Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २२) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! गांधीचे उपोषण सुरु उपोषणाचा पहिला दिवस पुणे करार – भाग -७


२० सप्टे १९३२ रोजी ईकडे येरवडा तुरूंगात गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. अस्पृश्यानी मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघावर पाणी सोडावे अन दुहेरी मतदानाचा अधिकारही विसर्जीत करुन हताश जीवन जगावे. आम्ही देऊ त्यावर समाधाना मानावे असे गांधीनी जाहीर केले.  माझ्या या सर्व अटी मान्य करेस्तोवर अन्नाचे एक शीत न घेण्याचे जाहीर करुन गांधीनी बाबासाहेबांवर उपोषणरुपी अस्त्र डागले. बाबासाहेब या अस्त्राला परतवून लावतात की घायाळ होतात ते बघण्यासाठी ऊभा देश मुंबईकडे डोळे लावून होता. सर्व पत्रकार पुण्या मुंबईत ठाण मांडून बसलीत. गांधी येरवडा कारागृहातच आपले कार्यालय थाटुन बसले होते. त्यांच्या सोबत त्यांचे खंदे कार्यकर्ते होतेच. तिकडे मुंबईत बाबासाहेबाना गांधीच्या काही अत्यंत बलवान लढवय्या सरदारानी घेरले होते. बाबासाहेबांचं मानसिक खच्चिकरण करुन दलितांच्या अधिकारांची होळी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू झाले. पण बाबासाहेबानीही मुत्सद्देपणाने खींड लढवून आपला निर्णय निर्भेडपने सांगितला. मला बदली योगना सांगा. नुसतं देऊ असं बोलून चालणार नाही. मिळालेल्या अधिकाराच्या तोलामोलाची बदली योजना घेऊन या. मगच काय ती चर्चा करता येईल. बाबासाहेब बदली योजनेवर अडून बसले.

No comments:

Post a Comment