Friday, September 18, 2020

गरीब मराठ्यांना सत्तेच्या दारात घेऊन जाणार....! आता भावनिक लढ्यात आम्ही आमच्या पिढ्या बरबाद करणार नाही....!


 

         गेल्या सत्तर वर्षापासून इथले १६९ श्रीमंत घराणे म्हणजे मोगलाई मराठा  सत्ता चालवीत आहेत...असे असताना इथला गरीब मराठा आणखी गरीब होताना दिसत आहे.बाजार पेठ्यात हमाली करताना आणि वॉचमेनची नोकरी करतांना हा गरीब मराठा दिसत आहे.अशा मराठ्यांना न्याय देण्याची भूमिका जर कोण घेताना दिसत असेल तर ते अॅड प्रकाश आंबेडकर घेताना दिसत आहे.

    विषय असा आहे की मराठा समाज आरक्षण मागित आहे परंतु त्यांना आरक्षण मिळत नसल्याची भावना आता मराठा तरुणांमध्ये दिसत आहे.परंतु हे आरक्षण का मिळत नाही असा प्रश्न तो स्वत:ला विचारतो तेव्हा आता त्याच्या लक्षात येते की इथली राजसत्ता आपल्या मराठ्यांच्या हातात असताना आम्हाला वणवण का...? करावी लागत आहे.तर त्याच्या प्रश्नांना वाट करून देण्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली दिसत आहे.आंबेडकर असे म्हणतात की,इथला श्रीमंत मराठा हा मोगलाई मराठा आहे म्हणजे वतनदार,जहागीरदार, सरमजामशाह ही घराणी मोगलाईने उभी केलेली घराणी होती.अशा मोगलाई मराठ्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारून इथल्या सामान्य मराठ्याला न्याय देण्याची भूमिका राबविलेली आहे.परंतु इथल्या पेशवाईने स्वराज्य संपवून पुन्हा ही घराणेशाही उभी केली होती.अशी घराणे स्वतंत्र नंतर काळात राजकीय घराणे म्हणून उभी राहिली आणि आज साखर कारखाने,दुध संस्था,शिक्षण संस्था,पतपेढ्या,बँका उभारून गडगंज झालेली आहेत.त्यामुळे अशा घराण्यांना गुलामी लादून इथल्या गरीब मराठ्यांना उभे राहू द्यायचे नाही.म्हणून मे उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण हे मे सर्वोच्च न्यायालयात टिकविले गेले नाही.त्यामुळे जो पर्यंत इथला गरीब मराठा या संदर्भात या मोगलाई मराठ्यांच्या विरोधात आवाज उचलीत नाही तो पर्यंत त्याला न्याय मिळणार नाही हे तेवढेच सत्य आहे.

      गरीब मराठ्यांचे नेतृत्व करताना संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आज गरीब मराठे यांच्यासाठी लढत आहे परंतु हे मोगलाई मराठे यांच्या विरोधात निवडणुकीच्य रिंगणात उतरताना दिसत नाही.जर खरेच गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात सत्ता मिळविणेसाठीचा संघर्ष उभारावा लागेल.

    प्रश्न असा आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे....आणि आम्ही त्यांना भावनिक आहोत याची ओळख इथल्या सत्ताधारी पक्षांना आणि काही आपल्या स्वार्थी नेत्यांना झालेली आहे.त्यामुळे नेहमी ते भावनिकतेचे राजकारण उभारू पहात असतात.आता त्यांना असे भावनिकतेचे राजकारण उभे करून देणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलेले आहे.त्याला तसे कारणही आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर काँग्रेसी मदतीने बी सी कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूचा भावनिक प्रश्न उभा करून मृत्युच्या अहवालाची मागणी करू इथली एक पिढी उध्वस्त केलेली आहे.त्याच प्रमाणे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आंदोलन उभारून भावनिक मुद्दा उपस्थित करून त्याचे राजकारण करून इथली आणखी एक पिढी उध्वस्त करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला बुद्धीजीवी समाज संपविण्याचा नेहमी घाट घातला गेलेला आहे.त्यामुळे इंदू मिलच्या माध्यमातून आता कोणतेही भावनिक राजकारण होऊ देणार नसल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतल्याची दिसते.एकंदरीत आता राजकारण करण्याची दिशा बदलत असल्याचे चित्र उभा राहताना दिसत आहे.

    एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी उभारलेली राजकीय भूमिका एक वेगळे वळण घेताना दिसत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेला डिप्रेस क्लासेस फेडरेशन आणि त्या माध्यमातून मागासलेला समाज सत्तेच्या दारात आणून ठेवला आहे.त्याच प्रमाणे प्रत्येक घरात असणारा कामगार वर्ग लक्षात घेता उभारलेला स्वतंत्र मजूर पक्ष आणि या पक्षाच्या माध्यमातून कामगारांना दिलेला कायदेशीर हक्क यातून कामगारा संदर्भातील न्यायिक भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका गावागाड्याला न्याय देणारी भूमिका होती.जातीच्या याद्या तयार करून त्याचे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उभारून १९४२ ला राजकीय पक्ष स्थापन करून अलुतेदार,बलुतेदार,फिरस्ते आणि अल्पसंख्याक समाजाला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून सामजिक,आर्थिक आणि राजकीय न्याय देऊन मानव कल्याणकारी भूमिका राबविलेली आहे.

   एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची कास धरीत वंचित बहुजन आघाडी पक्ष सथापन करून अलुतेदार,बलुतेदार,फिरस्ते आणि अल्पसंख्याक आणि गरीब मराठा समाजाला सामजिक,आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याची घेतली  असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही....शेकाफेचे दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.....!


 

          प्रश्न असा आहे की आम्ही दिवसभरात शेकडो वेळा “जय भीम” म्हणत असतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत असतो.परंतु त्यानी केलेले थोर सामाजिक कार्य आणि संसदीय राजकारण याचा लक्षपूर्वक आभ्यास करीत नाही म्हणून स्वराज्याचे महार योध्दा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांची ओळख आम्हाला राहत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांनी गावगाडा उभा करून काळीमध्ये बी पेरून संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून कुणबी उभा केला आज त्या बलुतेदार व अलुतेदार यांना प्रशासकीय व्यवस्थेतून बाहेर करून मनुवाद्यानी गावगाडा ताब्यात घेऊन तेथील व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली होती. अशा व्यवस्थे विरोधात गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांनी पंढरपूर येथे आखाडा उभा करून वारकरी पंथ स्थापन करून त्यांच्या हातात समतेचा भगवा पताका देऊन या वेदिक विरुध्द असा संघर्ष उभा करून नेहमी गावगाड्याचे संरक्षण केलेले आहे. याच वारकरी पंथातील संत तुकाराम माहाराज यांना गुरुस्थानी ठेवून शहाजी राजे व माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाराय यांनी गावगाड्याच्या संरक्षणासाठी स्वराज्य उभे केलेले होते.परंतु या वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाला हाताशी धरून स्वराज्य संपवून पेशवाई उभी करून पुन्हा गावगाड्यावर कब्जा केलेला होता. हा कब्जा उखडण्यासाठी प्रतिशिवाजी म्हणून राजे उमाजी नाईक यांनी कार्य केल्याचे इतिहास सांगतो. ह्याच  राजे उमाजी नाईक यांचा इतिहास पाहून महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती पुण्यातील हिराबाग याठिकाणी साजरा करून त्यांचे समतेचे विचार रुजवून पुन्हा एकदा गावगाडा उभा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा इतिहास आपल्याला दाखला देतो.परंतु आज आपल्याला हिराबागेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली जयंती दिसून येत नाही.

      वारकरी पंथातील संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वैदिक धर्म पंडितांनी उध्वस्त केलेला गावगाडा आणि गावगाडा उभा करणारे बलुतेदार व अलुतेदार यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन गावगाड्यावर बसविलेला मनुचा कायदा म्हणजे मनुस्मृती स्वराज्याची राजधानी रायगडाच्या परिसरात दहन केली आहे. या गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार तसेच फिरस्ते आणि अल्पसंख्याक यांना सामाजिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी एससी,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी व अल्पसंख्याक यांच्या जातीच्या याद्या तयार करून त्या जातींच्या याद्यांना  “शेड्युल्ड कास्ट” असे संबोधले होते.या तयार केलेल्या जातींच्या याद्या (शेड्युल्ड कास्ट) यांना न्याय देण्यासाठी फेडरेशन तयार केले.पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष १९४२ रोजी स्थापन करून त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मद्रास येथील एन शिवराज यांची नियुक्ती केली.तसेच शेड्युल्ड कास्ट फेडरेशन वतीने १९४७,१९५२, निवडूक लढवून १९५४  रोजी पोटनिवडणूक लढविलेली होती.

         डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ साली महापरिनिर्वाण झाले आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुकीत एकूण आठ खासदार जनतेने शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे निवडूण दिले.त्यामध्ये श्री एन शिवराज,श्री दादासाहेब गायकवाड,श्री बी सी कांबळे,श्री के टी परमार,श्री एस के दिघे,श्री जी के माने,श्री डी ए कट्टी आणि श्री बाळासाहेब साळुंके हे होते.या सर्वानी १९६२ पर्यंत खासदारकी सांभाळलेली आहे.परंतु यातील बाळासाहेब साळुंके यांचे १९६१ मध्ये निधन झाले आहे.

     आपण जर दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांच्या मुंबई प्रांत दक्षिण मतदार संघाचा आभ्यास केला तर आणि सदरचा मतदार संघ समजून घेतला तर आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही,कारण हा मतदार संघ स्वराज्याचा मतदार संघ आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी म्हणजे जुन्नर,आंबेगाव,खेड येथील मतदारांनी श्री साळुंके यांना मतदान केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्हे येथील प्रचंडगड ताब्यात घेऊन त्याठिकाणी स्वराज्याचा भगवा पताका उभारून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचे नामांतर तोरणगड असे केले अशा ठिकाणच्या मतदारांनी श्री साळुंके यांना मतदान केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि ज्या राजगडा वरून स्वराज्याचा २२ वर्षे राज्य कारभार पाहिला. अशा राजधानी मधील म्हणजे भोर येथील मतदार यांनी श्री साळुंके यांना मतदान केले आहे.ज्या मावळातून बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारले अशा मावळ व मुळशी येथील मतदार यांनी बाळासाहेब साळुंके यांना मतदान केले आहे.त्याच प्रमाणे पोलादपूर येथील मतदार यांनी मतदान केले आहे.स्वराज्यातील प्रसिध्द असणारे सरदार राजे निंबाळकर यांचे असणारे फलटण गावातील लोकांनी मतदान केले आहे.त्याच प्रमाणे पुरोगामी विचारांचे नेते तसेच देश पातळीवर ज्यांची गावगाड्याचे नेते म्हणून ओळख आहे असे मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या बारामती मतदार संघातील लोकांनी अॅड बाळासाहेब साळुंके यांना निवडूण देऊन ससंदे मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचा झेंडा फडकविलेला आहे.

         असे दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वंजारी यांनी अभिवादन भाषणात एवढ्या मोठ्या माणसाची म्हणजे ज्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर काम केले आणि स्वराज्याने ज्याला निवडून अशा मोठ्या माणसाची ओळख चळवळीच्या कार्यकर्त्याला नाही याबद्दल शोकांतिका व्यक्त केली.या अनुषंगाने असा प्रश्न उपस्थित होत आहे की जे चळवळीचे जेष्ठ नेते आहेत यांनी याबाबतची माहिती तरुणांना का नाही दिली नाही.

  आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे वेगवेगळ्या जातीचे उमेदवार दिले होते.आणि निवडणूक प्रचारासाठी भाषण करण्यासाठी जी ठिकाणे निवडलेली होती ती सर्व ठिकाणे ही शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला मतदान करणारे स्वराज्यातील मतदारांची होती.हा सर्व आढावा पहाता  आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवीत शेकाफे या पक्षाची भूमिका घेऊन गावगाड्यातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि फिरस्ते तसेच अल्पसंख्यक यांना उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सत्य स्वीकारून रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नसल्याचे वक्तव्य करून शेकाफेची पुनरावृत्ती म्हणजेच वंचित बहुजन आघाडी असल्याचे मान्य केले आहे.

  यामुळे अशा स्वराज्याचा महार योध्दा दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!

Wednesday, September 9, 2020

महार जातीच्या प्रमुख जाती व पोटजाती कोणत्या आणि त्याचे अस्तित्व व कार्य काय...? राजेश खडके सकल मराठी समाज


 

       तुम्हाला प्रत्येक जातीचा शोध का घ्यावासा वाटतो....? असा जर मला कोणी प्रश्न केला तर त्याला मी असे म्हणेन की, सिंधू संस्कृती व गावगाड्याच्या बौध्द संस्कृती वर जो आर्य सनातनी यांनी हल्ला करून इथला एकसंघ समाज जाती जातीमध्ये विस्तारित करून इथली दैवक संस्कृतीवर वेदिक धर्म देवतांचा प्रभाव निर्माण करून चातुवर्ण व्यवस्था उभी करून इथली प्रशासन व्यवस्था ताब्यात घेतली आहे.परंतु या आर्य सनातनी व्यवस्थेला नेहमी विरोध करणारी मंडळी उभी राहून त्यानी नेहमी “क्रांती” केलेली आहे.त्यामुळे प्रत्येक जातीचे प्राचीन अस्थित्व काय होते...? हा विषय इथे समजून घेण्याचा माझा एक प्रयत्न आहे.त्यामुळे या बामणी व्यवस्थेचे मूळ संरक्षक आणि प्रचारक शोधण्याची माझी भूमिका नेहमी प्रामाणिक राहिलेली आहे.त्यामुळे गणव्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेल्या ह्या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात नेहमी महार गणाने संघर्ष केल्याचे प्राचीन काळापासून इतिहासात दिसत आहे.त्यामुळे या महार गणाचे नेहमी तुकडे तुकडे झाल्याचे दिसते.बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यातून कुणबी उभा राहिल्याचा इतिहास दाखला देतो.त्याच प्रमाणे गावागाड्यात येणारे फिरस्ते आणि नंतरच्या काळात उभा राहिलेला अल्पसंख्याक वर्ग यावर नेहमी वैदिक  व्यवस्थेने दबाव निर्माण केलेला आहे.परंतु इतिहास काळापासून ते आजपर्यंत नेहमी महार हा “योद्धा” म्हणून लढल्याचे दिसत आहे.त्यामुळे लढवय्या वर्गाला गावगाड्यापासून तोडण्याचा नेहमी प्रयत्न आतून व बाहेरून झाल्याचे दिसत आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गावगाड्याचा आणि येथील वर्णव्यवस्था आणि येथील जात व्यवस्थेतून अस्पृश्य ठरविणाऱ्या महार योद्ध्यांचा इतिहास शोधून त्यांचे शौर्य म्हणून भीमा कोरेगावचा  विजयस्तंभ दाखवून सेनेत “महार बटालियन” उभी केलेली आहे.महार योद्ध्यांचा इतिहास संपुष्टात यावा म्हणून “महार” शब्द उचारला जाऊ नये अशी एक व्यवस्था आतून व बाहेरून उभी राहिलेली आहे.त्यामुळे आपले अस्तित्व काय....? हे नेहमी आपल्याला जाती वरून दिसते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातींचे शेड्युल्ड तयार करून प्रत्येक जातीच्या याद्या तयार करून त्याला न्याय मिळवा यासाठी एससी,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसंख्यांक यांच्या “जातीच्या याद्या” करून त्याला शेड्युल्ड कास्ट असे संबोधलेले आहे.म्हणून या संपूर्ण जातींना न्याय मिळावा म्हणून “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” असे नाव देऊन राजकीय पक्ष स्थापन केलेला होता.परंतु “शेड्युल्ड कास्ट” म्हणजे “अनुसूचित जाती” असे विश्लेषण करून सदरचा पक्ष फक्त याच वर्गाच्या विकासासाठी स्थापन केल्याची चर्चा आतून व बाहेरून नेहमी उभी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना गावगाड्यापासून तोडण्याचा प्रयत्न आतून व बाहेरून झाल्याचे दिसते.त्यामुळे जात लपवून कोणतेही कार्य होणार नाही यावरून मला दिसते.त्यामुळे तुम्ही धर्माने कोण आहात या पेक्षा जातीने कोण आहात हे महत्वाचे आहे.जात जर कळाली तर त्या जातीचा विकास किती झालेले आहे हे दिसून येते म्हणून जातीय “जनगणना” व्हावी असा नेहमी आवाज दिला जातो. मी “बौध्द” जरी असलो वा मी “हिंदू” जरी असलो तरी माझी जात कोणती....? हे या “शेड्युल्ड कास्ट” म्हणजे जातींच्या तयार झालेल्या याद्यावरून दिसते.त्या प्रमाणे महार समाजाच्या किती प्रमुख जाती व पोटजाती आहेत हे शोधण्याचा माझा प्रयत्न असून ज्या प्रमुख जाती मला सशोधनात सापडलेल्या आहेत त्या मी आपल्या समोर मांडीत आहे.त्यातील आपण कोण...? याचा शोध घेऊन आपले इतीहासातील अस्तित्व शोधावे....! त्याच प्रमाणे पोटजाती व त्याचे कार्य पुढील लेखात मी प्रसिध्द करेन....(क्रमशJ

खालील प्रमाणे प्रमुख महार जाती -:

१)    थोरल्याघरचा :-

२)    भुमीपुत्र किंवा धरणीपुत्र -: महारांच्या प्राचिन अस्तित्वाचे प्रतिक मानतात तेच देश व महाराष्ट्राच्या मुळ जमाती आहेत.

३)    मिराशी :- जमिनीचा मालक

४)    परवारी :-लढाऊ जमात इंग्रज महारांना आदराने परवारीच म्हणायचे

५)    वेसकर :- वेशीवरचा सुरक्षा रक्षक

६)    काठीवाला :- न्यायमंदिरात व नोंदणी खात्यातील  प्रमुख पदाधिकारी

७)    धेड :-  गुजरात (पुर्वीचा महाराष्ट्र) तेथील प्रमुखाला धेड महार म्हणतात

८)     डोंब :- गुजरात मधिल लढाऊ महारवर्ग

९)    तराळ :- खंड गोळा करून आणणारा महारवर्ग

१०)                       भुयाळ :- भोई (मुख्या शब्द भुई म्हणजे जमिन

११)                       चोखामेळा :- संत परंपरेत समतेसाठी उभा राहीलेला वर्ग

१२)                       हुलसव किंवा हुळसव :- महाराची कर्णाटकातील महारांची जात तिला माला किंवा माळा असेही म्हणतात.देशभर जन्ममृत्यीची व वंशवेलाची माहीती ठेवणारा महार

१३)                       अतिशुद्र :- अतिअर्वाचीन वापरण्यात आलेला शब्द

१४)                       म्हेत्रे :- मोठ्ठा प्रमुख नेता

१५)                       अंत्यज :- समाज रचनेतील शेवटचा घटक किंवा गोतसभा/गोतावळ्यातील शेवटचा/अंतिम निर्णय देणारा !परवारी