Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २५) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! ‘‘हिंदू धर्म हा मुळ धर्मच राहिलेला नाही.’’ परंतु हिंदू संस्कृतीचे कोणतेही नुकसान होणार नाही याची मी काळजी घेईन डॉ बाबासाहेब आंबेडकर येवला येथील भाषणात म्हणाले होते......!


समता सैनिक दल स्थापन केल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आंदोलन पहाता चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या माध्यामतून हिंदू धर्माचे झालेले हल्ले शुद्रातून अति शुद्र म्हणून दिलेली वागणूक आणि सायमन कमिशनच्या माध्यामतून झालेली गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांची मांडलेली बाजू मोहन गांधींचा विरोध सनातनी हिंदूचे आपले अस्पृश्य बरोबर घेऊन झालेले हल्ले तसेच अस्पृश्यांना ठरविलेले हरिजन आणि पुणे कराराच्या माध्यामतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीने भावनिक हताश करून हिराऊन घेतलेले हक्क अधिकार हा आर्य सनातनी हिंदू धर्माचा आपल्या अस्पृश्य गद्दारांना बरोबर घेऊ केलेले हल्ले यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गहन विचार केला आणि ठरविले की,जर हिंदू असून हिंधू धर्मात अस्पृश्यांची गळचेपी हौउन एवढा जर अन्याय होत असेल तर या धर्मात राहून उपयोग नाही.तेव्हा त्यानी संपूर्ण घडामोडीचा आभ्यास करून आर्य सनातनी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे झालेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू” असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पस्ष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’
मोहन गांधीच्या  भूमिकेला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, ‘‘मनुष्यमात्राला धर्म आवश्यक आहे, हे गांधींचे म्हणणे मला मान्य आहे. परंतु एखादा धर्म एखाद्या व्यक्तीला तिच्या खऱ्या धर्माविषयीच्या कल्पनेला अनुसरून स्वत:च्या व्यक्तिविकासाला व कल्याणाला स्फूर्तिप्रद होणारा व आपल्या वागणुकीचे ज्या नियमांनी नियमन करणे तिला श्रेयस्कर वाटते, त्या नियमांचा अंतर्भाव करणारा असा नसेल तर तो केवळ आपल्या बापजाद्यांचा धर्म म्हणूनच तिने त्याला चिकटून राहिले पाहिजे हा मात्र त्यांचा दंडक मुळीच कबूल नाही. धर्मांतर करण्याचा माझा निश्चय हा झालाच आहे. बहुजन समाज माझ्या पावलावर पाऊल ठेवून येईल की नाही याची मला पर्वा नाही. तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना त्यात हित वाटत असेल तर ते माझे अनुकरण करतीलच.’’ त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा देऊन स्पष्ट केले की ‘‘थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. तुम्ही सर्व आलात तरच मला तुमचे काही हित करता येईल. त्यासाठी वेळ हा लागणारच आणि तेवढा वेळ मी थांबणार आहे.’’ डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हिंदू धर्म हा मुळ धर्मच राहिलेला नाही.’’ धर्मांतरासंबंधी तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ विवेचन करताना बाबासाहेब म्हणाले की, ‘‘धर्मांतरांच्या विषयावर जसा सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्त्विकदृष्ट्याही विचार केला पाहिजे. अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची बाब झाली आहे असे अनेक दैनंदिन घटनांवरून दिसून येते. मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य आवश्यक असते. एक मनुष्यबळ, दुसरे द्रव्यबल व तिसरे मानसिक बल. सामर्थ्य असल्याशिवाय जुलमाला प्रतिकार करता येणार नाही. प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून धर्मांतर करून अन्य समाजात अंतर्भूत झाल्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही.’’ असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment