मनोहर भिडे यांनी छत्रपती संभाजी
महाराज यांचे संभाजी हे नाव धारण करून झालेले संभाजी भिडे जर मनुस्मृतीची पुन्हा
एकदा अमलबजावणी करा म्हणून जाहीर सांगत असतील तर हाच खरा देशद्रोह आहे.महात्मा
ज्योतिबा फुले यांनी समतावादी छत्रपती शिवरायांचे दर्शन आम्हाला देऊन समतेचे
स्वराज्य दाखविले अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना जर हाच मनोहर भिडे देशद्रोही
म्हणत असेल तर हा संभाजी भिडे स्वराज्यद्रोही आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतले
पाहिजे.असा देशद्रोही व स्वराज्यद्रोही जर पुन्हा एकदा भीमा कोरेगावचे निमित्त
साधून स्वराज्याच्या अलुतेदार व बलुतेदार यांच्यावर हल्ला करीत असेल तर अशा
व्यक्तीचे संभाजी नाव काढून त्याला देशद्रोही आणि स्वराज्यद्रोही ठरवून तुरुंगात
डांबून टाकले पाहिजे.अशी असणारी खरी परिस्थिती असताना जर केवळ या देशाचे
प्रधानमंत्री श्री मोदी यांचे संभाजी भिडे गुरु आहेत म्हणून त्यांना क्लीन चीट
देणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडवणीस सुध्दा दोषी आहेत अशी असणारी
परिस्थती आहे.अलुतेदार आणि बलुतेदार यांचे हे राज्य चालवीत नसून मनुवादी
व्यवस्थेचे राज्य चालवीत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.छत्रपती संभाजी
महाराज यांचा सत्य इतिहास रयतेसमोर येऊ नये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन
केलेली मनुस्मृती पहाता हे राज्य साविधांनाचे आहे याची सल वारंवार या मनुवादी
व्यवस्थेला होत आहे.हीच मनुवादी व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश
आंबेडकर यांना बदनाम करून अलुतेदार व बलुतेदार यांच्या पासून तोडण्याचे हे एक
मनुवादी षड्यंत्र आखीत आहे. म्हणून प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहेत असा प्रचार
करण्याचा प्रयत्न जोरात सुरु झालेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.एखादी खोटी
गोष्ट १०० वेळा बोलली की,ती खरी वाटायला लागते त्यामुळे ही खोटी गोष्ट पोलिसांच्या
माध्यमातून जनते समोर पोहचविण्याचा डाव या मनुवादी षडयंत्राने आखला आहे.पुणे
शहराचे सह पोलीस आयुक्त श्री रविंद्र कदम यांचे माध्यमातून एक वातावरण निर्माण
करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.आता प्रश्न असा आहे की,या रवींद्र कदम यांना डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू श्री प्रकाश आंबेडकर हे नक्षलवादी आहेत असे सांगायला कोण लावले
आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.यल्गार परिषद कोण
भरविली..? त्याला निधी
कोणी दिला...? हे
सर्वांना माहित आहे.असे असताना जर एकटेच प्रकाश आंबेडकर जर टार्गेट होत असतील तर
हे मनुवादी षड्यंत्र आखले गेले आहे असे आपल्याला मान्य करावेच लागेल.कारण या
मनुवादी व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला १०० वर्ष
पूर्ण होऊ द्यायची नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.भारत देशाची राज्यघटना बदलणे
हेच “एकमेव ध्येय” या मनुवादी व्यवस्थेचे असल्यामुळे आणि या राज्यघटनेचे संरक्षणार्थ
एकमेव प्रकाश आंबेडकरच आहेत हे मनुवादी व्यवस्थेच्या लक्षात आलेले आहे.त्यामुळे “नक्षलवादी”
म्हणून प्रकाश आंबेडकर यांना बदनाम केल्यास विरोध करणारा कोणीही व्यक्ती शिल्लक
रहात नाही.पुढील काळात भारताचे संविधान बदलणे हाच एकमेव उपक्रम मनुवादी व्यावस्थेचा
असून प्रकाश आंबेडकर यांना “नक्षलवादी”
म्हणणे ही एक नांदी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या मनुवादी व्यवस्थेचे काही रमणाधारी
लोक आपल्या चळवळीमध्ये आहेत हे विसरून चालणार नाही.त्यामुळे जर स्वतंत्र भारताला
संविधान देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी
नक्षलवादी आहे...!
होय मी नक्षलवादी आहे.....!
१ छत्रपती शिवरायांचे स्वराज्य
पुर्नस्थापित करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर
होय मी नक्षलवादी आहे...!
२ छत्रपती शिवरायांचे समतावादी स्वराज्य
दाखविणारे महात्मा फुले यांना गुरु मानणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
३ जातीवादी पेशवाईचा अंत करून
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचे सरदार
सिद्धनाक महार यांची शौर्य गाथा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ दाखविणारे डॉ
बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
४ चवदार तळ्याचा सत्याग्रह करून
अस्पृश्यांना न्याय देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर
नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
५ चातुवर्ण व्यवस्थेचे प्रतिक
मनुस्मृती दहन करून मनूच्या विळख्यातून मानवाला मुक्त करणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी
आहे...!
६ छत्रपती राजश्री शाहू महाराज जर डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करीत असतील अशा डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी
आहे...!
७ भारतीय रिजर्व्ह बँक ज्या
व्यक्तीच्या आभ्यासावर स्थापन झाली अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
८ संपूर्ण मागासलेल्या लोकांचे
गोलमेज परिषदेत प्रतिनिधित्व करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
९ स्वातंत्र भारताला अशोक स्तंभ देऊन
भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१० स्वातंत्र भारताचा ध्वज स्वराज्याचा
भगवा ध्वज असावा म्हणून आग्रही राहणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
११ स्वातंत्र भारताच्या तिरंग्यामध्ये
अशोक चक्र देऊन भारताची प्राचीन ओळख दाखविणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१२ स्वातंत्र भारताच्या प्रत्येक
नागरिकांना मुलभूत हक्क व अधिकार देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू जर नक्षलवादी असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
१३ स्वातंत्र भारताला शांततेचा
मार्ग जगातला पहिला धर्म बौध्द धर्म दाखविणारे डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी
असतील....तर होय मी नक्षलवादी आहे...!
असेच आहे आणि
असेच असेल तर..........होय मी नक्षलवादी आहे...! होय मी नक्षलवादी आहे...!! होय मी
नक्षलवादी आहे...!!!
राजेश खडके
समन्वयक
सकल मराठी
समाज