अंतराळातील वस्तू मानवासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरल्या आहेत. विश्वाचे स्वरुप कसे व ते किती व्यापक आहे ? ते कशापासून बनलेले आहे ? ग्रह व तारे हे नेमके काय असून त्यांच्यामधील फरक कोणता ? आकाशगंगा म्हणजे काय? कृष्णविवर म्हणजे काय ? विश्वाची सुरुवात कशी व केव्हा झाली ? अती विस्तृत अशा विश्वात पृथ्वी शिवाय इतर कुठे जीवसृष्टी आहे काय ?
प्रत्येकाच्या मनात असे कुतुहलाचे प्रश्न कधीतरी निर्माण होतातच पण त्यांची समाधानकारक उत्तरे कुठे शोधायची ? अशा वेळी तारांगणाची भूमिका महत्त्चाची ठरु शकते. तारांगण हे एक घुमटाकार प्रेक्षागृह असून त्यात ताऱ्यांनी भरलेले आकाश व विश्वातील अगणित दृश्य वस्तूंच्या प्रतिमांचे प्रक्षेपण केले जाते. ज्यातून एक अविस्मरणीय असा शैक्षणिक अनुभव मिळतो व त्यामुळे खगोलशास्त्र व तत्सम विज्ञानाचे शिक्षण अगदी सहज रितीने मिळवता येते. तारांगणात पहिल्यांदाच येणाऱ्या प्रेक्षकांसाठी रणरणत्या उन्हात भर दिवसा, रात्रीच्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचे दर्शन म्हणजे पुलकीत करणारा अनुभव असतो.
रामन विज्ञान केंद्र, नागपूर येथील तारांगण आता प्रक्षेपणाच्या अत्याधुनिक मिश्रीत तंत्रज्ञानासह सज्ज झाले आहे. मिश्रीत प्रक्षेपण तंत्रज्ञान, यामध्ये ऑप्टोमेकॅनिकल व अत्याधुनिक डिजीटल प्रोजेक्टरर्स चा समावेश आहे.
आधुनिक संगणकाच्या जाळयाने या दोन्ही प्रक्षेपण प्रध्दतीचं एकमेकांशी सुसंगतीकरण केले आहे. या दोहोच्या मिश्रीत प्रक्षेपणामुळे ताऱ्यांच्या वास्तविक सुस्पष्ट रचना व बरोबरीने चलचित्र, रेखाचित्रे असा एकत्रित परिणाम मिळतो. तारांगणातील दृक-श्राव्य परिणामांच्या जोडीला डिजीटल तंत्रज्ञानाची भर पडल्यामुळे शिक्षणाचा आनंद व्दिगुणित होतो व मनोरंजनात्मक सहवासाची अनुभुती होते. रामन तारांगणातील संपूर्ण वातानुकुलित अशा ११ मीटर व्यासाच्या घुमटाकार प्रेक्षागृहाची प्रेक्षक क्षमता ११० आहे.
रामन विज्ञान केंद्रातील मनोरंजक विज्ञान माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान अण्वेषण विज्ञान बाग प्रागैतिहासिक प्राणी उद्यान-ध्वनी व प्रकाश शो इत्यादी मनोरंजनात्मक विज्ञान शिक्षण देणाऱ्या प्रदर्शनांनी सज्ज दालने व विविध विज्ञान उपक्रमांतून सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो.
विश्वाचे समन्वेषण - गॅलिलीओच्या मदतीने अंतराळाची ओळख
४० मिनिटांच्या या कार्यक्रमात रात्रीचे आकाश, राशी नक्षत्र, विश्वासबंधींचे ज्ञान, चंद्र, पृथ्वी, गुरु व शनी यांसारखे ग्रह तसेच मंदाकिनी आकाशगंगा व अंतराळातील इतर इनेक वस्तूंची इस्तंभूत माहिती मिळते.
गॉलिलीओचा पवित्र आत्मा, आपल्याला उत्तर गोलार्धावरुन दिसणाऱ्या आकाशाची व सखोल अवकाशातून सफर घडवून आणतो. या कार्यक्रमात डिजीटल व्हिडीओ व ऑप्टोमेकॅनिकल प्रोजेक्टरच्या साहयाने त्रिमितीय प्रक्षेपणातून सूर्यमालेबद्दल अगदी प्राचीन ज्ञान तसेच आधुनिक माहिती दिली जाते
No comments:
Post a Comment