डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी पहिले समतेचे
आंदोलन हे चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या माध्यामतून केले आहे.आणि त्यांचे दुसरे
आंदोलन हे मनुस्मृती दहन करून केले येथे त्यांना आरएसएसवादी व्यवस्थेने मोठ्या
जोमाने विरोध केलेला आहे.तरीही या विरोधाला न जुमानता हल्ल्याला कोणतेही
प्रतिहल्ल्याने उत्तर न देता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता प्रस्थापित करण्याचे कार्य सुरूच
ठेवले होते.येथे त्यांनी कायस्थ प्रभू सहस्त्रबुद्धे यांना बरोबर घेतले होते.म्हणजे
आर्य सनातनी ब्राह्मणी व्यावस्थेच्या विरोधात योग्य तो संदेश दिलेला होता.आता प्रश्न
काळाराम मंदिराचा उभा राहिला होता प्रश्न देवाचे दर्शन घेणे नव्हते.प्रश्न असा
होता की,आर्य सनातनी हिंदू धर्मात कोणतीही समानता नव्हती
हे दाखविण्यासाठी हे एक प्रबोधन आंदोलन होते येथेही डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी सहस्रबुद्धे यांना
बरोबर घेतले होते.प्रसिद्ध काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. ही
एक मानवमुक्तीची लढाई होती.ही लढाई होती अस्मितेची, ही लढाई होती
स्वाभिमानाची.मानवी हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य महार समाज २ मार्च १९३० रोजी
स्वाभिमानाने, ताठ मानेने, अन्यायाचा परिहार करण्यासाठी
दंड थोपटून धर्मसंकटात उभा राहिला. या काळाराम मंदिर प्रवेश
सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले.”आम्ही जर हिंदू असू तर आम्हाला
मंदिरात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही,” ही समानतेची वागणूक मिळावी
यासाठीचा हा लढा होता. तो डॉ. बाबासाहेबांसोबत त्यांच्या
हजारो अनुयायांनी निकराने लढला होता. याआधी सत्याग्रह समितीचे अध्यक्ष
म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली
होती. भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते. तर नाशिकचे
शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे
महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली.
केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवलाली येथे प्रथम २९ डिसेंबर १९२९ रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. नाशिकचे जिल्हाधाकारी आर.जी. गॉर्डन यांनी मध्यविभागाचे आयुक्त घोषाळ यांना सत्यागृहाची माहिती कळविली होती. त्यांच्या माहितीनुसार २ मार्च १९३० रोजी नाशिकमध्ये आठ हजार महार बांधव जमले होते. त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दरवाज्यांसमोर ठिय्या दिला होता. या सत्यागृहात सहभागी होण्यासाठी फक्त नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर रत्नागिरीसारख्या दुरवरच्या भागातून लोक आले होते. जोपर्यंत देवळाचे दरवाजे बंद आहेत तोपर्यंत सत्यागृहीचे पथक ठाण मांडून बसतील असे डॉ. आंबेडकरांनी जिल्हाधिकार्यांना सांगितले होते. कोणी दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न केला तर रांगेत जो पहिला त्याने आधी जावे या नियमानुसार सत्याग्रही आपल्याआधी देवळात जाऊ पाहाणार्यास प्रतिबंध करतील आणि शांततापूर्ण रितीने पुढे घुसतील असेही ठरले होते. २ मार्च १९३० रोजी सुरू झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, डी.व्ही.प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद हे होते.मंदिराचे दरवाजे जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरुन बंद करण्यात आले होते. उत्तर दरवाज्याजवळ पतितपावनदास, पूर्व दरवाजा येथे कचरू मथुजी साळवे, दक्षिण दरवाजा येथे पांडूरंग नथूजी राजभोज आणि पश्चिम दरवाजाजवळ शंकरदास नारायणदास नेतृत्व करत होते. बाबासाहेब आणि भाऊराव गायकवाड सर्व व्यवस्था पहात होते.सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड यांचा सभासद म्हणून समावेश केला होता.गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटीश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. एका तरुणाने रामकुंडात उडी घेतली पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यामुळे ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश, दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे काळारामांचा मंदिराजवळ आरएसएस वादी सनातन्यांनी दगडफेक केली. त्यात बाबासाहेबांसह शेकडो अनुयायी जखमी झाले होते. परंतू कोणाही मागे न हटल्याने सरकारला अखेर सत्याग्रहींपुढे झुकावेच लागले.आर्य सनातनी या आंदोलनामुळे खूप बैचेन झाले होते कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचे हे तिसरे पाऊल यशस्वी झाले होते.(क्रमश😊

No comments:
Post a Comment