Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २४) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! उपोषण सुरु उपोषणाचा चौथा व पाचवा दिवस पुणे करार – भाग -९ गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट अखेर पुणे करार संमत....!


दिवस-४
२३ सप्टे १९३२ उजाडला.  आता बदली मागण्याची मिटींग भरली. बाबासाहेबानी बदली मागण्यात सर्व प्रांतात एकून १९७ जागा अस्पृश्याना मिळाव्यात असे जाहीर केले. कम्युनल अवार्ड (जातीय निवाडा) नुसार अस्पृश्याना केवळ ७८ जागा मिळाल्या होत्या. पण त्या स्वतंत्र मतदार संघ म्हणुन मिळाल्या होत्या. त्या बदल्यात बाबासाहेबानी राखीव जागा स्विकारण्याची तयारी दर्शविली पण त्या बदल्यात १९७ जागांची मागणी करताच गांधीवादी संतापाने गोरेमोरे होऊन उठले. नाराजीची लाट उसळली. बरीच खडाजंगी झाल्यावर त्यानी १२६ जागा देण्याचे मान्य केले. पण बाबासाहेब हट्टाला पेटले होते. जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा निर्धार ठाम होता. पॅनल मधे किती उमेदवार असावे यावरही सभागृह पेटले. १० वर्षानी राखीव जागा रद्द कराव्यात असा गांधीवाद्यांनी आग्रह धरला पण राखीव जागांचा कालावधी न ठरविता १५ वर्षानी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे अशी बाबासाहेबानी एक अत्यंत महत्वाची अट घातली. अशा प्रकारे चर्चा १० तासापेक्षा जास्त रंगली पण एकमत होताना दिसेना. शेवटी गांधीवादयानी गांधींजी भेट घेऊन संपुर्ण वृत्तांत कथन केला. ईतर सर्व मुदयांवर गांधी राजी झाले पण राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी मात्र संकट बनुन उभा ठाकला होता. बाबासाहेबानी कालावधीला मान्यता न देण्याचा निर्णन अत्यंत कठोरपणे जाहीर करताना निक्षुन सांगितले की अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्यात याव्यात.  १० किंवा १५ वर्षाचा कालावधी झाल्यावर राखीव जागा रद्द करणे म्हणजे दलितांवर अन्याय होईल असे बजावुन सांगितले.
तो पर्यंत अशी बातमी आली की गांधीजींची प्रकृती आजुन बिघडली असुन आणिबाणीची वेळ उभी झाली होती. सायंकाळी बाबासाहेब स्वत: गांधीना भेटण्यासाठी तुरुंगात जातात. सार्वमताच्या प्रश्नाला गांधीजीनी पाठिंबा दिला पण त्यांनी वेगळाच फासा टाकला. गांधी म्हणाले ५ वर्षानीच सार्वमत घ्यावे. गांधीच्या या तर्कहीन व खोचक वाक्यानी बाबासाहेब अत्यंत दुखावतात. कधी कधी गांधी फारच तर्क विसंगत बोलत. अशा प्रकारे ही भेट इथेच संपते. गांधीच्या हट्टापायी व बाबासाहेबांच्या दृढनिश्चयापायी या दिवसाची सारी चर्चा अनिर्णायक वळणावरच थांबली.

दिवस-५
२४ सप्टे १९३२ दिवस शनिवार, सकाळी परत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सार्वमत यावरुन खडाजंगी होऊ लागली. गांधीवादयानी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबानी कुठल्याही परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीवजागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबानी गांधींची भेट घेतली. गांधीशी झालेली चर्चातर अधिकच बिनबुडाची व तर्कविसंगत निघाली. गांधीनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते. शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात,  ५ वर्षात सार्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.
गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबे दणाणले. दाबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सार्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नामनिर्देश न करता करार करावा असे ठरले. दुपारी ३ वाजता राजगोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीना सांगितली. गांधीनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. करार खालील प्रमाणे होता.

No comments:

Post a Comment