Wednesday, June 13, 2018

(भाग – ३७) स्वराज्यातील रयत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावनिक होती याचाच गैरफायदा घेऊन दिल्लीत त्यांची हत्या करून त्यांचे अंत्यसंस्कार मुंबईतच होतील अशी तजवीज करण्यात आली....!


विषय असा आहे की,छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांचे बरोबर मावळातील १५० मावळे बरोबर होते.त्याच मावळ्यांना फक्त मावळे म्हटले जाते परंतु आज ती घराणे अस्तित्वात दिसत नाही.....त्यातली काही एक दोन घराणे दिसत आहे.स्वराज्य स्थापनेच्या खडतर प्रवासामध्ये कोणताही वैदिक धर्म पंडित शिवराय यांच्या सोबत नव्हता तर त्यांच्या सोबत होते ते अठरा पगड आणि बारा बलुतेदार परंतु ज्या वेळेस स्वराज्य स्थापले केले गेले तेव्हा मंत्रिमंडळात याच वैदिक धर्म पंडितांची पेशवे म्हणून आणि सुरनीस म्हणून वर्णी लागली गेली.जेव्हा युवराज शंभूराजे यांनी प्रशाकीय कारभारात लक्ष घातले तेव्हा या वैदिक धर्म पंडितांच्या काळग्या बाहेर येऊ लागल्या.जेव्हा युवराज शंभूराजे शाक्त पंथीय अनुयायी झाले आणि पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्मानुसार करण्यात येऊन त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तेव्हा याच धर्म पंडितांनी सोयराबाईना हाताशी धरून शिवरायांची विषप्रयोग करून हत्या करण्यात आली.औरंगाजेबाच्या हातून मनुस्मृती नुसार छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात येऊन त्यांना आर्य सनातनी हिंदू धर्माचे रक्षक बनवून “धर्मवीर” करण्यात आले.आता छत्रपती संभाजी महाराज धर्म पंडितांच्या आदेशावर चालत होते काय...? ते काय धर्म पंडितांचे गुलाम होते काय...? त्यांनी सांगायचे आणि शंभूराजे यांनी ऐकायचे असे होते काय...? असे बरेच प्रश्न उपस्थित होतात.तर तसे काही नाही जेव्हा पण या आर्य सनातनी लोकांची धर्म व्यवस्था अडचण येते तेव्हा त्यांच्याकडे हत्येशिवाय कोणताही पर्याय ते शिल्लक ठेवत नाही.परंतु अशी हत्या करताना ते काळजी घेत असतात.याच वैदिक धर्म पंडितांनी स्वत:चा वर्णाश्रम धर्मात अडसर असणारे वारकरी संप्रदायातील संताच्या हत्या केल्या आहेत.संत तुकाराम महाराज यांच्या हत्येचे गूढ तर सर्वांनाच माहित आहे.संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचे भावंडे ब्राह्मण कुळातील जरी होती तरी पण ती संत नामदेव महाराज यांच्या विचारांच्या प्रभावाखाली होती म्हणून याच वैदिक धर्म पंडितांनी त्यांच्या हत्या करून लहान संत ज्ञानेश्वर महाराजानी जिवंत समाधी घेतली आणि समाधी घेतेवेळी ३३ कोटी देव धर्तीवर उतरले होते अशी कथा तयार करून वैदिक धर्म त्यावर लादण्यात आला.या लोकांच्या मृत्यू षडयंत्रातून स्वयंम गौतम बुध्दही वाचले नाहीत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर या आर्य सनातनी यांची हजारो वर्षाची मनुस्मृती दहन करून त्यांचा मनुस्मृतीचा कायदाच मोडीत काढून स्वतंत्र भारताला संविधान दिलेले होते.या सर्व बाबींचा आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला होता ते अतिशय सावध होते आणि त्यांनी सावधगिरीनेच कार्य केले होते.परंतु ज्या बौध्द धर्मावर ताबा मारून तो आपल्या ताब्यात घेण्याचे काम या आर्य सनातनी यांनी केले होते.इथल्या सिंधू संस्कृतीच्या परंपरेवर ताबा या आर्य सनातन वृत्तीने मिळविला होता.त्यांच्या ताब्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची सुटका १९५६ मध्ये केली होती.आणि अशी घोषणा दिली होती की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन..या त्यांच्या वाक्यामुळे संपूर्ण आर्य सनातन व्यावस्था हादरून गेली होती...कारण नुसती मी धम्म दीक्षा घेणार आहे असे म्हणून ते नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायला गेले तर त्यांचे बरोबर लाखोचा जनसमुदाय त्याठिकाणी धम्म दीक्षा घेण्यासाठी आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे धम्म दीक्षा घेत असताना त्यांनी ज्या २२ प्रतिज्ञाचे वाचन करून त्या आत्मसात केल्या त्याचा जर आपण बारकाईने आभ्यास केला तर असे लक्षात येते की,त्या २२ प्रतिज्ञामध्ये त्यांनी सिंधू संस्कृतीचे जतन केल्याचे दिसून येते.त्यामुळे संपूर्ण भारत पुन्हा एकदा बौध्यमय होण्यास वेळ लागणार नव्हता याची संपूर्ण कल्पना आर्य सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेला झाली होती.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रोखायचे होते.परंतु ते बोलून किंवा धमकावून ऐकणारे नव्हते याची पूर्ण कल्पना त्या आर्य सनातनी वृत्तीला होती.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आत्ता फक्त २२ प्रतिज्ञा लोकापर्यंत पोहोचवयाच्या होत्या.परंतु धम्म दीक्षा घेतल्यानंतर तीनच आठवड्यात त्यांचेवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती.हे षडयंत्र तीनच आठवड्याचे होते परंतु ते इतके भयानक पद्धतीत रचले गेले होते की,शिकलेला वर्ग या आर्य सनातनी यांनी केव्हा आपल्या बाजूला वळविला याचे भानच कोणाला राहिले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या स्वराज्यात करणे शक्य नव्हते त्यांची हत्या परदेशातही करणे शक्य नव्हते.कारण स्वराज्यातील रयत त्यांचा बरोबर होती आणि त्यांच्या विद्वत्तेवर परदेशी खुश होते आनंदित होते.परंतु दिल्ली ही आर्य सनातनी यांच्या ताब्यात होती आणि स्वराज्यातील रयत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावनिक होती याचा गैरफायदा घेऊन दिल्लीत त्यांची हत्या करून त्यांचे अंत्यसंस्कार मुंबईतच झाले पाहिजे जेणेकरून दिल्ली टार्गेट होणार नाही आणि ही हत्या भावनिकतेचा आधार घेऊन ही हत्या पचविता येईल.(क्रमश😊

No comments:

Post a Comment