Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील चौथा बलुतेदार चांभार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज

 

आपण आतापर्यंत तीन भाग वाचले असतील आणि बारा बलुतेदार पैकी तीन बुलुतेदार समजून घेतले असतील.या तीन बलुतेदार यांची गावगाड्यातील कामे आणि स्वराज्यातील योगदान आपण समजून घेतले.आता आपण चौथा बलुतेदार म्हणजे “चांभार” समजून घेणार आहोत.ज्या वेळेस जंगलातील लोकांनी काळी आणि पांढरीवर गाव उभे केले तेव्हा हे लोक एकाच गणातील लोक होते.म्हणजे एकाच कुटुंबातील लोक होते हे लक्षात येते.परंतु एकाच कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन जेव्हा गावगाडा उभा केला तेव्हा गावातील कामे त्या कुटुंबातील भावांनी वाटून घेतली होती.त्या कामामुळे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार उभी राहिली आणि या अलुतेदार आणि बलुतेदार पैकी ज्या व्यक्तीने काळीमध्ये “बी” पेरले तो “कुणबी” म्हणून उभा राहिला आहे.त्यामुळे “कुणबी” दुसरा तिसरा कोणी नसून याच बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारापैकी आहे हे आपण समजून घेतले आहे.ज्या वेळेस गावगाडा उभा राहिला त्यावेळेस गावातील “कुणबी” समाजाकडे गाय बैल ही जनावरे होती ते जेव्हा मृत व्हायची तेव्हा त्या मृत जनावरांचे “चामंड” कडे गावातील लोकांचे लक्ष गेले....आणि त्या चामड्याचा उपयोग काय करायचा असा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा त्यातून चामड्याचे चपला ,पादत्राणे बनविण्यासाठीचे काम करणारा आणि शेतकऱ्याला बैल हाकण्यासाठी लागणारा चाबूक बनविणारा म्हणून “चांभार” पुढे आला.परंतु त्याचे असणारे कुटुंबातील शंभर लोकांचे पोट या एकाच व्यवसायावर चालणार नाही म्हणून त्यातील काही लोक पुढे आले आणि त्यांनी काळीमध्ये “बी” पेरले पुढे हेच चांभार “कुणबी” झाले आहेत.त्यामुळे गावगाडा उभारणीत महत्वाचे योगदान या चांभार समाजाचे आहे.

          एकणदरीत काय तर एका कुटुंबातून उभा राहिलेला एकतीस कुटुंबाचा गावगाडा होय म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी असे मिळून एकतीस लोकांनी उभा केलेला गावगाडा होय.तुम्ही कोणत्याही कुणब्याचे मूळ शोधायला जाल तर ते तुम्हाला या बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यामध्येच सापडेल....ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गावगाड्यातील लोकांना आपले समजून स्वराज्य स्थापनेत सामावून घेतले त्यावेळेस ह्या “चांभार” समजाने सुध्दा शस्त्रे हातात घेऊन स्वराज्य स्थापनेत सहभागी झालास्वराज्यातील सैनिकासाठी लागणारे चिलखत या चांभार समाजाने बनविले होते.घोड्याची चामडी लगाम तसेच घोड्यावरील खोगीर या चांभार समाजाने बनविले होते.त्याच प्रमाणे चामड्याचे पखाल बनवून ते सैनिका पर्यंत पिण्याचे पाणी पोहचविण्याचे काम करायचे. म्हणजेच तो स्वराज्याचा मावळा झाला होता.ज्या ज्या बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी समाजाने शस्त्रे हातात धरली तो तो स्वराज्याचा मावळा झाला आणि त्याने मराठेशाही उभी केली आहे.त्या स्वराज्याच्या मावळ्यालाच आज “मराठा” म्हटले जाते.आज मराठा म्हणून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या असलेला समाज म्हणून पुढे आलेला आहे....आज तो मराठा समाज म्हणून आरक्षण मागणीत पुढे आलेला आहे.त्या समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे परंतु इथल्या राजकीय लोकांना त्यांना आरक्षण द्यायचे नसून त्यांच्या आरक्षणाचे राजकारण करायचे आहे.त्यामुळे गावगाड्यात सिंधू संस्कृती नांदत होती कोणताही हिंदू नावाचा धर्म असल्याची कुठेही नोंद दिसून येत नाही.परंतु सिधू संस्कृतीमधुन उभा राहिलेला बौध्द धम्म त्याचे विचार आणि आचार गावगाड्यात दिसून येतात.म्हणूनच या मानवतावादी गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य आजही टिकून उभे असल्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार इथे रुजविता आले.....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

    गावगाडा उभा केलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्य स्थापनेत असलेला बलुतेदार क्रमांक १ “महार” जसा आज अस्पृश्य झाला त्याच प्रमाणे “चांभार” सुध्दा  अस्पृश्य झालेला आहे.गावगाड्यातील बलुतेदार क्रमांक १ वर असणारा “महार” हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अनुक्रमांक ३७ वर नोंद झाला आहे तर बलुतेदार क्रमांक ४ वर असणारा “चांभार” हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अनुक्रमांक ११ वर नोंद झालेला असून या प्रवर्गात एकोणसाठ जाती नोंद असून त्यांचे आरक्षण हे १३ टक्के आहे.

No comments:

Post a Comment