या बचत गटास खेळते भांडवल शासनाने दिलेले अनुदान याचा योग्य तो फायदा उठवत गटाने आपली यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न चालवला व दिलेले रुपये २५,००० कर्ज फेड वेळीच करत त्यांनी शासनाने दिलेले १ लाख रुपये एवढया रकमेचे अनुदान कायमस्वरुपी खेळते भांडवलाचा फायदा मिळवून घेतला.
आपल्या गटातील सर्व सहकार्याच्या मदतीने एकमेकांना मदतीचा व सहकार्याचा हात देत ते वाटचाल करीत राहीले. सन २००९-२०१० या आर्थिक वर्षात बँकेने २ लाख ४० हजार रुपये कर्ज दिल्यामुळे त्यांनी आपल्या आर्थिक उन्नतीकडे खास लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
सदरील कर्ज त्यांनी वेळेवर व नियमितपणे फेडण्याचा संकल्प केला असून त्यांनी कर्ज विहीत मुदतीत फेडल्यास त्यांना ४ टक्के दराने कर्ज वापरण्यास मिळेल. याबाबत विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी महत्व पटवून दिलेले आहे. या मार्गदर्शनाप्रमाणे वेळेत कर्ज फेड करण्याचा गटाने संकल्प केला आहे. त्यामुळे त्यांना सवलत व्याजाचा फायदा होणार असून त्यांना शासकीय अनुदानाचाही फायदा निश्चितपणे होणार आहे.
गटातील महिलांना मिळालेले फायदे व महिलांच्या संघटन शक्तीचा प्रभाव गावात ब-याच बाबतीत घडताना दिसून येत असून परिसरातील इतर महिलांनाही गटातील सदस्या विविध महिलांच्या समस्या सामाजिक जाणिवेतून सोडविण्याचा कल वाढीस लागल्याबाबत गावातील महिला व नागरिक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
छावडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने वनराई बंधारे, वृक्ष लागवड, ट्रिपल पोलिओ, ग्राम सफाई, अंगणवाडीस आहार पुरवठा असे विविध सामाजिक उपक्रम राबवून इतर महिला बचत गटांसमोर तसेच समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
No comments:
Post a Comment