Sunday, June 10, 2018
फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १७) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! मोहन करमचंद गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यात संघर्ष सुरु “पुणे करार” भाग – १
गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न
येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२
लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना
झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख
कळविली. बाबासाहेब येणार म्हणून स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी
तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक
हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं
होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात
शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं
पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते करुन
अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर
मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली.
चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या.
बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या
मैदानात कित्येक वेळा उघडे पाडून गो-या साहेबांना गांधीमधला विलन कसा
दलितविरोधी आहे हे पद्धतशीरपणे पटवून दिले. दलितांचा बाप म्हणुन आपल्या
लेकराना जास्तीत जास्त अधिकार मिळवुन देताना बाबासाहेबांमधील विद्वान
अत्यंत मुद्देसुद अन तर्कसुसंगत वाद करत वस्तुनीष्ठ परिस्थीती अचुक मांडतो.
अशा प्रकारे सर्व शक्ती एकवटून गोलमेज-२ मधे आमचा बाप म्हणुन कर्तव्य
बजावताना लेकरांसाठी अतूल्य कामगिरी करणारा महाबली आज भारतात उतरत होता
त्यामुळे स्वागतासाठी तमाम आंबेडकरी जनता गगनभेदी आरोळ्या देत बंदरात जमली
होती. २९ जाने १९३२ रोजी बाबासाहेब मुंबईच्या बंदरात पाय ठेवतात. एक दिवस
आधीपासुन तिथे जमलेल्या सर्व भीमपुत्रानी गगनभेदी आरोळ्यानी बाबासाहेबांचं
जंगी स्वागत केले. समता सैनिक दलानी आपल्या राजाला मानवंदना दिली व भायखळा
मार्गे परळ पर्यंत बाबासाहेबांची मिरवणुक काढण्यात आली. वाटेत जागो जागी
बाबासाहेबांचा सत्कार व मानपत्र देऊन त्यांच्या गोलमेजच्या कार्याबद्दल
अस्पृश्य संघटनानी आभार मानले. अन शेवटी बाबासाहेब घरी पोहचले.
(एम.डी.रामटेके) (क्रमश
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment