Showing posts with label लेणीचे फोटो. Show all posts
Showing posts with label लेणीचे फोटो. Show all posts

Saturday, May 24, 2014

भाजे लेणीचे फोटो

पुण्याहून लोणावळ्याकडे जाताना रेल्वेने मळवली स्टेशनला उतरल्यावर डाव्या बाजूला भाजे गावापर्यंत रस्ता जातो. ३ कि.मी. ह्या ह्या रस्त्यावरुन भाजेगावांत गेल्यावर समोरच्या डोंगरात भाजे लेण्या दिसतात. कोरलेल्या पायर्‍यांवरुन लेण्यात वीस मिनिटांत जाता येते. लेण्यामधून डाव्या बाजूला लोहगड विसापूर किल्ल्यांचे दर्शन घडते. मोठे चैत्यगृह व दगडी स्तूप यांचे कोरीव काम अप्रतिम आहे. लोणावळ्याहून भाजे गांव १४ कि.मी. आहे.

Thursday, July 12, 2012

कोंढाणे लेणीचे फोटो










राजमाची किल्ल्याच्या मागच्या बाजूला पायथ्याजवळ उल्हासदरीच्या डोंगराच्या पोटात ह्या लेण्या आहेत. चार लेण्यांचा हा समुह आहे. घनदाट झाडीत आणि गर्दीपासून दूर अशा रम्य वातावरणात ह्या लेण्या खोदल्या आहेत. पावसाळ्यात ह्या लेण्यांना जाता येत नाही. पावसाळा सोडून इतर वेळी जान्यासाठी रेल्वेच्या ठाकूरवाडी स्थानकापासून खाली उल्हास नदीच्या दरीत उतरत जावे. नदी पार करुन पलीकडच्या कोंदिवडे गांवात आपण पोहोचतो. गावापासून अंदाजे ३ कि.मी. अंतरावर वरच्या चढणिच्या वाटेने चालत गेल्यावर ह्या सुंदर लेण्यांमध्ये आपण पोहोचतो. हे सर्व अंतर पायी चालत जावे लागते.