Friday, September 18, 2020

रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही....शेकाफेचे दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन.....!


 

          प्रश्न असा आहे की आम्ही दिवसभरात शेकडो वेळा “जय भीम” म्हणत असतो आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत असतो.परंतु त्यानी केलेले थोर सामाजिक कार्य आणि संसदीय राजकारण याचा लक्षपूर्वक आभ्यास करीत नाही म्हणून स्वराज्याचे महार योध्दा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांची ओळख आम्हाला राहत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांनी गावगाडा उभा करून काळीमध्ये बी पेरून संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून कुणबी उभा केला आज त्या बलुतेदार व अलुतेदार यांना प्रशासकीय व्यवस्थेतून बाहेर करून मनुवाद्यानी गावगाडा ताब्यात घेऊन तेथील व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली होती. अशा व्यवस्थे विरोधात गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांनी पंढरपूर येथे आखाडा उभा करून वारकरी पंथ स्थापन करून त्यांच्या हातात समतेचा भगवा पताका देऊन या वेदिक विरुध्द असा संघर्ष उभा करून नेहमी गावगाड्याचे संरक्षण केलेले आहे. याच वारकरी पंथातील संत तुकाराम माहाराज यांना गुरुस्थानी ठेवून शहाजी राजे व माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाराय यांनी गावगाड्याच्या संरक्षणासाठी स्वराज्य उभे केलेले होते.परंतु या वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाला हाताशी धरून स्वराज्य संपवून पेशवाई उभी करून पुन्हा गावगाड्यावर कब्जा केलेला होता. हा कब्जा उखडण्यासाठी प्रतिशिवाजी म्हणून राजे उमाजी नाईक यांनी कार्य केल्याचे इतिहास सांगतो. ह्याच  राजे उमाजी नाईक यांचा इतिहास पाहून महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती पुण्यातील हिराबाग याठिकाणी साजरा करून त्यांचे समतेचे विचार रुजवून पुन्हा एकदा गावगाडा उभा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा इतिहास आपल्याला दाखला देतो.परंतु आज आपल्याला हिराबागेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली जयंती दिसून येत नाही.

      वारकरी पंथातील संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वैदिक धर्म पंडितांनी उध्वस्त केलेला गावगाडा आणि गावगाडा उभा करणारे बलुतेदार व अलुतेदार यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन गावगाड्यावर बसविलेला मनुचा कायदा म्हणजे मनुस्मृती स्वराज्याची राजधानी रायगडाच्या परिसरात दहन केली आहे. या गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार तसेच फिरस्ते आणि अल्पसंख्याक यांना सामाजिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी एससी,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी व अल्पसंख्याक यांच्या जातीच्या याद्या तयार करून त्या जातींच्या याद्यांना  “शेड्युल्ड कास्ट” असे संबोधले होते.या तयार केलेल्या जातींच्या याद्या (शेड्युल्ड कास्ट) यांना न्याय देण्यासाठी फेडरेशन तयार केले.पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष १९४२ रोजी स्थापन करून त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मद्रास येथील एन शिवराज यांची नियुक्ती केली.तसेच शेड्युल्ड कास्ट फेडरेशन वतीने १९४७,१९५२, निवडूक लढवून १९५४  रोजी पोटनिवडणूक लढविलेली होती.

         डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ साली महापरिनिर्वाण झाले आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुकीत एकूण आठ खासदार जनतेने शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे निवडूण दिले.त्यामध्ये श्री एन शिवराज,श्री दादासाहेब गायकवाड,श्री बी सी कांबळे,श्री के टी परमार,श्री एस के दिघे,श्री जी के माने,श्री डी ए कट्टी आणि श्री बाळासाहेब साळुंके हे होते.या सर्वानी १९६२ पर्यंत खासदारकी सांभाळलेली आहे.परंतु यातील बाळासाहेब साळुंके यांचे १९६१ मध्ये निधन झाले आहे.

     आपण जर दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांच्या मुंबई प्रांत दक्षिण मतदार संघाचा आभ्यास केला तर आणि सदरचा मतदार संघ समजून घेतला तर आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही,कारण हा मतदार संघ स्वराज्याचा मतदार संघ आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी म्हणजे जुन्नर,आंबेगाव,खेड येथील मतदारांनी श्री साळुंके यांना मतदान केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्हे येथील प्रचंडगड ताब्यात घेऊन त्याठिकाणी स्वराज्याचा भगवा पताका उभारून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचे नामांतर तोरणगड असे केले अशा ठिकाणच्या मतदारांनी श्री साळुंके यांना मतदान केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि ज्या राजगडा वरून स्वराज्याचा २२ वर्षे राज्य कारभार पाहिला. अशा राजधानी मधील म्हणजे भोर येथील मतदार यांनी श्री साळुंके यांना मतदान केले आहे.ज्या मावळातून बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारले अशा मावळ व मुळशी येथील मतदार यांनी बाळासाहेब साळुंके यांना मतदान केले आहे.त्याच प्रमाणे पोलादपूर येथील मतदार यांनी मतदान केले आहे.स्वराज्यातील प्रसिध्द असणारे सरदार राजे निंबाळकर यांचे असणारे फलटण गावातील लोकांनी मतदान केले आहे.त्याच प्रमाणे पुरोगामी विचारांचे नेते तसेच देश पातळीवर ज्यांची गावगाड्याचे नेते म्हणून ओळख आहे असे मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या बारामती मतदार संघातील लोकांनी अॅड बाळासाहेब साळुंके यांना निवडूण देऊन ससंदे मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचा झेंडा फडकविलेला आहे.

         असे दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वंजारी यांनी अभिवादन भाषणात एवढ्या मोठ्या माणसाची म्हणजे ज्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर काम केले आणि स्वराज्याने ज्याला निवडून अशा मोठ्या माणसाची ओळख चळवळीच्या कार्यकर्त्याला नाही याबद्दल शोकांतिका व्यक्त केली.या अनुषंगाने असा प्रश्न उपस्थित होत आहे की जे चळवळीचे जेष्ठ नेते आहेत यांनी याबाबतची माहिती तरुणांना का नाही दिली नाही.

  आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे वेगवेगळ्या जातीचे उमेदवार दिले होते.आणि निवडणूक प्रचारासाठी भाषण करण्यासाठी जी ठिकाणे निवडलेली होती ती सर्व ठिकाणे ही शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला मतदान करणारे स्वराज्यातील मतदारांची होती.हा सर्व आढावा पहाता  आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवीत शेकाफे या पक्षाची भूमिका घेऊन गावगाड्यातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि फिरस्ते तसेच अल्पसंख्यक यांना उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सत्य स्वीकारून रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नसल्याचे वक्तव्य करून शेकाफेची पुनरावृत्ती म्हणजेच वंचित बहुजन आघाडी असल्याचे मान्य केले आहे.

  यामुळे अशा स्वराज्याचा महार योध्दा दिवंगत खासदार अॅड बाळासाहेब साळुंके यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!

No comments:

Post a Comment