Tuesday, June 12, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ३१) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! ब्राह्मणी निर्मिती असणारे ब्रह्मा – विष्णू – महेश – राम - कृष्ण - गौरी – गणपती या देवतांचे अस्तित्व नाकरून इथल्या सिंधू संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच १९५६ साली नागपूर येथे २२ प्रतिज्ञा घेऊन बौध्द धम्म दीक्षा घेतली आहे.....!


सर्व गोष्टींचा खुलासा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना झाला होता आता त्यांच्या संपूर्ण लक्षात आले होते की,हिंदु नावाचा कोणताही भारताचा धर्म नसून हिंदू ही संस्कृती सिंधू मधून चालत आलेली आहे.त्यामुळे या भारत देशाचा खरा धर्म म्हणजे बौध्द धर्म आहे आणि हा कोणताही धर्म नसून बौध्द धम्म म्हणजे गौतम बुध्दाने दिलेले विचार आहेत.हा विचार तुम्हाला मानव कल्याणाकडे घेऊन जातो आणि हा विचार ऐतिहासिक विचार आहे.पूर्वी प्रत्येक व्यक्ती या विचाराच्या आधीन राहूनच आपले जीवन कार्य करीत असायचा या विचारात उच्च निच्च काही नव्हते.हा धर्म नऊ पंथांचा धर्म आहे.जगातील पहिला धर्म जैन आणि दुसरा धर्म बौध्द आहे....आणि या दोन धर्मा पूर्वी जगात कोणताही धर्म नव्हता.परंतु आर्य भारतात आले राक्षसी स्वभावाचे हे लोक यज्ञ हवन आंनी प्राणीमात्रांचा बळी यावर विश्वास ठेवत अघोरी लोक म्हणून मानव विरोधी लोक होते.त्यांनी इथली सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून ती हळू हळू आपल्या ताब्यात घेण्यासाठी इथल्या राजव्यवस्थेमध्ये स्थान मिळवत त्या राजाला आपल्या ताब्यात ठेऊन वर्णाश्रम धर्मा प्रस्थापित करण्याचे कार्य त्यांनी सुरु केले होते.जे राजे त्यांच्या ताब्यात येणार नाही त्या राजघराण्यात फुट पाडून त्यांच्या मध्ये स्वार्थ निर्माण करून विरोधी राजांच्या हत्या करून त्या आपल्या ताब्यात घेण्याचे कार्य करून तेथे वर्णाश्रम धर्म प्रस्थापित करण्याचे कार्य आहे.परंतु चार वर्णाचा धर्म ते प्रस्थापित करू शकले नाही.म्हणून त्यांनी वैदिक धर्माची स्थापना करून ब्राह्मण श्रेष्ठ बाकी सगळे शुद्र म्हणून क्षत्रियालाही त्यांनी शुद्र म्हणून लेखले आहे.छत्रपती शिवराय यांना या वैदिक धर्माने शुद्र म्हणूनच लेखले आहे.सिंधू संस्कृतीचे प्रबोधनकार आणि मानव कल्याणकारी वारकरी सांप्रदाय मधील संत मंडळी यांची हत्या करून त्यावरही ताबा मिळविण्याचे कार्य केले आहे.स्त्री शक्तीचे केंद्र असणारे भारतीय निवासी यांचे पूर्वज जगदंबा - मरीआई – महालक्ष्मी – ज्योतीबा – खंडोबा यांचेवर ताबा मिळविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.त्यानंतर इथला भूमीपुत्र मारण्यासाठी इथले क्षेत्रपाल/क्षेत्ररक्षक यांना संपविण्यासाठी सनातनी धर्माची स्थापन करून जातीय व्यावस्था निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.सनातनी धर्माच्या माध्यमातून जातीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रह्मा – विष्णू – महेश – राम - कृष्ण - गौरी – गणपती यांची निर्मिती करून गणपतीला हत्ती या प्राण्याचे शीर लावून त्याला जानवे घालून बौध्द धर्मातील अष्टांग मार्ग यावर ताबा मिळविण्यासाठी अष्टविनायक मंदिरांची स्थापना करण्यात येऊन तेहतीस कोटी देवांचा अधिष्टता म्हणून आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करण्यात येऊन स्वराज्यातील महार योद्ध्याला संपविण्यासाठी शुद्रातून अति शुद्र म्हणून “अस्पृश्य महार” अशी उपाधी देऊन गावच्या पंचायत निवड प्रमुखाला गावच्या बाहेर ठेवण्यात आले.हाच अस्पृश्य महार स्वराज्यात महार योध्दा होता त्या आधी ५२ हक्क प्राप्त इथला बौध्द धर्मीय राजा होता.याचा संपूर्ण आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता.आणि हा धर्म लुप्त पाऊ नये हजारो वर्षापासून त्याचे अस्तित्व अबादित राहावे यासाठी डोंगरात बौध्द लेण्या कोरून ठेवलेल्या आहेत आज त्या बौध्द धर्माचे आणि बौध्द धर्मातील नववा पंथ म्हणजे शाक्त धर्माची साक्ष देत आहेत.परंतु इथला मानव यापासून अलिप्त राहावा या बौध्द लेण्यापासून दूर रहावा यासाठी अघोरी प्रथा निर्माण करून त्याचा प्रचार आणि प्रसार मारण्यासाठी नवनाथ पंथ निर्माण करून त्यांना अघोरी विद्याचे प्रमुख स्थान देऊन डोंगर दऱ्यात त्यांचे अस्तित्व निर्माण केले आहे.बौध्द धर्मातील नववा पंथ असणारा शाक्त पंथ याचा संपूर्ण अभ्यास शंभूराजे यांना झालेला होता.त्यामुळे त्याचे अनुकरण करून छत्रपती शिवराय यांना दुसरा राज्यभिषेक शाक्त पंथीय देवी मरीआई म्हणजे भारतीय वंशाची स्त्री शक्ती रूपी मातेला साक्ष ठेऊन बौध्द धर्मातील नववा पंथ असणारा शाक्त धर्मानुसार करून घेतला आणि त्याचा प्रचार व प्रसार शंभूराजे यांनी मोठ्या प्रमाणात सुरु केला.याचा राग येऊन वैदिक धर्म पंडितांनी घरफोडी करून छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांची हत्या केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण बौध्द धम्माचा आभ्यास करून सिंधू संस्कृतीचा आभ्यास करून असे जाहीर केली की आमच्या बौध्द धम्म दीक्षे मुळे इथल्या हिंदू संस्कृतीचे कोणतेही नुकसान नाही.इथल्या हिंदू संस्कृतीवर ताबा मारण्यासाठी निर्माण केलेले ब्राह्मणी देव २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून नाकरण्यात येऊन स्पष्टपणे त्या २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ब्राह्मणी देवांचे नाम उल्लेख करून त्यातील ब्रह्मा – विष्णू – महेश – राम - कृष्ण - गौरी – गणपती या देवांचे अस्तित्व नाकारून १९५६ साली नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतलेली आहे.(क्रमश😊

No comments:

Post a Comment