Friday, June 8, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १६) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! मोहन गांधी यांनी अस्पृश्याचा मीच कसा हितचिंतक आहे हे दाखविण्यासाठी त्यांना “हरिजन” ही उपाधी देऊन “हरिजन पत्र” तीन भाषेत सुरु केले होते....!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केल्यानंतर इ.स. १९३० मध्ये डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन स्थापन केले होते.याकाळात काळाराम मंदिराचाही प्रश्न मार्गी लावला होता.एकंदरीत त्यांच्या या कामावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नाराज होत चालेलेली होती.कारण हे संघटन स्वातंत्र्याची लढाई करण्यापेक्षा आपले स्वत:चे ब्रिटीश प्रशासनात स्थान कसे बळकट होईल आणि इथली राजव्यवस्था ताब्यात येऊन आपली धर्म व्यवस्था कशी मजबूत होईल याचीच ते काळजी करीत होते.परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून एक मोठा धक्काच दिलेला होता.सायमन कमिशन भारतात जातीय जनगणना करून इथली सामजिक व्यवस्था समजून घेऊन त्याप्रमाणे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून भारताची राजव्यवस्था त्यांच्या हातामध्ये देणार होते.त्याप्रमाणे पहिली व दुसरी गोलमेज परिषद १९३१ मध्ये बोलविण्यात आलेली होती.यावेळी मोहन गांधी राजद्रोहाच्या आरोपात तुरुंगात होते.अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे हक्क आणि अधिकार काय असतील असा प्रश्न उपस्थित केला होता.परंतु अस्पृश्य हिंदूपासून वेगळे नसल्यामुळे त्यांचा वेगळा विचार करता येणार नाही असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने वारंवार जाहीर करण्यात येत होते.१९३२ मध्ये मोहन गांधी तुरुंगातून बाहेर आले आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला ते हजर झाले होते.मात्र १९२४ ते १९३२ दरम्यान मोहन गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी झालेल्या होत्या.कोणत्याही परिस्थितीत मोहन गांधी यांना अस्पृश्य यांचे नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये जाऊन द्यायचे नव्हते.मीच या अस्पृश्यांचा कसा हितचिंतक आहे असे त्यांना दाखवायचे त्यासाठी त्यांनी असृश्यांना “हरिजन” असे नाव देऊन “हरिजन पत्र” सुरु केले होते.त्यांनी हे पत्र तीन भाषेत प्रसारित केले १) हरिजन बंधू (गुजराती) २) हरिजन सेवक (हिंदी) आणि ३) हरिजन (इंग्रजी) असे होते. “हरिजन” या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आक्षेप घेत मोहन करमचंद गांधी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.गांधी वरील टीका त्यांच्या अनुयायी यांना पचली नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करण्यास सुरुवात केली.संपूर्ण भारतामध्ये गांधी विरुध्द आंबेडकर असा संघर्ष मोठ्या प्रमाणात उभा राहिला होता.मोहन गांधी सैरभैर झाले होते कारण संपूर्ण भरावर आपल्या स्वत:चेच नेतृत्व त्यांना लादायचे होते परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुले तो मनसुभा पूर्ण होताना त्यांना दिसत नव्हता.त्यामुळे मोहन करमचंद गांधी यांनी संपूर्ण भारत त्यानी केंद्रस्थानी ठेवला होता.(क्रमश😊

No comments:

Post a Comment