विषय असा आहे गौतम बुद्धापासून ते सम्राट अशोकापासून ते वारकरी संप्रदायपासून
ते स्वराज्यापासून ते सत्यशोधक चळवळीपासून ते समता सैनिक दला पर्यंत भगवा ध्वज हा
स्वराज्यातील रयते कडेच होता.मग २५ नोव्हेंबर १९२५ मध्ये “राष्ट्रीय स्वयंसेवक
संघ” म्हणजेच (आरएसएस) स्थापन झाला होता यांच्याकडे कोणता ध्वज होता असा प्रश्न
आपल्या सर्वांना पडला असेल.तर त्याचे सरळ उत्तर आहे की,त्यांचेकडे स्वास्तिक असलेला
काळा ध्वज होता.इकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवा ध्वज घेऊन समता प्रस्थापित करण्याचे
कार्य जोरात सुरु केले होते.त्यांनी पहिली सुरुवात स्वराज्यातून करण्याचे ठरविले
होते. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” स्थापन झाल्यामुळे अस्पृश्यावर अन्याय करणाऱ्या घटनेत वाढ झाली
होती.सार्वजनिक पाणवाट्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याच्या कार्याला
जोर धरू लागला होता.महाड हे स्वराज्याची राजधानी असलेल्या परिसरात होते.आणि
महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांची समाधी इथेच शोधली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी
ठेवून महाड येथील चवदार तळ्याच्या प्रश्नावर सत्याग्रहास सुरुवात करायची ठरविले
होते.आणि महात्मा फुले यांनी असे म्हटले होते की,जी मनुस्मृती
मानव कल्याणाच्या आड येते ती दहन केली पाहिजे.आणि या मनुस्मृती प्रमाणे छत्रपती
संभाजी महाराज यांची हत्या करण्यात येऊन पेशवाई स्थापन झाली होती.आणि ज्या
वढूमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे याच समाधीला साक्ष ठेऊन
स्वराज्याच्या म्हणजे सातारा गादीचा सरदार महार योध्दा सिद्धनाक महार याच्या
नेतृत्वात जे भीमा कोरेगाव याठिकाणी पेशवाई विरुध्द युध्द झाले आणि पेशवाई नेस्तनाबूत
करण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला आणि मनुस्मृतीचे
अमलबजावणी करणारी जातीवादी पेश्वाईचा याचा अंत करून ज्यांनी शौर्य दाखविले
त्यांच्या विजयस्तंभास मानवंदना देण्याचे ठरवून स्वराज्याच्या राजधानीत मनुस्मृती
कायस्थ प्रभू असणारे चित्रे आणि सहस्रबुद्धे यांचे हस्ते म्नुस्मुर्तीचे दहन
करण्याचे निश्चित केले.निश्चित केल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी १९२७ साली भीमा
कोरेगाव येथे येऊन स्वराज्याच्या वीर महार योद्ध्यांना मानवंदना दिली.(क्रमश😊
No comments:
Post a Comment