Thursday, March 29, 2012

अविस्मरणीय ठरला मा.राष्ट्रपतींचा पदवी प्रदान सोहळा

महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तीन दिवसीय जळगाव दौरा कार्यक्रमासाठी नाशिक येथून वृत्तसंकलनासाठी मी जळगाव येथे गेलो आणि एक महत्वपूर्ण दौरा करण्याची संधी आयुष्यात मला या निमित्ताने अनुभवास मिळाली . निमित्त होतं जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने आयोजित केलेल्या विशेष पदवी प्रदान समारंभाचं .....

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहासातील हा एक सोनेरी क्षण .भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना विद्यापीठातर्फे सर्वोच्च अशा डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. खानदेश हे प्रतिभाताईंचे माहेर त्यामुळे माहेरच्या मंडळीनी आयोजित केलेला आपल्या कर्तुत्ववान लेकीचा हा गौरव सोहळा होता. याच मातीत ताईचा जन्म झाला व गगनाला गवसणी देणार बळ त्यांना हयाच मातीतून मिळालं आमदार, मंत्री , खासदार, राज्यसभेच्या उपसभापती, राज्यपाल व पुढे राष्ट्रपती असा दैदिप्यमान जीवन प्रवास विशेषत: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान प्रतिभाताईच्या रुपाने खानदेशाला मिळाला तो दिवस खानदेशवासीयांसाठी अविस्मरणीय व परमोच्च आनंदाचा क्षण ठरला.

शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या हिरवळीवर असलेल्या या विद्यापीठात प्रशस्त भव्य अशा असंख्य इमारती आहेत. सर्व शाखांच्या अभ्यासक्रमाची सोय असणारे आय एस ओ ९००१-२००८ हे मानांकन प्राप्त झालेल्या विद्यापीठात ५१ मीटर X ४३.८० मीटर एवढया आकाराचे ३ कोटी रु. खर्च करुन नवीन दीक्षांत सभागृह तयार केले आहे. नवा शालू परिधान करुन जशी नववधू सजते त्याप्रमाणे हे दीक्षांत सभागृह सजले होते.

सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त जागोजागी महाराष्ट्र पोलीस उभे होते रणरणत्या उन्हात व उकाडयात असंख्य जळगावकर राष्ट्रपतींची आतुरतेने वाट पाहत होते. काही सभामंडपात बसले होते. काही बाहेर राष्ट्रपती महोदयांचा वाहनाचा ताफा पाहण्यासाठी उत्सुक होते. परंतु थोडयाच वेळात राष्ट्रपती महोदयाचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले व सर्व परिसर उल्हसित झाला मा. राष्ट्रपतीं महोदयांचे आनंदाने सर्वांनी उभे राहून टाळयांच्या गजरात स्वागत केले.

दीक्षांत मिरवणुक

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे दीक्षांत मिरवणुकीव्दारे प्रथम दीक्षांत सभागृहात आगमन झाले या मिरवणुकीत विद्यापीठाचे अधिष्ठता, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य सहभागी झाले होते. राष्ट्रपती महोदय व्यासपीठावर आल्यानंतर आकर्षक गणवेशातील पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले . विद्यापीठाच्या गायकवृंदाने विद्यापीठ गीत सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन् व उ म वि चे कुलगुरु प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना डी.लिट या सर्वोच्च पदवी ने सन्मानित करण्यात आले

.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट या पदवीने सन्मानीत केल्याबद्दल मा. राष्ट्रपती आपल्या मनोगत म्हणाल्या की, या सन्मानाचे मला अधिक महत्व आहे. कारण माझा जन्म, शिक्षण आणि आयुष्याची सूरुवात खानदेशातूनच झाली आहे. माझे शिक्षण हीच माझ्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासात शिक्षकांचे महत्व अधिक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानोपासक होण्यासोबतच देशाच्या प्रती आपली जबाबदारी ओळखून समाजाच्या कल्याणासाठी झटावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले.

अत्यंत मनमोहक व शिस्तबध्द अशा वातावरणात हा समारंभ सुरु असतांना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन या सोहळयाची शोभा वाढविली

प्रारंभी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यापीठाच्या नूतन दीक्षांत सभागृहाचे उदघाटन तसेच आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह आणि बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या मुलींचे वसतीगृहाच्या कोनाशिलेचे अनावरण रिमोट व्दारे केले. यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल के शंकरनारायण उच्चव तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री नितिन राहुत पालकमंत्री तथा कृर्षी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आदि मान्यवर उपस्थित होते. हा रंगारंग सोहळा तमाम मान्यवर व जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरला.


  • रविंद्र ठाकूर

  • No comments:

    Post a Comment