Monday, March 5, 2012
जिज्ञासा अन् कुतूहल
लहानपणापासूनच मुलांच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीबद्दल व घडणाऱ्या घटनांबद्दल नेहमीच कुतूहल असते. या प्रश्नांची उत्तरे ती नेहमी पालक व शिक्षकांना विचारीत असतात. बऱ्याचदा अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नाहीत. विज्ञान हे लक्षात घेवून बुलढाणा येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा लहान मुलांचे विज्ञानाबाबतचे कुतूहल पाहून खरोखरच आनंद वाटला.
शिक्षणाच्या पारंपारिक पध्दतीत आमूलाग्र बदल झाला असून सॉफ्टवेअर शिक्षणपध्दतीचा अवलंब करुन गुणवंत पिढी घडविण्याचे कार्य शिक्षकांना करावे लागत आहे. त्यासोबतच विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देऊन या शिक्षणोत्सवाचे चळवळीत रुपांतर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश ठुबे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
केवळ पुस्तकी ज्ञानाने गुणवान पिढी घडणार नाही तर त्याला प्रात्यक्षिक शिक्षणाची जोड दयावी लागणार आहे हे या प्रदर्शनात पदोपदी जाणवत होते. “शिक्षण हे आनंददायी करण्यासाठी आकाश टॅब” सारख्या अत्यंत विकसित साहित्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुलामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत प्रभावशाली होते.
या विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग पाहण्यास तसेच अनुभवण्यास मिळाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना उत्तमरित्या समजतील असे प्रयोग करुन दाखविण्यात आले जसे की, स्थितीज ऊर्जेचे रुपातंरण गतिज ऊर्जेंत, गतिज ऊर्जेचे रुपातंरण विद्युत ऊर्जेत.चुंबकाचे गुरुत्व बलावर केलेली मात,प्रकाशाचे प्रर्वतन, मध्य बलामुळे वस्तू स्थिरावते, हवेतील ध्वनीच्या लहरी, मॅगनेलज बार. पवन ऊर्जा ही पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. पवन ऊर्जा ही वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते व तिची क्षमता वेगाच्या धन प्रमाणात वाढते. ऊर्जा म्हणजेच जीवन. या संबंध विश्वाचा कारभर ज्या मुलभूत घटकांवर आधारित आहे. त्यातील एक घटक म्हणजे ऊर्जा. जीवनक्रम अव्याहत चालू ठेवण्याचे कार्य ऊर्जा करते. इतक्या सोप्या पध्दतीने मुलानां सांगण्यात आले.
DNA Structure हा प्लास्टिकच्या पुगळयांचा वापर करुन तयार केला होता. सूर्यमाला तर प्रत्यक्ष जमिनीवर अवतरली होती. शिक्षकांनी उत्तमरित्या प्रयोग करुन दाखविले. विशेष म्हणजे या शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन विविध प्रयोग साकार केले होते. अत्यंत साधारण वस्तूंचा वापर करुन, वेगवेगळे प्रयोग करणे खरचं खूप आव्हानात्मक विज्ञान प्रदर्शन म्हणावे लागेल. विज्ञान प्रदर्शनात गणिताच्या विविध गंमती जमती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. गणित विषय कोणास अवघड वाटते तर कुणास खूप सोपे परंतु गणित हा विषय मुलांच्या खेळाचा विषय बनवून त्यांचा उत्तमरित्या अभ्यास करता येते हे सिध्द करुन दाखविले. सोपे संख्यावर्ग आणि वर्गमुळ हसऱ्या एकक, दशक व शतक संख्या हे सर्व विद्यार्थ्यांना भेटल्या. विज्ञानाचा सहज सोपा उपयोग हेच या प्रदर्शनाचे गमक होते.
एस.एस.कल्याणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment