Friday, June 1, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ७) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! केशव बळीराम हेगडेवार यांचा १९१५ मध्ये तर मोहन करमचंद गांधी यांचा १९१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि १९२१ मध्ये त्यांना नेतृत्व मिळाले...!


मोहन करमचंद गांधी यांचा जन्म १८६९ मध्ये झाला होता.याच काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवराय यांची पहिली शिवजयंती पुण्यामध्ये सुरु केली होती.१८७५ मध्ये गुजरात येथील काठीयावाड येथील टंकारा गावात स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापन केली होती.याच काठीयावाडचे मोहन गांधी यांचे वडील करमचंद गांधी दिवान होते.बाळकृष्ण गंगाधर टिळक व आगरकर यांनी १८८४ ला पहिली हिंदू महासभा आयोजित करून त्याचे १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये रुपांतर केले होते.भाऊ रंगारी म्हणजेच भाऊ लक्षमण जावळे या मराठा समाजाच्या व्यक्तीला हाताशी धरून गणपती उत्सव साजरा करण्याची तयारी करून १८९४ मध्ये पहिला सार्वजनिक गणपती त्याच्या हातून बसवून घेऊन १८९५ मध्ये तोच सार्वजनिक उत्सव आपल्या हातामध्ये घेऊन बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव सुरु करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरु करून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कार्य जोरात सुरु केले.१९१५ मध्ये केशव बळीराम हेगडेवार यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.त्यानंतर मोहन करमचंद गांधी यांचा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये १९१६ मध्ये प्रवेश झाला.१९२० मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांचे निधन झाल्यानंतर १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेतृत्व मोहन करमचंद गांधी यांचेकडे आले होते यावरून स्पष्टपणे दिसते की,भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक ब्राह्मणवादी संघटन म्हणून कार्य करीत होते.इकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण झालेले होते त्यांनी साप्ताहिक मूकनायकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु केली होती.साप्ताहिक मूकनायक मधील लिखाणामुळे कोल्हापुरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवाळ्याचे संबध प्रस्थापित झालेले होते.१९२२ मध्ये मोहन गांधी यांनी असहकाराची चळवळ सुरु केली होती.त्यामुळे राजद्रोहाचा आरोप करून मोहन गांधी यांना ब्रिटीश सरकारने तुरुंगात डांबले होते.१९२३ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रुपयाच्या समस्यावर एक अहवाल तयार केला होता.त्यानंतर भीमराव आंबेडकर यांना “डॉक्टर ओंफ सायन्स” ही पदवी मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संघटन जोरात सुरु झाले होते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment