Thursday, June 7, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १५) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! मिठाचा सत्याग्रह आंदोलन म्हणजे मोहन करमचंद गांधी यांचा स्वत:ला प्रकाश झोतात आणण्याचा कार्यक्रम होता.....!


सायमन कमिशनच्या स्थापनेवरून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लक्षात आले की,भारत स्वतंत्र झाला आहे. कॉंग्रेसच्या वतीने ३१ डिसेंबर १९२९ मध्ये लाहोर याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.आणि २६ जानेवारी १९३० मध्ये लाहोर याठिकाणी स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.परंतु संपूर्ण भारत देशात आपली आणि आपल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची एक ओळख निर्माण झाली पाहिजे यासाठी मोहन करमचंद गांधी विचारात पडले होते असे काय करावे की,देशातील प्रत्येक गावातील वस्त्या वाड्यातील व्यक्ती आपले नाव लक्षात ठेवेन हा तो विचार करीत असताना त्यांच्या जेवणाची वेळ झाली होती.जेवताना भाजीत मीठ टाकायचे राहून गेले त्यामुळे जेवणाला चव येईना त्यांनी मीठ मागून घेतले.त्यातच त्यांच्या बुद्धी कौशल्यात युक्ती सुचली.त्यांच्या लक्षात आले की,मीठ नाही तर जेवणाला चव नाही आणि चव नाही तर भोजनाचा आनंद नाही.आणि प्रत्येक माणूस दिवसातून तीन वेळा जेवण करतोच मग त्यांनी मिठाचा सत्याग्रह करण्याचे ठरविले.आणि १२ मार्च ते ६ एप्रिल १९३० मध्ये ४०० कि.मी.अहमदाबाद ते दांडी पर्यंत पायी चालण्याचे आंदोलन त्यानी ठरविले आणि त्याला नाव दिले दांडी यात्रा.हे मिठाचे आंदोलन प्रत्येक माणसाच्या जेवणाच्या थाळ्या पर्यंत जाऊन पोहचले.माणसाला जेवायला बसले की,गांधीची आठवण येऊ लागली आणि ते महात्मा गांधी झाले देशाच्या कानाकोपऱ्या पर्यंत महात्मा महात्मा गांधी असेच नावाचा जय जयकार होऊ लागला महात्मा गांधी आता देशाचे हिरो झाले होते.परंतु याच काळात गोलमेज परिषदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे केलेले प्रतिनिधीत्व गांधीना पटले नाही.स्वतंत्र झालेला भारत औपचारीक घोषणेसाठी थांबला होता.महात्मा गांधी यांच्या लक्षात आले की,आता या क्षणाला भारत स्वतंत्र होणे फायद्याचे लक्षण नाही.स्वतंत्र भारत हा डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा विचारांचा असेल समतेचा असेल आणि सर्व प्रजाजन हितकारी असेल.आपले हातात काही राहणार नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र झालेल्या भारताला आणि त्याच्या नागरिकांना डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेऊन भूलभुलैयामध्ये अडकविण्याचे राजकारण सुरु केले.(क्रमश😊

No comments:

Post a Comment