Tuesday, June 12, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ३०) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! धर्मांतर मारण्यासाठीच महसुली प्रशासनात हिंदू शब्द लावण्याच्या पूर्वनियोजित खेळी.....!


सन १९४२ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापन केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कायदेमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.सन १९४७ मध्ये संविधानाच्या मुख्य समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस कार्य करून अतिशय मौल्यवान संविधान लिहून २६ नोव्हेंबर १९४८ रोजी भारताला समर्पित केले.ते संविधान २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आले होते.संपूर्ण स्त्री जातीला समानतेचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी त्यानी हिंदू कोड बिल लिहून ते संसदेत मांडले असता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पाठींबा असताना त्याला डॉ राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला.क्षणाचाही विचार न करता कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते बाहेर पडले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चीन या देशावर कधीही विश्वास नव्हता त्यांच्या बाबत त्यांची भूमिका कठोर होती.त्यांनी भारताला सावध केली होते की,चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे.अशा राष्ट्राबाबत भारताला गाफील राहून चालनार नाही.त्यामुळे आदर्शवादी दुष्टीकोनातून चीनची मैत्री करण्याचा प्रयत्न करू नये.मात्र चीन बाबत नेहरू समर्थनीय होते त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात चीनला सदस्यपद मिळावे म्हणून १९४७ साली त्यानी भारताच्या बाजूने जोरदार समर्थक केले या भूमिकेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरू यांचेवर टीका केलेली आहे.भारताने चीन संदर्भात सन १९५४ मध्ये पंचशील धोरण तयार करून ते संसदेमध्ये चर्चेला आणले होते.त्यावर टीका करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की,पंचशील धोरण हे बौध्द धर्माचे अविभाज्य घटक आहे.पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही.चीन जर तिबेटी लोकावर अन्याय करीत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे त्यांचे याठिकाणी राष्ट्रीयत्व दिसून येते.एकंदरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा जर आढावा घेतला तर त्यांनी आयुष्यभर कष्ट केल्याचेच दिसत आहे.त्यानी १९४५ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून या संस्थेच्या वतीने १९४६ मध्ये मुंबई येथे सिध्दार्थ कला व विज्ञान महाविद्यालय तर १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय तर १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ ला मुंबईत सिद्धार्थ सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरु केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा व लिहिण्याचा मोठा छंद होता.त्यासाठी त्यानी आपले राहते घर “राजगृहात” एक समृध्द ग्रंथालय उभारलेले आहे या ग्रंथालयात सुमारे ५०,००० ग्रंथ होती.त्यानी एकूण ५८ पुस्तके वा ग्रंथ लिहिले आहेत.(क्रमश😊

No comments:

Post a Comment