Saturday, August 15, 2020

शेड्युल्ड कास्ट फेडरेशन म्हणजेच वंचित बहुजन आघाडी होय....उदाहरण “डफली बजाओ आंदोलन” होय...! राजेश खडके सकल मराठी समाज

 

            “शेड्युल्ड” म्हणजे यादी आणि “कास्ट” म्हणजे जाती असा त्याचा अर्थ होय...आणि हा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये स्थापन केलेला डीप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि १९३५ मध्ये स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष या दोन संस्था समजून घेतल्या पाहिजेत.या दोन संस्था समजून घेतल्यास आपल्याला १९४२ मध्ये स्थापन केलेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन समजून घेता येईल आणि जेव्हा आपण शेड्युल्ड कास्ट फेडरेशन समजून घेऊ तेव्हा आपल्यला वंचित बहुजन आघाडी ही संस्था समजून घेता येईल.

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी ठेऊन स्वराज्य समजून घेतले होते.महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या समाधीची बंद असलेली दिवाबत्ती पुन्हा सुरु करून १८६९ मध्ये पुण्यातील हिराबाग येथे छत्रपती शिवरायांची पहिली जयंती सुरु करून छत्रपती शिवरायांचे समतेचे विचार जनतेमध्ये पोहचून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.याच दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली होती.

    छत्रपती शिवाजी  महाराज यांनी अलुतेदार व बलुतेदार यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन केले होते.अशा स्वराज्याची राजधानी असलेल्या परिसरात म्हणजे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ साली “जय भवानी जय शिवाजी” घोषणा देऊन केला होता.....म्हणजेच “गावगाडा” जागरूक करून गावगाड्यातील अलुतेदार व बलुतेदार यांना न्याय देण्याचा लढा उभा केला.ज्या मनुस्मृतीने गावगाड्यात जातीयता निर्माण करून स्वराज्यातील खऱ्या मावळ्यांवर अन्याय केला अशी मनुस्मृती दहन करून अति मागास जाती वर्गासाठी “डीप्रेस्ड क्लासेस फेडरेशन” ही संस्था उभी केली होती.

       भारताचा मुख्य कणा इथला कामगार वर्ग असल्यामुळे तो मजबूत होणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना निर्माण होऊन त्याला न्याय देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “स्वतंत्र मजूर पक्ष” निर्माण करून खरा कामगारांचे नेते म्हणून पुढे आले आणि ३ ऑगस्ट १९४२ साली कामगारांच्या हक्कासाठी कामगार कायदा मंजूर करून घेतला.

       बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि कुणबी मिळून जो एकतीस सदस्यांनी जो गावगाडा उभा केला त्या एकतीस सदस्यांच्या आणि फिरस्ते म्हणून असणाऱ्या जातींच्या अनेक जाती निर्माण झालेल्या होत्या.त्या सर्व जातींचा आभ्यास करून त्यातील प्रत्येक जातींना न्याय देण्याची भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेऊन त्या गावगाड्यातील जातींचे जातीनिहाय वर्गीकरण करून त्याचे शेड्युल्ड तयार करून घेतले होते......म्हणजेच जातीची यादी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली होती.या सर्व जातींना एक करून त्यांच्या न्याय हक्कासाठी १७ व १८ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे अधिवेशन भरवून “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाची स्थापना करून शेतकरी कामगार पक्षा बरोबर युती करून निवडणूक लढविलेली होते.म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी याच गावगाड्यातील लोकांना लॉकडाऊन मधुन बाहेर काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात “डफली बजाओ आंदोलन” उभारून नागपूरमधून स्वत: आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली स्थापन केलेल्या “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या माध्यमातून ३ ऑगस्ट १९४७ साली भारताचे कायदामंत्री झाले आणि १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला आणि याच स्वतंत्र झालेल्या भारत देशाला संविधान देऊन गावगाड्यातील प्रत्येक जातीला संविधानिक अधिकार मिळवून दिलेले आहेत. “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडविलच्या माध्यमातून भारतीय स्त्री ला १९५२ मध्ये गुलामगिरीतून मुक्त करून तिला हक्क मिळावे म्हणून मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे.

        “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाचे नेतृत्व करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गावगाड्याची जुनी बौध्द संस्कृती पुन्हा गावगाड्याला देण्यासाठी १९५६ साली बुध्द धम्माची दीक्षा घेतली आहे.त्यानंतर त्यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा याच “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” पक्षाचा ध्वज त्यांना अर्पण करण्यात आलेला होता.

     डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर लोकसभेची निवडणूक झाली आणि “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” पक्षाचा ध्वज दिल्लीला फडकला यामध्ये “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाचे दादासाहेब गायकवाड,बी सी कांबळे,बाळासाहेब साळुंके,डी ए कट्टी,बी के माने लोकसभेवर निवडून गेले आहेत.नंतर या सर्वानी १९६२ पर्यंत “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” च्या वतीने खासदार की भोगलेली आहे.

     एकंदरीत आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे कामकाज पाहिले असता असेच दिसून येते की ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा “शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” उभा करीत आहेत(क्रमशJ


3 comments:

  1. दादासाहेब गायकवाड कम्युनिष्ट पक्षातीच्या #_महाराष्ट्र तोडो आंदोलनात कधी सामिल झाले?

    ReplyDelete
  2. राजेश खडके साहेब तुमच्या लेखणीला खुप धार आहे. तुम्ही अतिशय तंतोतंत सत्या लिहीले आहे. मी शत प्रतिशत तुमच्या लेखाशी सहमत आहे. जय शिवराय जय भिमराय.

    ReplyDelete
  3. हो बरोबर आहे

    ReplyDelete