Monday, February 18, 2019

स्वराज्य ते संविधान म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे संविधान कोठे आहे…..? सकल मराठी समाज राजेश खडके


छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे…...प्रथम त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…!
हा लेख लिहित असताना मनाला अत्यंत वेदना होत आहे...कारण छत्रपती शिवराय खरे आम्हाला समजले नाही किंवा आम्हाला समजू दिले गेले नाहीत.परंतु ज्या वेळेस मानव धर्म आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवराय यांचे स्वराज्याचे संविधान दिसते तर वैदिक धर्म पंडित यांची मनुस्मृती दिसते.या भारताची खरी सुरुवात सिंध प्रांत म्हणून सुरु झालेली आहे.आणि त्या सिंध प्रांतात स्त्री शक्तीचे राज्य होते याची कल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आता आलेला आहे.आज आपण त्याच सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणतो.परंतु हा हिंदू शब्द इतिहासात कधी दाखल झाला याला काही पुरावे नाहीत.त्यामुळे आपण जगत असलेली संस्कृती ही सिंधू संस्कृतीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.मानवकल्याणकारी स्त्री संस्कृतीने आपल्याला शेतीचे संशोधन दिलेले आहे.शेतीची अवजारे संशोधन म्हणून दिलेली आहे.या विकासामुळे आपल्याला एका ठिकाणची स्थयिक अशी वस्ती दिलेली आहे.त्यामुळे आपल्याला सामाजिक जीवन मिळालेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळेच सिंधू संस्कृतीमध्ये असलेले विद्वान (बुध्द) यांनी विचार (धम्म) आणि सामाजिकता म्हणजेच एकी (संघ) दिलेला आहे.ही संस्कृती साडेतीन हजार वर्षापूर्वीची आहे.त्यानंतर क्षेत्ररक्षक म्हणून आणि पहिला पुरुष शेतकरी म्हणून बळीराजा याचा मान केला जातो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आपण “बळीराजा" म्हणतो.म्हणून या भारत देशातील प्रत्येक महापुरुषाने या बालीराजालाच महत्व दिलेले आहे.आणि हाच मानवकल्याणकारी विचार गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे.त्यानी नेहमी विद्वानांचा सन्मान करून तो सन्मान या सिंध प्रांतातील लोकांनी करावा असे त्यांचे म्हणणे होते.विद्वानांनी दिलेला विचार नेहमी जपला पाहिजे असेही त्यानी सांगितले आहे.आणि या विद्वानांनी दिलेली सामाजिकता सर्वांनी जपली पाहिजे असेही त्यानी सांगितलेले आहे.मनुष्यातील भेदभाव हा मानवहित जपणारे नसून मानवी कल्याणाला घातक आहे असे त्यानी सांगितलेले आहे.म्हणून भगवे वस्त्र धारण करून “भगवान बुध्द” झाले आणि त्यांनी जगाला बुध्द म्हणजे विद्वानांचे तत्त्वज्ञान दिलेले आहे,जीवन हेच सत्य आहे आणि मानवकल्याण विचारच महत्वाचा आहे असे त्यांनी सांगितेलेले आहे.आणि मानवाला खरे जीवन हे पिंपळाचे झाड देते म्हणजे चौवीस तास अॉक्सिजन देते म्हणून गौतम बुद्धांचे विचार आधुनिक विचार असल्यामुळे साऱ्या जगाने ते स्विकारलेले आहे.त्यांचे विचार सम्राट अशोक यांनी स्वीकारून संपूर्ण राज्य त्याचे आचरण केले असा विचार आनंतकाळ टिकून रहावा यासाठी संपूर्ण तत्कालीन भारतामध्ये बुध्द विहार,स्तूप,लेण्या उभारलेल्या आहेत.त्यामुळे वर्णाश्रम धर्म त्यांनी कधीही या भारतात उभा राहू दिला नाही.पुढे वर्णाश्रम धर्म जोपासणारे वैदिक धर्म पंडित यांनी याच सम्राट अशोकाचा वंश संपवून ते बौध्द राज्य आपल्या ताब्यात घेऊन संपूर्ण भारतात वर्णाश्रम धर्म प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती.परंतु महाराष्ट्रातील पंढरपूर येथील बुध्द विहारातील गौतम बुद्धांना “पांडुरंग” म्हणजे कमळाचे फुल अशी उपमा देऊन संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदाय स्थापन करून भगवान गौतम बुध्द यांचे भगवे वान आणि सम्राट अशोक यांचा भगवा ध्वज घेऊन मानवकल्याणकारी बौध्द विचार विचार घेऊन मनुस्मृतीच्या विचारणा रोखण्याचे कार्य केले.आणि त्याची परंपरा संत तुकाराम महाराज यांचेपार्यंत पोहचली आहे.त्यामुळे भगव्या ध्वजाखाली केलेले कार्य हे मानव कल्याणकारी आहे हे समजण्यास कारण आहे.आजच्या महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ अडीच हजार बुध्द लेण्या आहेत आणि याच लेण्यामध्ये सिंधू संस्कृती मधील स्त्री शक्ती म्हणजे “नेऋती” म्हणजे अधिशक्ती आहे.आणि याच अधिशक्तीला छत्रपती शिवाजी महाराज “जगदंब” म्हणत असत.त्यामुळे शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी हेच समतेचे निशाण म्हणजे मानव कल्याणकारी ध्वज शिवरायांच्या हाती देऊन “स्वराज्य स्थापनेची” संकल्पना हातात दिली.याच स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी शिवरायांनी स्त्रीची बेअबदा आता स्वराज्यात चालणार नाही हे दाखविण्यासाठी स्त्रीची बेअबदा करणाऱ्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी दरी डोंगर पिंजून काढलेली आहेत.त्यामुळे त्यांचा आणि बौध्द लेण्यांचा संपर्क शंभर टक्के आलेला आहे हे नाकरून चालणार नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैदिक धर्माच्या विरोधात जाऊन मानव धर्म राज्य स्थापन केले आहे.अभिषिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य होते.त्यामुळे अशा स्वराज्याला संविधान असणे गरजेचे आहे.कारण संविधान नसेल गटर स्वराज्य चालविता येत नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याला संविधान दिलेले होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.जर त्यांनी संविधान दिले नसते तर स्वराज्य कारभार त्यांना चालविता आला नसता आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्याचे गद्दार यांना त्यांची दरबारात हेरिंग घेऊन शिक्षा सुनाविता आली नसती. स्वराज्याला महसूल गोळा करता आला नसता आणि रयतेला स्वत:चे राज्य वाटले नसते त्यामुळे त्यांचे संविधान हे गायब केले असल्याचा आरोप आमच्या सकल मराठी समाजाचा या बामणी व्यवस्थेवर आहे.परंतु स्वराज्याचे वंशज म्हणून त्या संविधानाची प्रत त्यांच्या वंशाजाकडे होती त्यामुळेच ती बाबासाहेब आंबेडकर यांना प्राप्त झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य समतेचे होते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जनते समोर आणले. रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली आहे.त्यांना जशी शिवरायांची समाधी सापडली तशी पुणे महानगरपालिका यांना सिहागडा वरील तानाजी मालुसरे यांची समाधी सापडलेली आहे.त्यामुळे मनुवादी व्यवस्थेचे महात्मा फुले यांचे वरील आरोप फोल ठरले आहेत.त्याचे कारण असे की,तानाजी मालुसरे यांची समाधी स्वत: शिवराय यांनी बांधली तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली आहे.त्याच प्रकारे वढू येथील गोविंद महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्वत: बांधलेली आहे. त्यामुळे बामणी व्यवस्थेने केलेले विरोध याचाच पुरावा देतात की,वारकरी सांप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य याचा आणि मनुस्मृतीच्या वर्णाश्रम धर्म याचा काही एक संबध नव्हता व नाहीये.त्यामुळे स्त्री शक्ती आणि मानव कल्याण हाच खरा धर्म मानला गेला आहे.परंतु यापासून इथली रयत दूर जावी आणि समतेचा विचार विसरून जावा.यासाठी बामणी व्यावस्थेने ”आर्य सनातनी हिंदू धर्म" व्यावस्था स्थापन करून जातीय व्यवस्था बळकट करण्यासाठी पेशवाईने स्थापन केलेले गणपती यांचे अष्टविनायक मंदिर यांना हिंदू संकल्पनेत निर्माण करून व्दिराष्ट्र संकल्पना मजबूत करण्यासाठी समतेचा राजा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपवून टाकली.गणपती उत्सवाचा माध्यमातून पहिली हिंदू-मुस्लीम दंगल घडवून समतेच्या राजाला आर्य सनातनी हिंदू धर्म संरक्षक केले आहे.परंतु डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची १९२० मध्ये कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज यांनी भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या संविधानाची प्रत देऊ केली होती.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगितला होता.तेव्हा आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास केला.त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदाय याचा अभ्यास करून संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून स्वराज्याचे कार्य पुढे नेण्यासाठी समता सैनिक दल स्थापन करून कोरेगाव भीमा याठिकाणी शूर वीरांना मानवंदना देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे झाले असल्याचे संकेत देऊन इतिहासाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचे दहन त्यांनी केले आहे.त्यामुळेच इथल्या भूमी पुत्राला न्याय देण्याचे थोर मोठे कार्य त्यानी केले आहे.सिंधू संस्कृतीचे विचार महत्वाचे आहेत आणि आधुनिकता महत्वाची आहे त्यानी :रुपयाची समस्या” हा ग्रंथ लिहून इथला बळीराजा जागविण्यासाठीची योजना त्यानी तयार करून इथली अर्थव्यावस्था मजबूत करण्याचे कार्य केले आहे.स्वराज्यातील महार योध्यांचे स्थान बळकट करण्यासाठी “महार बटालियन" स्थापन करण्यास इथल्या ब्रिटीश व्यवस्थेला भाग पाडले आहे.एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज.महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे कार्य हे इथल्या वैदिक धर्म पंडितांच्या आणि आर्य सनातनी हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात होते.त्यामुळेच यांची व्दिराष्ट्र संकल्पनेला मोठ्या प्रमाणात विरोध करून पाकिस्तानची वेगळी निर्मिती रोखण्याचा मोठ्या प्रामाणात प्रयत्न आंबेडकर यांनी केला होता.स्वतंत्र भारताचे संविधान लिहून त्यामध्ये यांना हक्क व अधिकार देऊन ते भारताला प्रदान केले आहे.जेव्हा हे संविधान प्रदान करीत असताना संविधान सभेत भाषणात त्यानी छत्रपती शिवराय यांचा उल्लेख करून शिवरायंचे सराज्य होते म्हणजेच संविधान होते म्हणून मला हे संविधान लिहायला सोपे झाले असे ते म्हणाल होते.अशा तत्त्वज्ञ असणाऱ्या महापुरुषांचे पुतळे विश्वशांती घुमटात बसविण्याचा नकार एमआयटी संस्थेचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी दिला आहे.अशा कृत्यचा विरोध आणि निषेध पर्त्येक स्तरातून झाला पाहिजे.त्यामुळे स्वराज्य ते संविधान असा जो प्रवास झालेला आहे त्याचे सर्वात जास्त श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते.त्यामुळे आर्य सनातनी व्यावस्थेने भारत देशाचे संविधान बदल्याचे षड्यंत्र सुरु केले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा एक वर्ग आहे जो शिवारायंचा सत्य इतिहास स्वीकारतो आणि दुसरा असा एक वर्ग आहे जो घराणेशाही मानतो आणि मनुवादी विचारसरणी जोपासतो तो छत्रपती शिवाजी महाराज यांना एक धर्मीय रुपात जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे अशा लोकांना सकल मराठी समाजाचा एकच प्रश्न आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे संविधान कोठे आहे….?

No comments:

Post a Comment