Friday, March 15, 2019

भोई समाजाच्या २६ पोटजाती तरीही त्याला महाराष्ट्रात लोकसभेची उमेदवारी नाही...? साहेब आम्हीही वंचित घटक आहोत...! राजेश खडके सकल मराठी समाज


                भोई समाज हा महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,रायगड,रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव इत्यादीमध्ये मासेमारी करतात. भोई समाजातील सर्व रीती, परंपरा ह्या कोळ्यांप्रमाणेच आहेत. भोई समाजाचे उदरनिर्वाहाचे अन्य प्रमुख साधन म्हणजे दाळे, फुटाणे, बत्तासे, शेवचिवडा बनवणे व विकणे आणि नदीकाठी खरबूज, टरबूजांचे पीक घेऊन त्यांची विक्री करणे.
भोई समाजाच्या देशभरात ३२ जाती-पोटजाती आहेत.त्यापैकी महाराष्ट्रात २६ जाती, पोटजाती आढळून येतात. कवट, कहार, किरात, खाडी भोई, खारे भोई, गाढव भोई, गोंडिया, झिंगा भोई, जातिया, ढिवर, ढेवरा, धीवर, धीमर, धुरिया, नावाडी, परदेशी भोई, पालेवार, बोई, भोई, मछंद्र, मछुआ, मल्हार, मल्हाव, मांझी, राज भोई, अशा भोई समाजाच्या जाती आणि पोटजाती आहेत. महाराष्ट्रात कहारू, जालिया, झिंगा, दुराया, नावाडी, परदेशी, पालेवार, मच्छिंद्र, राज, या आणि अशा एकूण २६ उपजाती या समाजात आहेत. सरकारदृष्ट्या भोई समाज हा देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गांत समाविष्ट आहे. काही राज्यांत भोई समाज अनुसूचित जातीत, तर काही राज्यात अनुसूचित जमातीमध्ये गणला जातो. महाराष्ट्रात भोई समाजाला अन्य भटक्या जातीमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी (अदर बॅकवर्ड क्लास)'तसेच (NT)Nomadic Tribeमध्ये सामील आहे.
मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. पुणे शहरात या समाजाची सुमारे चार हजार घरे अाहेत. पूर्वी कसबा पेठेत केंद्रित असलेला हा समाज, शहर विकासाबरोबर आणि मुख्यत्वे पानशेत पुरानंतर पर्वती, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर आणि पौड रोड परिसरात विखुरला गेला. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात नामवंतांच्या पालख्या उलण्याचे काम भोई करत असत. आजही भोई समाजाला पालखी उचलण्याचा मान सर्वप्रथम मिळतो.म्हणून आम्हाला पालखीचे भोई असे म्हटले जाते.परंतु या समाजाचा इतिहास हा स्वराज्याच्या प्रती खूप मोठा आणि लौकिक दाखविणारा असल्यामुळे त्याच्या हातातील तलवार काढून त्याचेवर पालखीचे ओझे देऊन त्याची मुख्य ओळख इतिहासात बुजविण्याचे कार्य इथल्या मनुवादी व्यवस्थेने केली आहे.अशा समाजाला परिवर्तनाची गरज असून त्याला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.याला नेहमीच राजकारणापासून दूर ठेवण्याचे काम केली गेले आहे.

3 comments:

  1. भोई समजा प्रमाणे सुतार समाज देखील राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याना देखील कोणीही ग्राह्य धरत नाहीत

    ReplyDelete
  2. जेव्हा अनेक घटकांना अशीच वाचा फुटेल,तेव्हा घराणेशाहीचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत,, हीच बाळासाहेब यांच्या परिवर्तनाची नांदी ठरेल,,व इतिहास त्याची ग्वाही देईल,,

    ReplyDelete
  3. jaati itkya jaast ani jaga fakt 48 dheer dhara bhavanno ajun amdarki cha election baaki aahe 288 jaganchi balasaheb konala he vanchit thevnar nahi...jai bhim jai bharat

    ReplyDelete