Saturday, April 21, 2018

असा आहे भगव्या विरुध्द निळा संघर्ष त्यामुळे भगवा पण आपला आहे आणि निळा पण आपलाच आहे....!


गौतम बौध्द (भगवा ध्वज) सम्राट अशोक (भगवा ध्वज) गौतम बौध्द पंढरपूर विठ्ठल वारकरी सांप्रदाय (भगवा ध्वज) स्वराज्य संकल्पना निर्माते नागवंशीय शहाजीराजे (भगवा ध्वज) समतावादी स्वराज्य संस्थापक नागवंशीय बौध्द अनुयायी शुद्र छत्रपती शिवाजी महाराज (भगवा ध्वज) समतावादी स्वराज्य रक्षक साहित्यिक संस्कृत पंडित रयतेला समतेचा स्वतंत्र्याचा न्यायाचा मार्ग दाखविणारे छत्रपती संभाजी महाराज (भगवा ध्वज) छत्रपती संभाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार करणारे शाक्त धर्मीय गोविंद महार (भगवा ध्वज) १ जानेवारी १८१८ युध्द करणारे सातारा गादीचे सरदार शाक्त धर्मीय सिद्ध्नाक महार (भगवा ध्वज) २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक धर्म स्थापन करणारे महात्मा ज्योतिबा फुले (भगवा ध्वज) २४ सप्टेंबर १९२४ ला समता सैनिक दल स्थापन करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर (भगवा ध्वज) आणि स्वतंत्र भारताचा ध्वज भगवा असावा असा प्रस्ताव मांडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर याच विचारावर प्रबोधनकार ठाकरे यांनी १९६७ ला शिवसेना स्थापन केली (भगवा ध्वज) आणि बाळासाहेब ठाकरे यांनी १९७८ हाच भगवा ध्वज घेऊन हिंदुत्ववाद उभा करून मराठवाडा विद्यापिठास डॉ बाबसाहेब आंबेडकर नामकरण करण्यास विरोध केला.त्यामुळे आपला असलेला भगवा ध्वज हा आपल्याला आपला वाटेनासा झाला आणि १९८० ला आरएसएस ने घेतला आणि हाच भगवा ध्वज भारतीय जनता पार्टी यांनी हिंदुत्ववाद म्हणून १९८२ स्वीकारला.हिंदुत्ववाद प्रगल्भ करण्यासाठी १९८९ ला अॅक्ट्रोसिटी अॅक्ट नुसार कायदा तयार झाला आणि महार हा शब्द जातीवाचक करण्यात आला.या कायद्याचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काही एक संबध नाही.आणि १९९४ ला मराठवाडा विद्यापीठास नामविस्तार केला.असा आहे भगव्या विरुध्द निळा संघर्ष त्यामुळे भगवा पण आपला आहे आणि निळा पण आपलाच आहे म्हणून मी म्हणतो “भगवा ध्वज विचार तर निळा ध्वज संघर्ष”

*"भगवा"* ही सुद्धा *बुद्धाचीच देन आहे.*
"""""""""""""""""""""""""""""""""""


*पाली वाङ्मयात बुद्धांना* पुनःपुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे *'भगवा'*,
*भगवा* म्हणजे *'उत्तम गुणांनी संपन्न*. या शब्दाचे मुळ रूप *'भगवत्'* असे आहे. *'भगवा'* हे त्याचे प्रथमा विभक्तिमधील एकवचन होय.
संस्कृतमध्ये *'भगवान्'* असे रूप वापरले जात असले, तरी *पालीमध्ये 'भगवा'* हेच वापरल्रे जाते. *मुळ त्रिपिटकात भगवा हा शब्द ८७५८ वेळा आला आहे*.

*त्रिपिटक, अठ्ठकथा आणि टिका या सर्व ग्रंथांचा एकत्रित विचार केला तर, 'भगवा' हा शब्द १७९४२ वेळा आला आहे.*

एकीकडे *'भगवा'* हा शब्द *बुद्धांना* उद्देशून इतक्या वेळा वापरला गेला आहे आणि दूसरीकड़े तो शब्द एक रंगाचा द्योतक आहे. या दोन गोष्टींचा एकमेकींशी अत्यंत जवळचा संबंध आहे. विविध गुणांनी संपन्न या अर्थाने वापरला जाणारा भगवा हा शब्द *गोतम बुद्धांचा* द्योतक होता.

त्यांचे *चीवर म्हणजे भिक्खुंनी वापरावयाचे वस्त्र रंगीत होते*. बौद्ध भिक्खुंचे *चीवर* ज्या ज्या रंगामध्ये असते, भगवा हा एक महत्वाचा रंग आहे. *गौतम बुद्धांना* उद्देशून वापरला जाणारा *भगवा* हा शब्द काळाच्या ओघात लक्षणेने त्यांच्या *चीवराचा रंग दर्शविण्यासाठी वापरला जाऊ लागला* आणि मग *'भगवा'* हा शब्द एका रंगाचा द्योतक बनला.

.गोतम बुद्धांना* पचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच वैदिकांनी *भगवा हा शब्द* स्वीकारुन तो आपल्या संस्कृतीचा एक *मानबिंदु बनवला*
आणि
*गोतम बुद्धांवरील प्रेमामुळे भगव्या रंगाविषयी आदर असलेला बहुजन समाज नकळत वैदिक संस्कृतीशी जोडला गेला,* हळुहळु बुद्धांपासून तुटून वैदिकांच्या बंधनात अधिकाधिक अडकत गेला. (बुद्धाशिवाय पर्याय नाही)

*(डॉ. आ. ह. साळुंके)*

*।।इपितो सो भगवा अरहंत।।*


राजेश खडके
सकल मराठी समाज

No comments:

Post a Comment