महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमतर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम राबविले जातात. त्यापैकीच एक म्हणजे बचतगट. अशा बचतगटाच्या माध्यमातून विकास साधणाऱ्या कुही तालुक्यातील आगरगाव या गावातील महिलांची ही गोष्ट आहे.
कुहीपासून १६ किलोमीटर अंतराव आगरगाव नावाचं ५३ कुटूंब असलेलं गाव आहे. आगरगाव हे पुर्नस्थापीत गाव आहे. विकासापासून काही कोस अंतरावर दूर असलेल्या या गावात मामिमच्या फुलनबाई पाटील यांनी माहिलांना प्रोत्साहन देणे सुरुवात केली. सुरुवातील महिला बचतगटासाठी तयार होतील का किंवा बचतगट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतील काय याविषयी त्यांच्या मनात साशंकता होती. मात्र त्यांच्या प्रोत्साहनामुळे दहा महिलांनी एकत्रित येऊन सबरी नावाचा बचतगट तयार केला. २००४ साली. आणखी त्यातूनच प्रगती आणि अनुसया या दोन बचतगटाची निर्मिती झाली.
संयोगिनी असलेल्या फुलनबाईमुळे ही बचतगटांनी त्या परिसरातील अग्रणी बँकेकडून श्रेणी प्रमाणपत्र मिळाले. सुरुवातीला तिनही बचतगटांना एक हजार ते १५ हजार पर्यंतचे कर्ज मिळाले. सबरी बचतगटाने तर बकऱ्यांसाठी ५० हजारापर्यंतचे कर्ज घेतले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कर्जाची रक्कम त्यांनी अगदी वेळेत पूर्ण केली. एवढेच नव्हे तर या बचतगटाने गावात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी पाच हजार रुपये दिले. आणि स्थानिक समितीने ५ हजार रुपये देऊन गावातील हातपंपाची दुरुस्ती केली आणि गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. अशा प्रकारे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. या उक्तीप्रमाणे महिला बचतगटाने आपले आर्थिक हित साधले पण गावातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सोडविला.
No comments:
Post a Comment