Friday, June 15, 2018

(भाग – ४२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युचा अहवालाची मागणी एक फसवे आंदोलन....भावनिक समाजाचा गैरफायदा घेऊन चळवळीचे झाले तुकडेच तुकडे.....अखेर यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचे झाले निधन.....! भगवा ध्वज विचार...तर निळां ध्वज संघर्ष...!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना समाजापासून दूर ठेवण्यासाठी स्वार्थी नेतृत्व मनुवादी षड्यंत्र आखीत होते.छत्रपती संभाजी महाराज यांना ज्याप्रामाणे बदनाम करण्यात आले होते त्याच प्रमाणे भैय्यासाहेब आंबेडकर यांना बदनाम करून समाजापासून तसेच राजकीय मुख्य प्रवाहपासून दूर ठेवण्याचे मोठे राजकारण झाले आणि ते यशस्वीरित्या पार पडले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती.त्यांचे लक्षात आले होते की,मोठ्या प्रमाणात स्वार्थ आणि लालसा शिकलेल्या तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे.परंतु हे मनुवादी षड्यंत्र होते हे कोणाच्याच लक्षात आले नाही त्याचे कारण असे की,बौध्द धम्म स्वीकारून काही मनुवादी वृत्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली चळवळ फोडण्यासाठी व पुन्हा त्यांचे घराणे सक्रीय होऊ नये यासाठी सह्भागी होत होती.हे सर्व बघण्याशिवाय कोणताही पर्याय या स्वार्थी लोकांनी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या समोर ठेवला नव्हता.त्या घराण्यावर असा एक दबाव तयार करण्यात आला होता की,तुम्ही चळवळी मध्ये सक्रीय ह्यायचे नाही.१९५६ पासून ते १९७६ पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचा अहवाल द्या म्हणून बी.सी कांबळे यांनी २० वर्ष आंदोलन चालवून समाजाला भावनिक मुद्द्यावर खेळवीत ठेवले.पुण्यामध्ये याच बी.सी.कांबळे यांनी याच मृत्यूचा अहवाला संदर्भात एक बैठक बोलाविली.एकंदरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग अडाणी होता तो त्यांना भावनिक होता आणि याच भावनिकतेचा फायदा घेऊन नेहमी त्यांनाच भावनिक ठेऊन आपले स्वत:चे स्वार्थ राजकारण केले होते.परंतु त्यामध्ये आता काही लोक हुशार होऊ लागले होते.त्या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्याने बी.सी.कांबळे यांना प्रश्न केला त्याने असे विचारले की,आपण जो मृत्यूचा अहवाल मागित आहोत तो मिळण्यासाठी “पोस्टमार्टम” होणे आवश्यक आहे.कारण जो पर्यंत डॉक्टराना व्हिसेरा उपलब्ध होता नाही तो पर्यंत त्यांना अहवाल देता येत नाही.मग कसला अहवाल आपण मागित आहोत यावर बी.सी.कांबळे त्या कार्यकर्त्यावर चिडले त्यांनी त्या बैठकी मधून त्या कार्यकर्त्याला हाकलून दिले.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचा अहवाल द्या ही मागणी बंद झाली.याची खबर यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना मिळाली त्यांना अतिशय दु:ख झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचे एवढे मोठे राजकारण स्वार्थापायी झाले.१९५६ पासून ते १९७६ पर्यंत चळवळीचे झाले तुकडे पाहून आधीच ते अस्वस्थ होते.यातच मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे हा दुसरा भावनिक मुद्दा पुढे आला याचेही खबर यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना मिळाली होती.मृत्युच्या अहवालासाठी समाजाचे २० वर्षे गेले आणि आत्ता मराठवाडा विद्यापीठ नामांतराला किती वर्ष जाणार याची कल्पना त्यांना सहन झाली नाही.कारण जो संघर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारला होता तो पूर्ण करून जे कार्य आपल्याला दिले होते जी दिशा आपल्याला त्यानी दाखविली होती त्यापासून स्वार्थी लोक चळवळीची दिशा भटकत आहे.आणि स्व्रथापायी चळवळीचे तुकडेच तुकडे होता आहे.आणि १७ सप्टेंबर १९७७ रोजी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.(क्रमश😊

No comments:

Post a Comment