लोथियन समिती: (मताधिकार समिती)
बाबासाहेब गोलमेज-२ मधे ब-याच मागण्या मागुन आलेत पण त्यातील अत्यंत
महत्वाची मागणी म्हणजे अस्पृश्यांना राजकीय अस्तीत्व मिळावे ही होती.
बाबासाहेबानी अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचा अधिकार
मागितला होता. खरं तर हे फक्त बाबासाहेबानीच हे मागीतलं नव्हतं तर शीख,
मुसलमान, ख्रिश्चन व इतर अल्पसंख्यांक लोकानीही याच मागण्या मागीतल्या
होत्या. पण गांधीनी वरील मागण्या अस्पृश्य सोडून इतर सगळ्यांसाठी देण्याचे
कबूल केले. फक्त अस्पृश्यानाच नकारल्या. गांधीच्या अशा अनेक गूढ
प्रकरणांचा एकंदरीत परिणाम असा झाला की राजकिय मागण्या मान्य करण्याआधी
भारतातील अस्पृश्य लोकांची खरी परिस्थीती काय आहे हे जाणुन घेण्यासाठी
लंडनहून एक समिती भारतात आली. त्या समितीचे अध्यक्ष लॉर्ड लोथियन होते,
म्हणुन त्या समितीचे नाव लोथियन समिती पडले. लोथियन समिती देशभर फिरून
अस्पृश्यांची पाहणी करणार होती. त्यांच्या मागण्या व ईतर गोष्टींचा
वृत्तांत लंड्नला पाठविल्यावर मतदानाचा अधिकार देण्याचे ठरविले जाणार होते.
या कामात बाबासाहेब स्वत: जातीने भाग घेण्यासाठी लगेच दिल्लीत हाजर झाले.
लोथियन समिती सोबत त्यानी देशभर दौरा केला. जागो जागी लोथियन समिती व
बाबासाहेबांचे जंगी स्वागत केले जात होते. भारतातील कानाकोप-यातील
अस्पृश्यानी समितीपुढे बाबासाहेब आमचे एकमेव अन बिनविरोध नेते असल्याच्या
भीमगर्जना करुन लोथियन साहेबांना भंडावुन सोडले. संयुक्त मतदार संघाचा
देशभरातून तमाम अस्पृश्य संघटनानी विरोध नोंदविला. स्वतंत्र मतदार संघ
मिळावा याची जागो जागी मागणी करण्यात आली अन दुहेरी मतदानाचा अधिकार
मागण्यात आला. तर ही झाली लोथीयन समितीच्या पुढे मांडलेली डिमांड.
(एम.डी.रामटेके) (क्रमश
No comments:
Post a Comment