२४ सप्टेंबर १९२४ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दल स्थापन केले
होते.त्यानंतर संपूर्ण समाजात जनजागृती करून प्रबोधन करून कायस्थ प्रभू यांना जवळ
करून मनुस्मृती दहन करण्याचे ठरविले होते.महाड येथील चवदार तळे आरएसएस वादी
लोकांनी अस्पृश्यांसाठी बंद केले होते.समतेचा राजा शिवछत्रपतीच्या स्वराज्याची
राजधानी असलेला रायगडचा हा परिसर होता.ज्या शिवरायांनी सप्तबंदी मोडीत काढीत शुद्र
म्हणणाऱ्या वैदिक धर्म पंडितांच्या राज्याभिषेकाला नाकरून शाक्त धर्म पद्धतीत
दुसरा राज्याभिषेक करून समता प्रस्थापित केली होती.अशा परिसरात अस्पृश्यांना
सार्वजनिक पाणवट्यापासून वंचित ठेवले होते.ही बाब स्वराज्यासाठी शरमेची बाब
होती.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचे
ठरविले होते.याची खबर वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती.हजारोंच्या संख्येने लोक महाड
येथे जमू लागली होती. भीमा कोरेगाव येथील महार योद्ध्यांना १९२७ साली मानवंदना
देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर महाडला रवाना झाले होते.चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी
आलेल्या लोकांना समतेचा भगवा ध्वज त्यांचे हातामध्ये देऊन छत्रपती शिवाजी महाराज
यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येऊन २० मार्च १९२७ साली संपूर्ण जनसमुदाय घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याकडे रवाना झाले होते.ह्जोरोंचा
जनसमुदाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर होता.त्या महाडच्या चवदार तळ्याच्या
पाण्याला स्पर्श करून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की,हे पाणी पिऊन आपण काही
अमर होणार नाही परंतु स्वराज्य आपले आहे आणि स्वराज्यात आपले मोठे योगदान असून हा
आपला हक्क आहे.आणि मग सर्वानी त्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन पुन्हा एकदा छत्रपती
शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या परंतु इथली मनुवादी व्यवस्था काही
गप्प बसणारी नव्हती ज्यांनी माता जिजाऊ – छत्रपती शिवराय – छत्रपती संभाजी महाराज –
महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज यांना त्रास दिला ते या पेशवाईने अस्पृश्य
ठरविलेल्या समाजाला काय सोडणार होते काय...? त्यांची चवदार तळे
अस्पृश्यानी बाटले म्हणून काही वैदिक ब्राह्मण समाजाने मानसिकतेने बिघडविलेले काही
आपले समाज बंधू एकत्र करून सवर्ण ठरविलेले लोक गोळा करून त्या चवदार तळ्याचे
शुध्दिकरण वैदिक मंत्रानी केले.आणि त्यांना असे सांगितले की,पुन्हा हे अस्पृश्य लोक हे तळे बाटवीतील म्हणून आरएसएस वादी
लोकांनी पाहिला हल्ला हा चवदार तळ्याच्या सत्यग्रही यांचेवर केला.संपूर्ण अस्पृश्य
समाज एकत्र येऊन लाठ्या काठ्या घेऊन डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचेकडे आले आणि
त्यांना म्हणाले की,बाबासाहेब आम्हाला या
हल्ल्याचे प्रती उत्तर देण्याचे आदेश करा आम्हीही यांना सोडत नाही.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समता
प्रस्थापित करायची होती...त्यानी त्या तरुणांना शांत केले आणि ते म्हणाले तुम्ही
काही करू नका जे काय करायचे ते मी करेन...कारण डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांना कल्पना होती की,हल्ला करणारे हात हे आपल्याच लोकांचे आहेत मात्र मेंदू हा
आरएसएस वादी मनुवादी यांचा आहे.आणि हे लोक मनुस्मृतीचे समर्थक आहेत आणि आपल्याला
समता प्रस्थापित करण्यासठी रोखत आहे त्यामुळे त्यांच्या हल्ल्याचे उत्तर त्यांनी
प्रतिहल्ला करून दिले नाही.कारण प्रतीहल्ला हा आपल्याच लोकावर होईल आणि मनुवादी
षड्यंत्र यशस्वी होईल.(क्रमश😊
No comments:
Post a Comment