डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर याच दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९२४
मध्ये “समता सैनिक दल” स्थापन करून त्यांनी कायस्थ प्रभू असणारे ब्राह्मण
यांच्याशी संबध प्रस्थापित करून त्यांनी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेच्या
विरोधात समता प्रस्थापित करण्याचा संघर्ष सुरु केला.छत्रपती यांच्या काळातील वैदिक
धर्म पंडित म्हणजे आजचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होय.आणि कायस्थ प्रभू ब्राह्मण
म्हणजे भारतीय मुळ निवासी होय. कायस्थ प्रभू यांचेवर या वैदिक धर्म पंडितांनी खूप
अन्याय केलेला आहे.इतिहासात कायस्थ प्रभू नेहमी छत्रपती शिवराय यांच्या बरोबर
राहिलेले आहेत.या कायस्थ प्रभू यांचा आणि मनुस्मृतीचा काहीही संबध नाही परंतु हेही
या मनुस्मृतीचे शिकार झालेले आहेत हे जेव्हा डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या लक्षात
आले तेव्हा त्यांनी या लोकांना जवळ करून मनुस्मृतीच्या विरोधात आणि स्वराज्याच्या
समर्थनार्थ प्रबोधन कार्य जोरात सुरु केले.छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती
प्रमाणे हत्या झाल्याची त्यांना कल्पना आलेले होती.आणि इतिहासात महार समाज हा
योध्दा होता आणि स्वराज्यात त्याला मोलाचे स्थान होते आणि आपण महार योध्दा
घराण्यातील आहोत हेही त्यांना माहित झालेले होते.महार समाजातील शौर्य दडपून
टाकण्यासाठी अस्पृश्यता निर्माण केल्याचे त्यांच्या लक्षात आलेले होते.आणि यासाठीच
हिंदू धर्म स्थापन करून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेने मनुस्मृतीचा अमल
जोरात सुरु केला आहे.यासाठीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही मनुस्मृती दहन केली
पाहिजे असे म्हटले आहे.याबाबतची कल्पना इथल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेला
आलेली होती.त्यांच्या लक्षात आले की, डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर याच दिनाचे औचित्य
साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले आहे.आणि आता हे पुन्हा
एकदा आपण डूबविलेली समता पुन्हा प्रस्थापित करणार याला आपण रोखले पाहिजे.तेव्हा
ब्राह्मणी व्यवस्थेने पहिल्या हिंदू
महासभेचे केलेले भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये १९१५ साली प्रवेश केलेले केशव
बळीराम हेगडेवार १९२५ मध्ये बाहेर पडले आणि त्यांनी या समतेला रोखण्यासाठी २५
नोव्हेंबर १९२५ मध्ये “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” म्हणजेच (आरएसएस) स्थापन केला
आहे. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचारांना छेद देण्यासाठीच स्थापन केलेले संघटन
म्हणजेच “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” होय.
No comments:
Post a Comment