Saturday, October 10, 2020

प्रामाणिक कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन.....! सकल मराठी समाज


 

खरेच आरक्षण मिळाले का...?

विषय असा आहे की,१९६० रोजी उभा महाराष्ट्र आडवा करून त्याला १९६० पासून संयुक्त महाराष्ट्र करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कमी करण्यात आले.यासाठी दाखविलेली काहीही करणे असू शकतात.परंतु १२ बलुतेदार व १८ अलुतेदार आणि कुणबी यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले होते.त्यामुळे बलुतेदार व अलुतेदार आणि कुणबी मिळून ३१ जाती होतात.काही जाती जंगलातून गावगाड्यात आपले बलुते घेण्यासाठी येत असत त्यांना फिरस्ते म्हणून संबोधले गेले आहेत.त्यामुळे साडे तीनशे वर्षांत मोठ्या प्रमाणात जाती निर्माण करून एकसंघ समाज तोडण्याचे पातक इथल्या वैदिक धर्म पंडितांनी करून त्याचे वेगवेगळ्या जातीत तुकडे तुकडे करून त्यामध्ये आपले काही लोक घुसाडून त्या वेगवेगळ्या जातीवर वर्णाश्रम धर्माचे वर्चस्व निर्माण करून संपूर्ण जाती समाज व्यवस्था आपल्या स्वत:च्या प्रभावाखाली आणली आहे.त्यामुळे १९४२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या जातीच्या याद्या एकत्र करून त्याचे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तयार केले होते.स्वतंत्र भारता नंतर १९५० ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या जातींच्या याद्या प्रसिध्द केल्या होत्या त्या नेमक्या कोणत्या...? या याद्यामध्ये कोण कोण होते हे तपासावे लागेल.१९६० नंतर सयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १९७४ मध्ये जातींच्या याद्या (शेड्युल्ड कास्ट) तयार करण्यात येऊन त्या १९७८ मध्ये पुढील नियमाप्रमाणे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.विमुक्त जातीच्या क.२,खंड (ज) प्रमाणे महाराष्ट्र शासनाने दिनांक १३/२/१९७८ पासून पुढील जाती या विमुक्त जाती (VJ) म्हणून जाहीर केलेल्या आहेत.सदरच्या जातींचा सर्वे प्रामाणिक कार्यकर्त्यानी पुढे येऊन केल्यास खरेच या समाजाला आरक्षण मिळाले आहे काय...? या बाबतीतील माहिती पुढे येईल.

विमुक्त जाती जात अनुक्रमांक १ बेरड      

तुम्ही महाराष्ट्रातील विमुक्त जाती मधील दिनांक १३-२-७८ पासून बेरड    समाजाच्या पुढील प्रमाणे कोणत्या जातीतील आहात...? त्याचे उत्तर होय किंवा नाही असे उत्तर द्यावे.

बेरड

तत्सम जाती खालील प्रमाणे –:

अ)  वगळले

ब) नाईकवाडी

क) तलवार

ड) वाल्मीकी

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक २ बेस्तर    

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ३ भामटा    

अ)  भामटी

     ब) गिरणी वड्डार

     क) कामाटी

ड) पाथरूट

इ) टकारी (मुस्लीम धर्मियांसह)

फ) उचले

ग) घंटीचोर

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ४ कैकाडी     

अ)  धोंतले

     ब) कोरवा

     क) माकडवाले किंवा कोचीकोरवा

ड) पामलोर

इ) कोरवी

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ५ कंजारबाट     

अ)  छारा

     ब) कंजार

     क) नात

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ६ कटाबू

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ७ बंजारा

अ)  गोर बंजारा

ब) लंबाडा,लंबारा

क) लंभाणी

ड) चरण बंजारा

इ) लभाण

फ) मथुरा लभाण

ग) कचकीवाले बंजारा

ह) लभान बंजारा

ई) लमाण,लमाणी

ज) लबान

झ) वगळ्यात आले

ल) धाली,धालिया

म) धाडी,धारी

न) सिंगारी

व) नावी बंजारा

प) जोगी बंजारा

ब) वगळ्यात आले

र) वगळ्यात आले

स) बंजारी

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ८ वगळले ८) पालपारधी

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ९ राजपारधी

अ)  वगळले

ब) गाव पारधी

क) हरीण शिकारी 

ड) वगळले

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक १० राजपुत भामटा

अ)  परदेशी भामटा

ब) परदेशी भामटी

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक ११ रामोशी

११ रामोशी ११) वगळ्यात आले.

 

विमुक्त जाती जात अनुक्रमांक १२ वडार

अ)  गाडी वड्डर

ब) जाती वड्ड

क) माती वड्डर

ड) पाथरवट

इ) सांगतराश/दगड फोडू

फ) वड्डर

विमुक्त जाती जात अनुक्रमांक १३ वाघरी

१३  अ) सलात

    ब) सलात वाघरी

विमुक्त जाती जात अनुक्रमांक १४ छप्परबंद (मुसलमानासह)

 

No comments:

Post a Comment