निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये निसर्गाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच वने व वन्यजीवांबद्दल जागृती निर्माण करुन त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनामध्ये सहभाग वाढावा यासाठी वनविभागाने पुढाकार घेऊन सेमाडोह येथे निसर्ग शिक्षण आणि निर्वाचन संकुल सुरु केले आहे. निसर्गाशी मैत्री करा पण त्यांच्या संवर्धनाची सुध्दा काळजी घ्या हा संदेश वन्य पर्यटकांमध्ये पोहोचविण्याचा मुख्य उद्देश सिपना वन्यजीव विभागाचा आहे.
सातपुड्याच्या विस्तीर्ण पर्वतरांगांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प असून देशातील सुरुवातीच्या पहिल्या नऊ व्या प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा सामावशे करण्यात आला होता. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. उंच, सरळ तसेच पर्वतरांगांमध्ये विविध प्रजातींच्या जंगलाने व्यापलेल्या सुंदर वनांमध्ये वाघ, सांबर, गव्हा, राणकुत्री, कोल्हे, चितळ विविध प्रजातीचे प्राणी वास्तव्यास आहे. उडती खार हे या जंगलाचे मुख्य आकर्षण आहे.
सिपना वन्यजीव विभागात सर्प, गरुड, मोर, रानकोंबड्या आदी विविध पक्षी वास्तव्यास आहे.
समृध्द वन्यजीव व निसर्गाबद्दल पर्यटकांना माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी निसर्ग शिक्षण व निर्वाचन संकुल सुरु करण्यात आले आहे. या संकुलात पर्यटकांना मुक्कामाच्या दृष्टीने सिपना नदीच्या काठावर आकर्षक कुट्या तयार करण्यात आल्या आहे. यात निवासी संकुल उभारण्यात आले आहे. निसर्ग अभ्यासक, वनपर्यटक व विद्यार्थ्यांना येथे वास्तव्य करुन निसर्गाचा अभ्यास करणे सुलभ झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबद्दलची संपूर्ण माहिती तसेच आदिवासींच्या जीवनशैलीची माहिती देणारे प्रदर्शन दालन पर्यटकांना मेळघाटाचे वनक्षेत्र ,वनस्पती, प्राणी, पक्षी व लोकजीवनाची माहिती करुन देणारे सुसज्ज संग्रालय सुरु करण्यात आले आहे. मेळघाट संबंधीची उपयुक्त माहिती दर्शविणारे फलके येथे लावण्यात आली आहे. तसेच वन्य जीवनाबद्दल चित्रपट व द्रुकश्राव्य साधनांच्या माध्यमातूनही माहिती देण्यासाठी खुल्या चित्रपट गृहाची निर्मिती करण्यात आली आहे.
वनपर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता यावा यासाठी सेमाडोड आणि रायपूर व्याघ्र प्रकल्प परिक्षेत्रातील निवड ५८.५२ चौ. किलोमिटर क्षेत्रात पर्यटन क्षेत्राची निर्मिती केली असल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रविण कुमार बडगे यांनी दिली. पर्यटक वनक्षेत्राला भेटी देण्यासाठी येतात. परंतू त्यांना वनाची व वन्यजीवाची माहिती व्हावी, तसेच अभ्यासकांसाठी येणाऱ्या पर्यटकांना आपले निरिक्षण कार्यपूर्ण करता यावे. यासाठी पर्यटन क्षेत्र निश्चित केले आहे. पर्यटन क्षेत्रांना जातांना मार्गदर्शक सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. पर्यटक आपले वाहन सोबत नेऊ शकतात. तसेच वनविभागातर्फे दोन बसेस संकुल परिसरात पर्यटकांच्या सोबत आहे.
पर्यटन क्षेत्राच्या भ्रमंती दरम्यान पर्यटकांना सुंदर वनक्षेत्र, निसर्गाचे देखावे, नदी, नाले, याशिवाय वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, सांभर, निलगाय, चितळ, रानकुत्रे व विविध पक्षी दृष्टीस पडू शकतात.
सेमाडोह निसर्ग शिक्षण आणि निर्वाचन संकुल हे राज्यातील व देशातील मॉडेल केंद्र आहे. नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने या केंद्राला भेट दिली. वनाच्या सानिध्यात असलेले तसेच जैवविविधता असलेले भारतातील प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख या प्रकल्पाबद्दल त्यांनी केला. या केंद्रामुळे स्थानिक आदिवासी (कोरकू संस्कृति) वन्यजीव आणि इतर महत्वपूर्ण प्रजातींचे रक्षणासाठी लोकसहभाग मिळविण्याचा महत्वपूर्ण कार्याला चालना मिळत आहे. सेमाडोह वनपर्यटन संकुलामुळे पर्यटकांना निवास व जंगल वाचनाच्या सुविधेसोबत येथील आदिवासी करिता रोजगार उपलब्ध होत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह पर्यटन संकुलामध्ये पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था असून आरक्षण वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प कॅम्प रोड अमरावती (दुरध्वनी क्र. ०७२१-२६६२७९२) येथे करता येऊ शकेल. सुंदर वनाच्या सहवासात तसेच निसर्गाच्या सानिध्यात आपणालाही वास्तव्य करता येऊ शकेल. यासाठी आपणाला निसर्गाच्या संरक्षण व संवर्धनामध्ये आपला सहभाग असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment