डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ ला चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुस्मुर्तीचे
समर्थक असणारे गप्प बसले नाही त्यांनी मानसिकतेने गुलाम केलेला आपला भारतीय निवासी
म्हणजे त्यांनी ठरविलेला सवर्ण जवळ करून चवदार तळ्याचे वैदिक मंत्र उचारून बाटलेले
तळे पवित्र केले होते.जो तळ्यावर येईल त्याचे मस्तके फोडली जायची त्याला रक्त भंबाळ
केले जायचे मात्र चवदार तळ्याचे पाणी त्या अस्पृश्याल पिऊ देत नव्हते.छत्रपती
शिवरायांच्या स्वराज्यात अशी घटना घडविली जायची तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी पुन्हा महाड येथे जाऊन चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचे ठरविले.मात्र आता
मनुवादी षड्यंत्र गप्प बसणारे नव्हते.तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायस्थ
प्रभू असणारे 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन
विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी " “मनुस्मृती” दहन करण्याचे ठरविले
होते.मात्र ब्रिटीश सरकार यांनी सार्वजनिक ठिकाणी हे आंदोलन करण्यास डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना विरोध केला होता.परंतु मुस्लीम समजतील एका व्यक्तीने आपली स्वत:ची
जागा मनुस्मृती दहन करण्यासाठी देण्याचे कबूल केले.मग आता तुम्हाला प्रश्न पडला
असेल की,नेमकी मनुस्मृती
म्हणजे काय आणि काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डॉ बाबासाहेब
आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन करण्याचे का ठरविले.तर याचे उत्तर आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे
राज्य समतेचे होते कारण पहिला राज्याभिषेक करण्यासाठी शुद्र म्हणून त्यांना मनुचे
समर्थक वैदिक धर्म पंडितांनी विरोध केले होता...त्यांच्या नाकावर टिच्चून त्यानी
तो राज्याभिषेक केला तरीही त्यांना राजा म्हणून स्विकारण्यास याच मनुवाद्यानी विरोध
केला होता.त्यामुळे त्या धक्क्याने सात दिवसात माता जिजाऊ यांचे निधन झाले त्यामुळे
पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १९२४
मध्ये करण्यात आला होता..आणि याच मनुवादी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या
मनुस्मृती प्रमाणे करण्यात आलेली होती.त्यांच्या हत्येचा बदला सिद्धनाक महार या
स्वराज्याच्या सरदाराने भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी घेऊन पेशवाई
नेस्तनाबूत केली होती.त्या शूर महार योद्ध्यांच्या समर्थनार्थ भीमा कोरेगाव
याठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे.त्या शूर महार योद्ध्यांना मानवंदना देऊन डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.साधारण इ. स. पू. ६०० ते ८व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म पूर्ण देशभरात होता. बौद्ध धर्मात
कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. बुध्दांचं म्हणणं होतं, जी कुटुंबे
स्त्रियांच्या हाती कारभार देतात, ती विनाशापासून मुक्त होतात. बुध्दांच्या
काळात अनेक भिक्खूनी होत्या.त्यातील मेत्ता म्हणते, “मी खरोखरच स्वतंत्र आहे. माझ्या
स्वातंत्र्याला सीमा नाही”.
मेत्तिका म्हणते, “मी या शिळेवर दररोज ध्यानस्थ बसते.
तेव्हा स्वातंत्र्याचे श्वासोच्छवास माझ्या
अध्यात्मिक साधनेवरून एकसारखे वाहत असतात”. सोन्हा म्हणते, “स्त्रीचे
नैसर्गिक जीवन हे आमच्या चारित्र्याच्या आड कसे येऊ शकते?” बुद्धाने स्त्रियांना भिक्खूनी
बनण्याचा अधिकार दिला. त्यामुळे
स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला होता.सर्व प्रकारच्या स्त्रियांसाठी बौद्ध संघाचा दरवाजा
खुला होता. त्यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या
बरोबरीने स्वातंत्र्य, समता आणि आत्मविश्वास ही मानवी जीवनाची सर्व अंगे
प्राप्त करून घेता येत होती.ज्यावेळी जगातील कोणत्याही देशात स्त्रियांना
इतका मानसन्मान मिळत नव्हता, त्यावेळी तो भारतातील
स्त्रियांना मिळत होता. एका ठराविक वर्गाला समोर ठेवून मनुस्मृतीची निर्मिती
करण्यात आली. मनुस्मृती साधारण इ.स.पू. २०० ते इ.स. २०० ह्या काळात
केव्हातरी रचली गेली. मनुस्मृती फार फार तर सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीची
असेल. मनुस्मृती मध्ये शुद्र व स्त्रियांना ताडन के अधिकारी म्हटले आहे.
त्यांना कोणतेही मंत्र वाचण्यास बंदी आहे. ते श्लोक पाठ करू शकत नाहीत.
थोडक्यात त्यांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्यावर
अनेक रूढी-परंपरा लादण्यात आल्या आहेत. मनुस्मृती सांगते, पुरुषांना
आकर्षित करून भ्रष्ट करणे हे स्त्रियांचे जीवन वैशिष्ट्य आहे. शय्येबद्दल
ओढ, आराम व चैन ह्याचे आकर्षण, दागिने व
अपवित्र वासना ह्यांची हाव, क्रोध, लबाडी, मत्सर आणि
सर्व दुर्गुण हे स्त्रियांना निर्माण करताना मनूने
त्यांच्या अंगात घातले आहेत. लहानपणी बाप पालनपोषण करतो, तरुणपणी नवरा संरक्षण
करतो आणि वृद्धापकाळात मुलगे स्त्रीचं संरक्षण करतात. स्त्री ही
स्वातंत्र्याला लायक नसते. तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. घरातील व्यवहारांमध्ये
स्त्रीने लक्ष घालू नये. कुटुंबातील मालमत्तेवर तिचा हक्क नाही.
यासारखे अनेक नियम मनुस्मृतीने स्त्रियांवर लादून दिलेले आहेत. बाबासाहेबांचे
विचार हे त्यावेळच्या शिकलेल्या स्पृश्यांपेक्षाही अधिक
पुढारलेले होते. पण एक अस्पृश्य व्यक्ती आपली बरोबरी करू शकतो हे त्या
काळाच्या शूद्रांना मानवणारे नव्हते. बाबासाहेबाना जातीव्यवस्थेचे आणि विषमतेचे
अनेक चटके सहन करावे लागले.महात्मा फुले म्हणाले होते, "जेव्हा बहुजन ब्राम्हणांनी लिहिलेलं थोतंड ग्रंथ वाचेल
तेव्हा ते जाळून स्वतःचा राजग्रंथ लिहितील." तेव्हा समता
प्रस्थापनेचा लढा पुन्हा तीव्र करण्याच्या हेतूने परत महाडलाच त्यांनी सत्याग्रह
करण्याचे ठरविले. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथील परिषदेत अनेक ठराव पास
करण्यात आले, त्यातील एक ठराव हा मनुस्मृती दहनाचा होता आणि ह्या ठरावाला
ब्राह्मणांचेही अनुमोदन होते. त्याचप्रमाणे २५ डिसेंबर रोजी गंगाधर
नीलकंठ सहस्रबुध्दे यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. विषमतेचा
पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून डॉ. आंबेडकरांनी समता प्रस्थापणेच्या
क्रांतीपर्वाच्या दिशेने एक दमदार क्रांतिकारी पाऊल टाकले.(क्रमश😊
No comments:
Post a Comment