Wednesday, April 29, 2020

आम्ही संविधान बचाव संघर्ष समितीची लोक आहोत....! लॉक डाऊन म्हणजे काय...? आणि फिजिकल डीस्टटिंग म्हणजे काय......?


          भारत हा लोकशाही प्रदान देश आहे...आणि त्याची चार स्तंभ आहे हे कोणी नाकारणार नाही.परंतु सध्याची परिस्थिती पहाता हे चार स्तंभ दिसत नाही अशी परिस्थिती आहे.आम्ही संविधान बचाव संघर्ष समितीची लोक आहोत.जेथे जेथे संविधान बचावाचा प्रश्न निर्माण होईल तिथे तिथे आम्ही बोलणार आहोत मग परिस्थिती कितीही गंभीर असो.भारत देशा समोर कोरोना महामारीचे संकट उभे टाकले होते व आहे आणि अशा संकटाला देशाला सामोरे जायचे होते.अशा वेळेस भारतीय संविधान प्रमाणे देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांची बैठक होणे अत्यंत गरजेचे होते.त्यासाठी तातडीची ससंदीय मंडळाची बैठक बोलावणे अत्यंत गरजेचे होते.विरोधी पक्षला पाचारण करणे अत्यंत गरजेचे होते....परंतु तसे झाले नाही.अशी कोणतीही बैठक बोलाविण्यात आली नव्हती आणि संपूर्ण भारत देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय एकट्या प्रधानमंत्री यांनी घेतला आहे असे बऱ्याच जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु ते तसे नाही प्रधानमंत्री यांनी एक दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन भारत देशाच्या जनते समोर केले होते त्यानी ते स्वीकारून एक दिवसांचा जनता कर्फ्यू स्वीकारला आणि तो पाळला देखील आहे.परंतु एक दिवसांच्या पाळण्यात आलेल्या कर्फ्यूच्या माध्यमातून कोरोना हा साथ रोग आवरता येणार नाही याची कल्पना असल्यामुळे तो संपूर्ण देशात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून पुढे तो देशहितासाठी २१ दिवस जाहीर करण्यात आला.देशहिताचा प्रश्न असल्यामुळे संपूर्ण जनतेने आनंदाने प्रामणिकपणे तो पाळला आहे हे कोणालाही नाकरून चालता येणार नाही.
    परंतु कायद्यानुसार तो लॉक डाऊन १६ दिवसांचा असायला हवा होता.त्याचे कारण असे आहे की,एखाद्या महामारीचा साथ रोग आक्रमण झाला तर त्याला समजण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा त्या विरोधात प्रबळ करण्यासाठी हा लॉक डाऊन केला जातो हे आपण सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.१६ एवजी तो २१ दिवसांचा केला गेला ठीक आहे जगात या साथ रोगाने थैमान घातले आहे त्यामुळे पाच दिवस जास्तीचे वाढविले असतील यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.असे असताना सदर साथ रोग नियंत्रणात आणता आला नाही आणि त्याला समजण्यास अधिक कालवधी लागत असल्याने आणखी तो १९ दिवसांचा समाजहित समोर ठेवून तो जाहीर करण्यात आला आणि तो ही जनंतेने प्रामणिकपणे स्वीकारलेला आहे.
    परंतु या जनता कर्फ्यूमध्ये इथला भारतीय नागरिक स्वत:चा स्वाभिमान गमावून बसल्याचे चित्र संपूर्ण देशात निर्माण झालेले आहे.त्याचे तसे कारणही आहे रस्त्यावर जनतेच्या संरक्षणासाठी उतरलेला पोलिस अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकावर दबाव तंत्राचा वापर करू लागला.त्याला नाहक अपमानास्पद वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ करून त्याच्यावर लाठीने हल्ला करू लागला.त्याला गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देऊन त्याच्यावर तो गुन्हे दाखल करू लागला.त्याला समाजद्रोही म्हणून हिणवू लागला.अशा बऱ्याच घटना देशात घडू लागल्या आहेत.त्यामुळे आता त्या जनतेला हे सर्व सहन होत नाही तो आता असा विचार करू लागला आहे की, मी देशहितासाठी आणि समाजहितासाठी हा जनता कर्फ्यू स्वत:हून स्वीकारलेला असताना पोलिस मला अशी वागणूक का देत आहे..? माझ्यावर अन्याय करून माझा स्वाभिमान का हिणवून घेत आहे.सरकारने कायदेशीर प्रक्रियेतून हा लॉक डाऊन माझ्यावर लादला नसून स्वखुशीने तो मी स्वीकारलेला आहे.माझी पोटा पाण्याची वाट लावून,मी बेरोजगार होणार आहे याची माहिती असतना तो मी स्वीकारलेला आहे.आता मी स्वीकारलेला लॉक डाऊन मधून ३ मे नंतर मी स्वत:हून या जनता कर्फ्यूतून बाहेर पडत आहे आणि पुढे जनता कर्फ्यू मी पाळणार नाही असे तो म्हणू लागला आहे.त्यामुळे आता सरकारने ३ मे नंतर इथल्या जनतेवर जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लॉक डाऊन लादु नये.

Sunday, April 26, 2020

खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? त्यांना मुलभूत अधिकार मिळाले आहेत काय...?


       
               आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे....आणि स्वच्छत: गृह मिळणे हा त्यातीलच एक अधिकार आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या माणसाला आठ दिवस अन्न मिळाले नाही तर तो मरत नाही मात्र त्याला लघवी आणि संडास अशा प्रात:विधी करायला मिळाली नाही तर नक्कीच त्याची मोठी हानी होत असते हे कोणीही नाकारणार नाही.त्यामुळे खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? असा माझा प्रश्न आहे.कारण मध्यम वर्गीय आणि उच्च वर्णीय लोकांना स्वत:चे असे स्वच्छत: गृह असते हे कोणाला सांगायची गरज नाही त्यामुळे त्याने लॉक डाऊन शंभर टक्के पाळला असेल यात माझे तर दुमत नाही.त्याच प्रमाणे या वर्गाकडे तसे मुबलक पैसेही असतात त्यामुळे तो स्वत:हाला लागणाऱ्या अत्यवश्यक वस्तू एकदाच खरेदी करून त्याचा तो साठा करून ठेऊ शकतो आणि तो साठा त्याने केला असल्याचे माझे मत आहे म्हणून त्याने लॉक डाऊन पाळला आहे.
        परंतु झोपडपट्टी वासियाकडे तेव्हा मुबलक साठा करून ठेवण्यासाठी पैसेही नाहीत आणि तेवढी मोठी जागाही नाही याची माहिती किती लोकांना आहे हे मला माहित नाही.जर याची माहिती त्याच्याकडे असती तर नक्कीच त्याने त्या झोपडपट्टी वासियाकडे बोट दाखविले नसते. झोपडपट्टीवासी हा शंभर स्केवर फुटाच्या घरात आपल्या कुटुंबां समवेत रहात असतो. शंभर स्केवर फुटातच त्याचे किचन, बेडरूम आणि हॉल सुध्दा असतो.मात्र त्यामध्ये त्याची संडासची सोय उपलब्ध नसते त्यामुळे प्रात:विधी करण्यासाठी त्याला सार्वजनिक ठिकाणी जावे लागते आणि हे सार्वजनिक ठिकाण कमीत कमी पाचशे लोकांसाठी एकच मात्र घरापासून दूर असते.त्यामुळे काही लोक २४ तासात प्रात:विधीसाठी एकदा जातात तर काही लोक २४ तासात दोनदा जात असतात.तसेच काही लोक लघवी करण्यासाठी चार तासात एकदा जातात...तर काही लोक दोन तासात एकदा जातात....परंतु मधुमेह रुग्ण तासा तासाला जात असतो.ज्याचे घर मोठे आहे आणि त्याच्या घरात ही सर्व सोय आहे त्याला तो किती वेळा जातो याचे काही बंधन नसते.या सर्व गोष्टींचा विचार केला तर झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे असे मला वाटत नाही.
     कोरोना साथ रोगासाठी केंद्रसरकारने पहिला लॉक डाऊन २१ दिवसांचा जाहीर केला तर दुसरा लॉक डाऊन हा १९ दिवसांचा जाहीर केला आहे म्हणजे हा ४० दिवसांचा लॉक डाऊन झोपडपट्टी वासियांना पाळायचा होता व आहे.....कोणताही कायदा तडजोडीचे समर्थन करीत नाही.त्यामुळे संचारबंदीच्या काळात तुम्ही घरातून बाहेर यायचे नाही असाच कायदा सांगत असतो.परंतु झोपडपट्टी वासियांना या आरोग्याच्या सर्व विधी करण्यासाठी बाहेरच यावे लागते त्यामुळे त्याने लॉक डाऊन पाळला नाही असे माझे मत आहे.लघवी आणि संडास करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकावर पोलिसांनी बंधन ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून बरेच संघर्ष झाले आणि नाहक झोपडपट्टीवासी लॉक डाऊन पाळत नाही अशी बोंबाबोंब मिडीया वाल्यांनी केली आहे.झोपडपट्टीमध्ये १०० स्केवर फुटाचे दोन दोन पाच पाच हजाराच्यावर घरे आहेत आणि प्रत्येक घरात त्याचे कुटुंब आहे.जीवनावश्यक वस्तूंचा तो साठा करून ठेऊ शकत नसल्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी रोज बाहेर पडावे लागत असते.त्यामुळे खरेदीच्या ठिकाणी दोन पाच हजाराची गर्दी दिसून येते त्या गर्दीमुळे मिडीया म्हणते झोपडपट्टीवासी लॉक डाऊन पाळत नाही.
     आता माझे असे म्हणणे आहे की, जे लोक असे आरोप करतात त्यांनी त्या झोपडपट्टीमध्ये राहून २४ तासांचा लॉक डाऊन पाळून दाखवायचा आहे.त्यांनी जर असा लॉक डाऊन पाळून दाखविला तर नक्कीच आम्ही बेजबाबदार आहोत आणि आम्ही लॉक डाऊन पाळत नाही हे मान्य करण्यास तयार आहोत.म्हणून मी म्हणतो खरेच झोपडपट्टी वासियांनी लॉक डाऊन पाळला आहे काय...? त्यांना तो पाळण्यासाठी मुलभूत अधिकार मिळाले आहेत काय...?

३ मे नंतर केंद्राने वाढविलेला लॉक डाऊन आम्ही का पाळणार नाहीत......? फिजिकल डीस्टटिंग पाळत आमचे कार्य आणि जीवनमान पुन्हा एकदा स्वत:हून पूर्वपदावर आणू....! सकल मराठी समाज


        प्रश्न असा आहे की संपूर्ण देश कोरोना विरोधात लढाई लढत आहे हे सर्वानीच मान्य केले पाहिजे.परंतु संघी भाजपा कोरोनां विरोधातील लढाई लढत नाही हे देखील सर्वानी मान्य केलेच पाहिजे असे माझे मत आहे.कारण कोरोना हा साथ रोग आहे आणि या रोगावर नियंत्रण आणि सर्वेक्षण हा आरोग्य विभागाच्या कार्याचा भाग आहे असे असताना भाजपा विरोधी राज्यात राजकारण करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे पथक तयार करून त्या राज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पथक म्हणून त्या राज्यात पाठविलेले आहे.आत्ता अमित शहा यांच्या राजकारणाचा अनुभव जवळ जवळ देशातील प्रत्येकी नागरिकांना आला आहे.महाराष्ट्र राज्याची सत्ता पुन्हा आपल्या हातात यावी यासाठी अमित शहा यांनी महाराष्ट्रात विशेष लक्ष केंद्रित केले होते परंतु त्यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करता आले नाही.असे असताना विदेशातील कोरोना विदेशातील लोकांनी भारतात आणला परंतु त्यांना त्याचा त्रास तर झाला नाही,परंतु त्यांच्या माध्यमातून आलेला कोरोना मुंबई पुण्यामध्ये बहुजन वस्ती धिंगाणा घालताना दिसत आहे.जिथे उच्च न्यायाधीशाचा संशयास्पद मृत्यू होतो आणि तेथे आरोप यांच्यावर होतात परंतु त्याची चौकशी होत नाही.परंतु डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे नात जावई यांना खोट्या केसमध्ये तुरुंगाची हवा कोरोनाचा थैमान महाराष्ट्रात सुरु असताना खावी लागते हे विशेष आहे.
          कोरोनाचे सावट महाराष्ट्रात असताना ठाकरे सरकारवर विश्वास ठेऊन महाराष्ट्रातील जनता त्यांच्या बरोबर उभी असताना केंद्राचे पथक येते आणि अहवाल बाहेर येतो आणि तो म्हणजे एकट्या मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या साडे सहा लाखाचा आकडा पार करणार असे जाहीर होते वेळीच सदरचा अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाकरला आहे.अशा कोरोनाच्या साथ रोगावर महाराष्ट्रातील जनता घाणरडे राजकारण सहन करणार नाही.असे असताना वारंवार राज्यापालाकडे जाऊन ठाकरे सरकार यांच्या विरोधात राजकारण केले जाते. कोरोणाचा थैमान महाराष्ट्रात चालू असताना केंद्रसरकार महाराष्ट्राला पैसे देत नाही,पीपीई किट देत नाहीत,गहू देत नाहीत,डाळ देत नाहीत आणि मुख्यमंत्री फंडाला निधी देऊ नका असे सांगत आहे.त्यामुळे इथला लॉक डाऊन उठू नये इथे कोरोना रुग्ण वाढावेत असेच संघी भाजपा वाल्यांच्या मनात आहे काय..? असे बरेच प्रश्न महाराष्ट्रातील जनते समोर उभे रहात आहेत.जर असेच असेल तर मग एवढ्या हाल अपेष्ठा सहन करून केंद्रसरकारच्या लॉक डाऊनमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्रातील जनतेचे भलं होईल असे वाटत नाही.त्यामुळे ३ मे नंतरचा लॉक डाऊन आम्ही पाळणार नाही सोशल डीस्टटिंग पाळणार नाही.आम्ही फिजिकल डीस्टटिंग पाळत आमचे कार्य आणि जीवनमान पुन्हा एकदा स्वत:हून पूर्वपदावर आणू हे आता केंद्र सरकारने लक्षात घेतले पाहिजे.

Thursday, April 23, 2020

महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना विरोधाच्या लढाई बाबत संघी भाजपा गंभीर का नाहीत....? राजेश खडके सकल मराठी समाज....!



          विषय असा आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात भारतातील प्रत्येक व्यक्ती संविधान आणि लोकशाहीचे गोडवे गायला लागला होता.मोठ्या आक्रमकपणे तो आपले अधिकार ठासून सांगू लागला होता.याची जाण संविधान विरोधी शक्तीना झालेली होती.यातच २०१४ चे मोदी सरकार यांनी पुलवामा हल्ल्या संदर्भात पाकिस्तानवर केलेला हल्ला या संदर्भात बरेच आरोप प्रत्यरोप करण्यात आलेले होते.पुलवामा हल्ला झाला होता की घडविला होता यावर अद्याप ठोस उत्तर कोणाला मिळाले नाही.असे होत असताना कलम ३७० च्या मुद्यावर संपूर्ण देशात मोठा धुमाकूळ झालेला होता.२०१९ च्या मोदी सरकारने CAA – NPR – NRC कायदा लागू केल्याने देशातील वातावरण ढवळून निघाले असताना मोदी सरकारच्या विरोधात संपूर्ण देशात दलित – मुस्लीम – ओबीसी मोठ्या प्रमाणात एकत्र झाल्याचे चित्र निर्माण झालेले होते.यातच भारत हिंदूराष्ट्र असल्याच्या वावड्या उठू लागल्या होत्या.त्यामुळे २०२५ ला आरआरएस या संघटनेला १०० वर्ष पूर्ण होताना दिसत आहे.त्यामुळे त्यांना हिंदुराष्ट्राची संकल्पना अस्तित्वात आणून महोत्सवी वर्ष सुरु करायचे आहे.परंतु २०२४ ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागत असल्याने देशातील स्थिती पहाता पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल असे त्यांना वाटत नाही.त्यामुळे मुस्लीम समाजाचा विरोध हिंदुराष्ट्र बळकट करू शकते याची पूर्ण जाण असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात जोर देण्याचे कार्यक्रम राबविले जात आहेत.त्याचे जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर पालघर येथील दोन साधूंच्या झालेल्या हत्येच्या सुरु असलेल्या राजकारणा वरून देता येऊ शकेल.जर संपूर्ण भारतात जर कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडलेले असताना संपूर्ण देश कोरोना विरुध्द लढत असताना संघी भाजपा धार्मिक मुद्द्याला हवा का देत आहेत....त्यांना कोरोना विरोधातील लढा महत्वाचा का वाटत नाही असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.आता जनता असे म्हणत आहे की,कोरोनाच्या विरोधी लढ्यात आम्ही सहभागी असताना धार्मिक लढा का उभारला जातोय...मग कोरोनाचे खरेच सावट आहे काय...? जर असते तर संघी भाजपावाले कोरोना संदर्भात गंभीर असले असते......(क्रमशJ

Saturday, April 18, 2020

चीनने दिलेल्या कोरोना वायरसची भीती आम्हाला का वाटते....? रक्त तपासणी अहवाल प्राप्त न होता मृताचे निदान कोरोना…..!


        अवघ्या साडेतीन महिन्यात कोरोना म्हणजे काय हे देशातील प्रत्येक गाववस्तीच्या शेवटच्या घरा पर्यंत माहित झालेले नाव आहे.आणि त्या शेवटच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या कोरोनाची दहशत बसलेली आहे.परंतु या कोरोनाची एवढी दहशत घेणे गरजेचे आहे काय काय...? असा प्रश्न आज प्रत्येक बुद्धीजीवी व्यक्तीला पडलेला आहे.तर त्याचे कारण साधे आहे आणि ते म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री असणारे नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात भारतीय जनतेला केलेले आवाहन येथे महत्वाचे आहे.आणि त्यांनतर न्यूज मिडीयाने कोरोना संदर्भात चालविलेल्या बातम्या येथे महत्वाच्या आहेत असे मी मानतो.एकंदरीत कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्या मुलांची आईबाप काळजी घेत असतात त्यामुळे ते त्याच्या शिक्षणावर जोर देत असतात.कोरोना वायरस हा नवीन असल्यामुळे या विषाणूचा प्रार्दुभाव जगातील मोठमोठ्या देशांना रोखता आलेला नाही.परंतु काही वैज्ञानिक संशोधक आणि डॉक्टर मंडळी यांनी असे सांगितलेले आहे की,विषाणू मुळे होणाऱ्या आजारावर उपचार पद्धत्ती अद्याप तरी विकसित झालेली नाही.त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव लहान मुलावर लवकर होतो त्यामुळे शासनाने शाळा बंद करण्याचा पहिला निर्णय घेतल्या मुळे कोरोना संदर्भातील माहितीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक कुटुंबात लवकर झाला.त्यांनंतर घोषित केलेला २१ दिवसांचा देशहितासाठीचा पहिला लॉक डाऊन प्रधानमंत्री यांनी जाहीर केला आणि तो भारतीय जनतेने प्रामणिकपणे पाळला देखील आहे.आवश्यक सेवा पुरविणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचे थाळी वाजवून,टाळी वाजवून,घंटा वाजवून स्वागत करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असता त्याचे भारतीय जनतेने मनापसून स्वागत केले आहे.परंतु नंतर दीप प्रज्वलित करावे असेही आवाहन करण्यात आल्यानंतर यामध्ये काही जणांना राजकारण दिसले असो.जनतेला वाटले की, लॉक डाऊन २१ दिवसा नंतर उठेन आणि आमची कामधंदे आणि रोजी रोटी पुन्हा सुरु होत्तील या आशेने होणारा त्रास भोगून त्याने या आवाहानाला साद देखील घातली.परंतु आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडणारा समाज आणि त्यांना सेवा पुरविणारी लोक यांच्या बद्दल पुन्हा मिडीयाने गरळ ओकून ज्यांनी प्रामणिकपणे लॉक डाऊन पाळला आहे त्यांचेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.त्यामुळे २१ दिवसांत संपुष्टात येणारा लॉक डाऊन पुन्हा मिडीयाच्या या धोरणामुळे १९ दिवसांनी वाढविला गेलेला.त्यामुळे लॉक डाऊनमध्ये शांत बसलेला समाज अस्वस्थ झाला आणि सरळ तो रस्त्यावर उतरला गेला.आता त्यामागे काही ठिकाणी मिडीयाच्या चुकीच्या बातम्यांचा दूषपरिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत.काही लोकांनी तर रस्यावर धुमाकूळ करीत अक्षरशा लुट केली असल्याच्या बातम्या मिडीयाने प्रसिध्द केलेल्या आहेत.त्यामुळे कोरोना वायरससाठी असणारा लॉक डाऊन आता लोकांना स्वत:ची कैद वाटू लागलेली आहे हे मात्र तेवढे खरे आहे.लॉक डाऊनमुळे सर्वात प्रथम हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांना मदत करण्यासाठी काही लोक पुढे आले त्यांना अन्न पाणी वाटू लागले.परंतु ज्यांना अन्न वाटत होते त्यांचे फोटो ते वायरल करू लागले त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानीपणाचा प्रश्न निर्माण झाला आणि ते म्हणून लागले की “आम्ही मजबूर आहोत...परंतु भिकारी” त्यामुळे अन्न वाटप कमी झाले कारण ज्यांना अन्न वाटायचे होते त्यांना प्रसिद्धीसाठी फोटो हवा होता.अशातच पुन्हा मिडीयाच्या बातम्या उचल खाऊ लागल्या आज इतके कोरोनाचे रुग्ण सापडले,तितके मेले,इथला एरिया सील केला,तिथला एरिया सील केला, अक्षरशा लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती भामावून गेली आहे.तो भ्रमित झाला त्यातच पोलिसांच्या गाड्या सारख्या सारख्या सूचना देत वस्ती,वाड्यात,नगरात,गल्ली बोळात फिरू लागल्याचे दृष्य पाहून लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरून गेलेली आहे.या वेळेतच तुम्हाला जीवन आवश्यक वस्तू खरेदी करता येतील नंतर कोणीही रस्त्यावर फिरायचे नाही.तुमच्या हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आलेला आहे,प्रवासी वाहतूक बंद केली आहे,खाजगी वाहनांना पेट्रोल देणे बंद केले आहे,शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश होणार नाहीत.अक्षरशा पर्यटन व्यवस्था कोलमडून गेली आहे,अशा स्वरूपाच्या बातम्या रोज येऊ लागला त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपले लोक आपल्या पासून हिरावून गेल्याचे वाटत असल्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.आपल्या मुला बाळांचे भवितव्य काय याचा प्रशन पडल्यामुळे तो घाबरलेला आहे.त्यातच ससून हॉस्पिटलच्या हलगर्जी कारभारामुळे तेथील कोरोना रुग्ण दगावले असल्याची तक्रार कॉंग्रेसचे पुणेशहर नेते अरविंद शिंदे यांनी केल्यामुळे तेथील ससून प्रमुख यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. अरविंद शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे.रक्त तपासणीचा अहवाल न येता मृत रुग्ण कोरोनामुळे दगावला असे खोटे विधान ससून हॉस्पिटल यांनी जाहीर का केले असाही आरोप त्यानी लावलेला आहे.त्यामुळे पोस्टमार्टम न करता रक्त तपासणी अहवाल प्राप्त न होता मृताचे निदान कोरोना का दाखविले जाते असा आरोप करून तशी तक्रार त्यानी शासनाकडे केली आहे.त्यामुळे लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरलेला आहे.