Wednesday, June 13, 2018

(भाग – ३४) आपण आपली श्रद्धा ठेवली पाहिजे पण त्या श्रद्धेपोटी आपण अंधश्रद्धाळू केव्हा होते हे आपल्याला कळत नाही....!


आपण भाग १ ते ३३ मध्ये भगवा ध्वज समजून घेऊन शहाजीराजे - माता जिजाऊ - छत्रपती शिवराय - शंभूराजे - फुले – शाहू- आंबेडकर यांचे भगव्या विचरा संदर्भात असलेले प्रेम समजून घेतले आहे.त्यांचे कार्य समजून घेतले आहे.त्यांना झालेला सामजिक व धार्मिक विरोध समजून घेतला आहे.तरीही मानव कल्याणासाठी यांनी न डगमगता आपले कार्य करीत आपले प्राण देखील दिले आहेत.वैदिक धर्मीय आणि आर्य सनातनी हिंदू धर्मीय यांनी आपल्याच लोकांच्या माध्यमातून दिलेला त्रास आपण समजून घेतला आहे.तरीही समता प्रस्थापित करण्यासाठीच यांनी कार्य केल्याचे स्पष्टपणे आपल्याला समजले आहे आणि समता प्रस्थपित केली आहे....म्हणूनच यांची हत्या झालेली आहे.छत्रपती संभाजी महाराज जर औरंगाजेबाच्या तावडीतून सुटले असते तर आजचा भारत देश वेगळा असता हे आता आपल्याला माहित झाले आहे.आणि बौध्द धम्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर जर आणखी ५ ते १० वर्ष जगले असते तर आजचा भारत देश वेगळा असता हेही आता आपल्याला माहित झाले आहे.परंतु आर्य सनातनी वृत्ती एवढी भयानक आहे की,त्याचा प्रत्यय आपल्याला इतिहासात गेला की समजतो.त्याचे कारण असे आहे की या भारत देशाला सिंधू संस्कृतीची जोड आहे म्हणजे सभ्यतेची जोड आहे.आणि हीच आपली सभ्यता आर्य सनातनी व्यवस्थेने त्यांचे हत्यार बनविलेले आहे.आणि या सभ्यतेतून निर्माण होते ती भावनिकता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.परंतु आजचे जग हे आधुनिक जग आहे या जगात जगत असताना आपण सिंधू संस्कृती तर जपली पाहिजे परंतु याच बरोबर व्यावहारिक दुष्टीकोनही ठेवला पाहिजे.जो आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्यात असताना सांगितला आहे ते असे म्हणतात की,”मला देव तुम्ही मानु नका” त्याचे कारण असे आहे की,एकदा का आपण आपले असे केली की,आपण व्यावहारिक दुष्टीकोनातून बाहेर जातो आणि जेथे आपली भावना जुडली जाते त्याचा गैरफायदा घेऊन आपल्यावर काही लोक आघात करीत असतात.मग आपल्याला त्या भावनिकतेचे गुलाम करून त्यांना मनमानेल तसे कार्य आपल्याकडून करून घेतली जातात.आपण आपली श्रद्धा ठेवली पाहिजे पण त्या श्रद्धेपोटी आपण अंधश्रद्धाळू केव्हा होते हे आपल्याला कळत नाही....आणि मग आपले नुकसान होते.हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला सांगायचे होते ते आपण कधीही ऐकले नाही.आपण भावनिकदृष्ट्या एवढे आंधळे होतो की,त्या आंधळेपणात खरे काय..? सत्य काय...? हे समजून घेत नाही.मग इथली व्यवस्था त्याचा फायदा घेऊन आपले नुकसान करते...आणि तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत घडले आहे.(क्रमश😊

No comments:

Post a Comment