Thursday, December 5, 2019

समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....! राजेश खडके सकल मराठी समाज



      आज डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे प्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम...! डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समजून घेतले तर आपल्याला लगेच लक्षात येते की मानवकल्याणकारी कार्य त्यानी केले आहे.आणि स्वराज्याचा इतिहास खऱ्या अर्थाने त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या वेरूळ गावचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला बौध्द लेण्यांच्या गावातच यांचे अस्तित्व दिसून येते त्यामुळे “समतेचे राज्य” ही शहाजी महाराज यांची संकल्पना होती आणि ती   शिवरायांनी अस्तित्वात आणलेली आहे.त्यामुळे हे दोघेही बौध्द विचारांचे होते हे आपल्या कोणाला नाकारता येत नाही.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखविलेल्या घटना आणि दाखविलेला मार्ग याचा जर खऱ्या अंतरमनाने विचार केला तर सिंध प्रांतातील सभ्यता आपल्याला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे असे दिसून येते.भीमा कोरेगाव येथे इतिहासाची आठवण करून देताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे बोट दाखविलेले आहे.बुध्द धम्माचा अभ्यास छत्रपती संभाजी महाराज यांचा झालेला होता आणि ते बौध्द विचारांचे होते याचा दाखला त्यांची पिंपळाच्या पानावर कोरलेले राजमुद्रा आणि बुधभूषण ग्रंथातून होते.कुलदैवत म्हणून जगदंब म्हणून नेऋतीचे पूजन इथल्या मूळ भारत वासियांनी मान्य केले आहे.याचाच अर्थ या दोन्ही महाराजांनी मनुस्मृती नाकारली असल्याचे दिसून येते.त्याचे उत्तम उदाहरण द्यावयाचे झाल्यास मी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी केला आणि या २४ सप्टेंबरच्या दिनाला महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी खूप मोठे महत्व दिल्याचा इतिहास पुरावा देत आहे. डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रिंटींग प्रेसचे नाव बुध्दभूषण त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुध्द विचारानीच दिले आहे.त्यामुळे पिंपळाच्या पानाचे महत्व आपल्याला तेथूनच समजले आहे.म्हणून त्या मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आल्याचे इतिहास डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरून दाखला देतो.कारण भीमा कोरेगाव भेटी नंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देऊन करतात आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन करून शिवरायांचे स्वराज्य समतेचे राज्य होते याचा दाखला आपल्याला दिला आहे.स्वराज्याचे संविधान होते म्हणून स्वतंत्र भारताचे संविधान मला लिहिता आले असे डॉ बाबसाहेब आंबेडकर संविधान सभेत सांगतात.
          मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.आणि त्यांनी असेही सांगितले की बौध्द धम्म स्वीकारल्यामुळे इथल्या हिंदुना कोणताही त्रास होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे.आणि संपूर्ण भारत बौद्धमय करीन त्यांच्या या बोलण्याला इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.या त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा याचा अभ्यास आणि त्याचे संशोधन करावे लागेल तेव्हा त्यानी सांगितलेले मार्मिक वाक्य आपल्या लक्षात येईल असो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून दिलेली १० वी प्रतिज्ञा म्हणजे “मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन” ही समुजन घेण्यासाठी ९ वी प्रतिज्ञा समजून घेतली पाहिजे.तेव्हा आपल्याला लक्षात येईल की, बौध्द हा धर्म नसून धम्म आहे.आणि या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण होणे किती महत्वाचे आहे हेही आपल्या लक्षात  येईल.म्हणून आमच्या बहुजन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून “समता” हे केंद्रस्थानी ठेऊन प्रबोधन कार्यक्रम उभा केलेला आहे.जर या देशाची समता अबाधित ठेवायची असेल,जर या राज्याची समता अबाधित ठेवायची असेल तसेच इथली सामाजिक समता अबाधित ठेवायची असेल तर इथल्या  समता प्रस्थापित करणाऱ्या बौध्द धम्मीय व्यक्तीचे संरक्षण झाले पाहिजे.....!