डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
नंतर त्यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना नेत्र्युत्व न देता एन.शिवराज,राजाभाऊ खोब्रागडे,शांताबाई दानी,बी.सी.कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांनी भारतीय रिपब्लिकन
पक्षाची स्थापन करून पक्षाचा अशोक चक्र असलेला निळा ध्वज असेल अशी मान्यता मिळवली.भैय्यासाहेब
आंबेडकर यांनी कोणताही विरोध न करता निस्वार्थपणे मान्यता दिली.रिपब्लिकन पक्षाचे
पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एन.शिवराज तर जनरल
सेक्रेटरी म्हणून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली.महिला गटाचे नेतृत्व शांताबाई दानी यांचेकडे
देण्यात आले.तर विद्यार्थी गटाचे नेतृत्व बी.सी.कांबळे यांचेकडे देण्यात आले.तर बौध्द
महासभेचे नेतृत्व भैय्यासाहेब आंबेडकर यांचेकडे देण्यात आले.परंतु भैय्यासाहेब
आंबेडकर यांना गुंतवून ठेवण्यासाठी “राजगृह” संदर्भात मुद्दा उपस्थित करून डॉ
सविता कबीर यांना न्यायालयात केस दाखल करण्याचे राजकारण करण्यात आले. “राजगृह” समाजाचे
अधिष्टान होते ते राहिले पाहिजे अशी भावना भैय्यासाहेब आंबेडकर यांची होती तेव्हा
त्यानी न्यायालयाकडे विनंती केली की,त्यांना रक्कम
रुपये नऊ लाख डॉ सविता कबीर यांना देण्याचे आदेश केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निस्वार्थ भावनेतून समाजाचे कार्य केले होते
त्यामुळे अशी कोणतीही एक्क्म त्यांच्याकडे किंवा त्यांच्या वारसाकडे उपलब्ध
नव्हती. भैय्यासाहेब आंबेडकर यांना ही रक्कम गोळा करण्यासाठी काश्मीर ते
कन्याकुमारी पर्यंत अशी मजल दर मजल करावी लागली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवालाची मागणी भारतीय रिपब्लिकन
पक्षाने उचलून धरली.समता सैनिक दल पुर्नस्थापित करून निळा देण्यात आला.एकंदरीत
सुरु असलेल्या वाटचाली नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या निस्वार्थ भावनेची कदर कोणाला राहिली असे दिसत
नव्हते.एवढ्या कष्टाने प्रस्थापित केलेली “समता” विस्थापित करण्याचे कार्य सुरु
झाल्याचे दिसत होते. डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या वारस पुत्राला
नाकारून जे संघटन उभे राहत होते यातून हेच दिसत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचे भावनिक राजकारण सुरु झाले
होते.बासाहेबांच्या प्रती प्रेम भावना असलेल्या समाजाची दिशाभूल सुरु झालेली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या चळवळीची दिशा भटकविण्याचे
कार्य सुरु केले होते.शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून समविचारी लोकांना जवळ
करून “रिपब्लिक” पक्ष स्थापन करण्याची कल्पना डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांची होती.परंतु
पक्षाचे नेर्तुत्व बाहेरच्या कोणाही व्यक्तीला द्यायचे नाही अशी भावना या लोकांची
झालेली होती.जे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारस पुत्राला नेतृत्व देऊ शकत नाही ते काय
समविचारी लोकांना बरोबर घेणार होते.(क्रमश😊
No comments:
Post a Comment