्हा
गांधीनी "मीच एकमेव अस्प्रुश्यांचा नेता आहे" म्हणून जो काही संभ्रम
निर्माण केला होता व ब्रिटिसांचा गोंधळ उडवून दिला होता. तो संभ्रम दूर
करण्यासाठी इकडे भारतात मोठी चळवळ उभी केली गेली. त्या चळवळीचा नेता होता
राजा. ज्या राजानी इकडे भारतात रान पेटवुन दिलं होतं अन बाबासाहेब हेच
एकमेव अस्पूश्यांचे नेते असल्यांचा तारांचा वर्षाव पाडून गांधीचे मुखवटे
फाडले अशा कर्तव्यनीष्ठ राजाला नेमक्यावेळी मुंज्यानी फोडून आपल्या गोटात
खेचले व बाबासाहेबांच्या पवित्र कामात विघ्न उभे केले. या सर्व
घडामोडींच्या मागे सावरकरांचा हात होता हे निर्विवाद सत्य आहे. आज पर्यंत
जो राजा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ मिळावा म्हणून लढत होता तो अचानक
सूर बदलून वेगळा राग आवळायला लागला. त्यानी अचानक आपला पवित्रा बदलला अन
अस्पूश्याना संयुक्त मतदार संघ व राखीव जागा मिळाव्यात अशी मागणी करण्याचा
करार फेब्रुवारी १९३२ मधे मुंज्यांशी केला. यालाच आंबेडकरी चळवळीच्या
इतिहासात राजा-मुंजे करार म्हणून ओळखले जाते. हा प्रकार ऐकुन बाबासाहेब
मात्र अत्यंत अस्वस्थ झाले, क्रोधीत होऊन हिंदु महासभेच्या कूटनितीचा निषेध
नोंदविला. पण ईकडे सावरकर अन मुंजे मात्र संघटना फोडल्याचा आनंद साजरा करत
होते. सावरकरानी अस्पृश्यनिवारणाचे काम चालविल्याचा इतिहास आहे. पण
त्यामागची भूमिका काय होती कोणी तपासुन पाहिले नाही. खोलात गेल्यावर हे
कळते की बाबासाहेबांच्या कामात विघ्न निर्माण करण्यासाठी काही अस्पृश्य
नेते सोबत असणे गरजेचे होते. त्यामुळे सावरकर अस्पृश्य निवारणाचा आव आणत
होते. राजा-मुंजे करार झाल्यावर राजा कुठे शांत बसतो, त्यानी लगेच ब्रिटिश
पंतप्रधानाला तार करुन कळविले की बाबासाहेब हे सर्व अस्पृश्यांचे नेते नसून
ते एका लहानशा गटाचे नेते आहेत. आहे की नाही गंमत... जो राजा काही
दिवसाआधी बाबासाहेब हेच अस्पृश्यांचे एकमेव नेते आहेत म्हणून ब्रिटीशांकडे
तारांचा वर्षाव करतो आता तोच नेता अगदी उलटं वागू लागला. राजाच्या उचापत्या
सुरु होते तेंव्हा तिकडे बाबासाहेब मात्र समिती सोबत व्यस्त होते.
राजा-मुंजे करार झाला ही गोष्ट देशभर पसरली व राजाच्या विरोधात अस्पृश्य
समाजातून एक लाट उसळली. पुर्वेकडील सर्व अस्पृश्य नेत्यानी या कराराचा
निषेध केला. सावरकरांची कूटनिती उघड झाली. बाबासाहेब मात्र मताधिकार समिती
सोबत काम करण्यात गढून गेले होते. राजानी नसता उपद्रव करुन बाबासाहेबांचा
ताप वाढवून ठेवला होता. याच वेळी तिकडे नाशिकची चळवळ जोर धरत गेली अन
भाऊराव गायकवाड व रणखांबे याना अटक झाली. अशा प्रकारे अनेक अडचणीना तोंड
देत बाबासाहेब आपला लढा चालवित होते. याच दरम्यान भारतातील खास करुन पुर्व
भारतातील अस्पृश्यानी अनेक परिषदा भरवुन बाबासाहेबाना पाठींबा दिला. १ मे
१९३२ रोजी लोथियन समितीचे काम संपले. समितीचे इतर सदस्य निघून गेले पण
बाबासाहेब मात्र आपले एक स्वतंत्र निवेदन सादर करण्याच्या हेतूने तिथेच
(सिमल्याला) थांबले होते. त्या निवेदनाचा प्रभाव असा पडला की डिप्रेस्ड
क्लास म्हणजे अस्पृश्य अशी नवीन व्याख्या लोथियन साहेबाना मान्य करावी
लागली. आता पर्यंत अस्पृश्य म्हणजे गुन्हेगारी लोकं, भटके जमाती, वन्यजाती व
आदिवासी असा साधारण समज करुन बसलेल्या ब्रिटीशांना अस्पृश्य व इतर मागास
यातला फरक कळला होता. बाबासाहेबांच्या निवेदनांची, तर्कसुसंगत अन
अभ्यासपुर्ण मांडणीची फलश्रूती म्हणजेच लोथियन साहेबांनी स्विकारलेली वरील
नविन व्याख्या. हा बाबासाहेबांचा एक महत्वाचा विजय होता. आता लोथियन
साहेबानाही ब्रिटनला जाऊन हे सगळं वरिष्ठांना पटवून देतांना सोपं जाणार
होतं.
ही सगळी कामं संपवून बाबासाहेब मुंबईला परतले. दोन दिवस आराम
करुन लगेच ६ मे १९३२ रोजी नागपूर जवळील कामठी (जिथे आता ड्रॅगन पॅलेस आहे
ते)येथे भरविण्यात आलेल्या डिप्रेस्ड क्लासच्या परिषदेस हाजर झाले.
बाबासाहेबांसारख्या महान नेत्याला आमच्याच दलीत लोकानी नागपूर स्टेशनवर
काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविला होता. (पुढे जाऊन १९५६ मध्ये जिथे
धम्मक्रांती घडली जिथेच १९३२ मध्ये बाबासाहेबांचं असं स्वागत केलं गेलं )
हे सगळे काळे झेंडे दाखविणारे दलित राजा-मुंजे समर्थक होते. ही अत्यंत
लाजीरवाणी गोष्ट होती की बाबासाहेब ज्या दलितांसाठी लढत होते त्यांच्यातूनच
काही लोकानी गटबाजितून बाबासाहेबांचा निषेध केला होता. हा सगळा अपमान
गिळून बाबासाहेब परिषदेच्या ठिकाणी पोहचतात. १५-२० हजार लोकानी मंडप भरलेले
होते. लोकांच्या अलोट गर्दिपुढे बाबासाहेबांचे एक अत्यंत महत्वाचे अन
आत्मसन्मान जागृत करणारे भाषण झाले. या परिषदेत दलित नेते गवई काहितरी
उचापत्या करणार याची खात्री होती, मग त्यांना तसे न करण्याची तंबी देण्यात
आली होती. त्यामुळे संतापून गेलेले गवई लोथीयन साहेबांकडे तक्रार दाखल करुन
बाबासाहेब हे एका छोट्या गटाला रिप्रेझेंड करतात असे सांगितले. राजभॊजनी
सुद्धा घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याना सुद्धा परिषदेतुन बाहेर
काढण्यात आले. अशा प्रकारे ज्या ज्या नेत्यानी कॉंगेस व हिंदु महासभेच्या
प्रभावाखाली फितूरी करण्याचे काम केले त्याना धडा शिकविण्यात आला. अशा
प्रकारे ही परिषद वादावादीची व दगाबाजाना बदडून काढणारी आंबेडकरी परिषद
म्हनून इतिहासात नोंदली गेली.
अस्पृश्य नेत्यांनी केलेल्या दगाबाजी व
तक्रारीमुळे लोथीयन साहेबांचे मतपरिवर्तन होऊन अस्पृश्यांवर अन्याय होऊ नये
म्हणून बाबासाहेब आता थेट लंडन गाठण्याच्या कामाला लागतात. लोथीयन समिती
जे सादर करील त्यावरुन आपल्यावर अन्याय होता कामा नये अन फितूरांचं
फावल्यास समाजाची हानी भरुन निघणार नाही. म्हणून निर्णय येण्या आधीच तिथे
धडकण्यासाठी बाबासाहेब २६ मे १९३२ रोजी लंडनला रवाना होतात. आयुष्यात अशी
संधी परत येणार नाही हे बाबासाहेब ओळखून होते. जे काय करायचे ते आत्ताच अन
त्याला पर्याय नाही म्हणून बाबासाहेब लगेच निघतात व जुनच्या पहिल्या
आठवड्यात बाबासाहेब लंडनला धडकले. तिथे अनेक महत्वाच्या व्यक्तीना भेटून
आपले मत मांडतात. अस्पृश्याना जास्तीत जास्त सवलती देणे कसे गरजेचे आहे हे
समजावून सांगतात. त्यानी लहानात लहानापासुन मोठ्यात मोठ्या लोकांच्या भेटी
घेतल्या. एक स्वतंत्र निवेदन तयार करुन ते ब्रिटिश पंतप्रधानाना सादर केले.
१४ जुन पर्यंत ही सगळी कामं उरकून बाबासाहेब जर्मनीला निघून गेले. याच
दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यानी जर्मनितील ड्रेसडेन येथील
डॉ. मोलर यांच्याकडे उपचार नि विश्रांती घेतली. वेळप्रसंगी ब्रिटनला धावता
येण्यासाठी हा मुक्काम अचूक होता. पूर्ण जुलै महिना त्यांनी जर्मनीत
विश्रांती घेत्ली व ऑगस्ट मधे भारतात येण्यास निघतात. (एम.डी.रामटेके)
(क्रमश
No comments:
Post a Comment