Thursday, September 28, 2017

शनिवार वाडा होता पूर्वीचा लाल महाल - Shanivaar Wada

                                                    

                                                     लाल महाल भाग - १
हाच तो लाल महाल माता जिजाऊ यांनी बाल शिवराय यांना याठिकाणी स्वराज्याचे शिक्षण दिले...आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिले नाही....आणि स्वराज्याचा नोकर पेशवा याने या लाल महालाच्या आजू बाजूला लाल विटांची भिंत बाधून याचे नामांतर शनिवार वाडा करून स्वराज्यावर ताबा मिळविला.त्यामुळे शिवप्रेमींची आजही इच्छा आहे की,याचे शनिवार वाडा नाव काढून पुन्हा याला लाल महाल असे नाव देण्यात यावे.

                                                       लाल महाल भाग - २
पेशव्याने मारला लाल महालावर ताबा....त्याचा केला शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच लाल महालावर (आजचा शनिवार वाडा) ताबा मिळवून बसलेल्या शाहिस्ते खानाची चार बोटे कापली.जीवावरचे बोटावर गेले असे समजून धूम ठोकून तो लाल महाल सोडून पळून गेला.म्हणजे महाराजांना शाहिस्ते खान हा लाल महालावर ताबा मिळवून बसलेला आवडला नाही.मग पेशव्याने लाल महालाला ताबा मारून त्याचे शनिवार वाड्यात रुपांतर केले मग स्वराज्याचा स्वराज्यप्रेमी गप्प का ...?

                                                       लाल महाल भाग - ३
शनिवार वाडा की लाल महाल......! प्रवीणदादा गायकवाड....आणि मराठा तरुण....!
मराठा तरुणांमध्ये जय जिजाऊ आणि जय शिवराय असे प्रबोधन होणार काय ....की,पेशवाई समर्थक म्हणून गप्प राहणार....!
गंमत अशी आहे की,आम्ही लाल महालाचे सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु केला.आता हा काय प्रयत्न आम्ही नवीनच करीत आहे असे नाही.मा.म.देशमुख यांचे सारख्या तर शनिवार वाडा संदर्भात तर एवढे लिखाण केले आहे की,बरेच लोकांनी त्यांच्या पावलावर पाउल टाकले आहे.संभाजी ब्रिगेडचे आणि आताचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी तर बरेच वेळा शनिवार वाडा पाडण्याची भाषा केली आहे...आणि असे भाषण झालेवर टाळ्यांचा गडगडाट करणारे आज शनिवार वाड्याचे नामांतर लाल महाल असे करून पुन्हा एकदा खरा इतिहास बाहेर काढून अज्ञानी युवकांना सज्ञान करावे एवढीच आमची मागणी आहे.ही मागणी समोर येताच आमच्या बरोबर असणारे मराठा नावाचे मित्र आम्हाला सोडून पळून गेले आहेत.आमच्या पोस्टला प्रतिक्रिया देण्याचे तर सोडा साधं लाईक सुध्दा करीत नाहीत.आता माझा त्यांना असा प्रश्न आहे मग तुम्ही स्वार्थी राजकारण करण्यासाठी आणि स्वत:ची पोळी भाजण्यासाठी जसे सम्राट थोरात या व्यक्तीने भाजली तशी भाजण्यासाठी येत होता का ? तुम्ही पण खासदार संभाजीराजे आणि नारायण राणे यांचे पावलावर पाउल ठेवणार आहेत काय..?

                                                        लाल महाल भाग - ४
"मराठा अस्मिता परिषद" घेण्याऐवजी शनिवार वाड्याला लाल महाल असे नाव देण्यासाठी "लाल महाल नामांतर परिषद" आयोजित करणे आवश्यक होते.
विषय असा आहे हा लढा "वैदिक विरुद्ध वारकरी" असा आहे हे आपण समजले पाहिजे.सर्वात प्रथम आपण वारकरी आहोत नंतर मराठा....!वैदिक धर्मियांनी नेहमी आपले श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी या भारतीयांवर अनेक प्रकारे घातक हल्ले केलेले आहेत...आणि वैदिक धर्म हा फक्त बामणांचा धर्म आहे....आणि याचा प्रत्यय पहिल्या स्वराज्यभिषेक झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना लक्षात आले.कारण शुद्र म्हणून त्यांना राजा मानण्यास याच वैदिक धर्मियांनी नाकरले होते.तेव्हा छत्रपती शिवरायांना संभाजीराजे यांचे ऐकुन २४ सप्टेंबर मध्ये शाक्त पद्धतीत दुसरा राज्यभिषेक करवून घेतला आणि वैदिक बामानांचे श्रेष्ठत्व नाकारून टाकले आहे.याची किमत छत्रपती शिवरायांना प्राण देऊन चुकवावी लागली आहे हे आपण आज विसरलो आहे.छत्रपती संभाजीराजे यांची हत्या करून त्यांना धर्मवीर पदवी देण्यात आली हे पण आपण विसरलो आहे.सनातनी धर्माच्या माध्यमातून लाल महालाचे अस्तित्व संपवून शिवशाही संपवून पेशवाई स्थापित केली गेली आहे.लाखोंच्या संखेने मराठा अस्मिता म्हणून आम्ही ५८ वेळा एकत्र आलेलो आहे.मात्र लाल महालाचे अस्तित्व ज्या शनिवार वाड्याने संपविले त्याच्या विरोधासाठी लाखोंच्या संखेने आम्ही एकत्र एकदाही आलेलो नाही.जो पर्यंत लाल महालची अस्मिता आपण पुन्हा एकदा निर्माण करीत नाही...तो पर्यंत मराठा अस्मिता उभी राहू शकत नाही.त्यामुळे मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून आपली अस्मिता जागरूक होऊ शकत नाही.जो पर्यंत शनिवार वाड्याचे अस्तित्व आहे तो पर्यंत खोले बाई सारखे लोक मजबूत राहणार आहे.त्यामुळे आपल्या परगण्यात आपणच परकीय झालो आहोत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.म्हणून आयोजकांना माझी विनंती आहे की,"मराठा अस्मिता परिषद" घेण्या ऐवजी "लाल महाल नामांतर परिषद" घेण्यात यावी.

                                                    लाल महाल भाग - ५
जातीसाठी ५८ वेळा लाखोंच्या संख्येने एकत्र आलात....आता लाल महालाच्या अस्मितेसाठी एकदा तरी लाखोच्या संख्येने एकत्र या.....!
मराठा जातीसाठी मराठा क्रांती मुख मोर्चाच्या माध्यमातून लाखोंची संख्या एकत्र आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून गावोगावी बैठका घेऊन तरुण तरुणींच्या मनामध्ये एक जोश निर्माण करून "एक मराठा लाख मराठा" अशी घोषणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडले होते....असाच एकदा हा लाखोचा तरुण लाल महालाच्या अस्मितेसाठी एकत्र का येत नाही असा प्रश्न आता सर्वांना निर्माण होत आहे.मराठा अस्मिता ही स्वराज्याच्या इतिहासावर उभी राहिलेली आहे...आणि ती जर पुन्हा जागरूक करायची असेल तर लाल महालापासूनचा इतिहास जागरूक करावा लागेल.शिवरायांनी ज्या लाल महालात स्वराज्याचे धडे घेतले तो लाल महालाचा खरा इतिहास स्वाभिमानाने जगा समोर आणला पाहिजे.महानगरपालिकेने उभी केलेली प्रतिकृतीला लाल महाल दाखवून नवीन पिढीची फसवणूक करू नये त्याचे कारण असे की,त्या प्रतिकृतीच्या बाजूला असलेला शनिवार वाडा पाहून पेशवाईचे राज्य एवढे आवाढव्य कसे असा प्रश्न निर्माण होऊन तो पेशवाईची गुलामगिरी सोडायला तयार होईना.....त्यामुळे खरी मराठा अस्मिता जागरूक करायची असेल तर शनिवार वाड्याचे लाल महाल असे नामांतर झालेच पाहिजे.

                                                              लाल महाल भाग - ६

युगपुरुष खेडेकर साहेबानी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांच्या अस्मितेसाठी बुधवार दि.२७/९/२०१७ रोजी "लाल महाल नामांतर परिषद" होणार काय ....?
प्रश्न असा आहे की,"शनि"म्हणजे वक्रदृष्टी आणि "वार " म्हणजे दिवस तसेच "वाडा" म्हणजे निवास असे शनिवार वाड्याचे विश्लेषण आहे....आणि हिंदू धर्मात या शनीपासून आपली स्वत:ची सुरक्षा करायची असेल तर.....त्या शनीला शरण जाऊन त्याची भक्ती करायची असा समज आहे.मग विषय असा आहे की,शहाजी राजे-माता जिजाऊ-छत्रपती शिवराय यांचे असणारे निवासस्थान "लाल महाल" याला "शनिवार वाडा" असे नाव कोण आणि कसे देण्यात आले.....या "शनि" नावाला मान्यता कोणी दिली.याचा विचार या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा का करीत नाही.मग इथला मराठा कोणती "अस्मिता" या मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे असा आमचा साधा प्रश्न आहे.गेल्या ५ भागातून आम्ही मराठ्यांची खरी "अस्मिता" काय आहे याची मांडणी करीत आलेलो आहे.
आम्ही विनम्र असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक यांना केले आहे....जो पर्यंत या लाल महालावर बामन नावाचा शनी बसला आहे तो पर्यंत मराठा अस्मितेला स्थान निर्माण होऊ शकत नाही.त्यामुळे शनिवार वाडा अशा नावाला इतिहासात कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही.म्हणून आमचे या पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना विनम्र आवाहन आहे की,शनिवार वाड्याचे लाल महाल असे नामांतर होणे आवश्यक आहे.त्यासाठी मराठा अस्मिता परिषद बाजूला ठेऊन छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीसाठी "लाल महाल"नामांतर परिषद घेण्यात यावी....आणि जो पर्यंत अशी परिषद होत नाही तो पर्यंत मराठ्यांना अठरा पगड जातीमध्ये आणि बारा बलुतेदारामध्ये मानाचे स्थान निर्माण होणार नाही.पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठ वाड्यातील आहेत आणि आणि कुणबी समजाचे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत जवळचे आहेत.छत्रपती शिवराय हे पण मराठवाड्यातील आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील नाहीत.त्यामुळे खेडेकर साहेबानी खरा इतिहास बाहेर काढून पेशवाईतील शनी पूजक मराठ्यांना शिवलिंग मंदिर पूजक आणि स्त्री शक्ती पूजक असे घडविले आहे.परंतु मराठा क्रांती मुख मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मराठयांना शनी पूजक घडविण्याचा प्रयत्न पेशवाईतील गुलाम मराठ्यांनी सुरु केला आहे.त्यामुळे मराठ्यांची अस्मिता धोक्यात आलेली आहे.....आणि ती जर खरच जागृत करायची असेल तर "लाल महाल नामांतर परिषद" घेण्यात यावी.


                                                              लाल महाल भाग - ६
शिवलिंग मंदिर - स्त्री शक्ती उपासना - जैन धर्म - बौध्द धर्म - वैदिक धर्म - महाभारत- रामायण -आणि....छत्रपती संभाजी राजे....!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना
छत्रपती संभाजी राजे सत्य...आणि महाभारत काल्पनिक कथा...!
आपल्या देशाला "भारत" हे नाव पूर्वीपासूनचे असलेले नाव आहे....आणि सिंधु नदीच्या माध्यमातून या देशातील राहणारे लोकांना इंदू आणि इंदुज म्हणत असे...हा देश सिंधु संस्कृतीतील असल्यामुळे नंतरच्या काळात हिंदू संस्कृती पध्द्तीचे जीवन जगणारे लोक असे म्हणत होते.ते शिवलिंग मंदिराचे आणि स्त्री शक्तीचे उपासक होते.म्हणून बहुजन समाजाच्या जीवनात स्त्री शक्तीच्या पूजेला खूप महत्व आहे.वेगवेगळ्या पद्धतीत तो स्त्री शक्तीचे पूजन करीत असतो.या देशाचा पहिला धर्म जैन आणि बौध्द धर्म आहे.युरेशिया नावाच्या देशातून ज्या लोकांचे आगमन झाले असे म्हणतात....ते त्यांचे आगमन नसून ते आक्रमण आहे हे पहिले आपण लक्षात घेतले पाहिजे.अशा आक्रमण केलेल्या लोकांना आर्य म्हणत असे या आर्य लोकांचा धर्म हा वैदिक धर्म आहे.स्वत;ला सोडून इतरांना ते या धर्मात कधीच सामावून घेत नाही.या आर्य प्रमुखाचे नाव "मनु" असे होते.या भारत देशातील बहुजन समाजावर आपली पकड निर्माण करण्यासाठी इथली संस्कृती ताब्यात घेण्यासाठी या मनूने स्वत:चा कायदा तयार केला.त्याला मनुस्मृती असे संबोधण्यात आले.यातून सर्वात प्रथम त्यांनी स्त्री शक्तीला बांधण्याचे कार्य केले...आणि तिला बदनाम करण्यासाठी "महाभारत" नावाचा ग्रथ तयार करून त्यामध्ये एका स्त्री ला पाच पुरुषांची पत्नी करून द्रोपदी नावाचे पात्र तयार करून तिचे वस्त्रहरण दाखवून श्रीकृष्णाच्या माध्यमातून त्याने केलेल्या रासलीलेच्या माध्यमातून आंघोळ करणाऱ्या स्त्रियांची छेडछाड दाखवून स्त्रीचे अपहरण दाखविण्यात येऊन स्त्री शक्तीची अवहेलना केली आहे.असा धर्म ग्रथ या भारत देशाचा असू शकत नाही.दिन दुबळ्या बहुजन समाजाचे संरक्षक याला क्षत्रिय दाखवून त्यांच्यात श्रेष्ठत्व निर्माण करून त्यांच्या हातामध्ये दरवर्षी लाल धागा बांधून स्वत:च्या संरक्षणाची हमी घेत त्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला गुलाम केले होते....आणि याच मनुस्मृतीच्या कायद्याचा वापर करून औरंगाजेबाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजे यांना देहदंडाची शिक्षा याच वैदिक धीर्मिय बामनानी दिलेली आहे.असा विसर आज आपल्याला पडलेला आहे.....अशा वैदिक धर्माला भारताच्या राज्यघटनेत कवडीची किमंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली नाही.


                                                           लाल महाल भाग - ७

शनिने लाल महालावर केलेले आक्रमण धुडकावून लावण्यासाठी शनिवार वाड्याचे नामांतर लाल महालात करण्याचा ठराव संमत करणार असल्याचे मराठा अस्मिता परिषदेचे आयोजक यांचे आश्वासन....!
राजेश नारायण खडके
स्वराज्यप्रेमी
आम्ही आमच्या सुरु असलेल्या स्वराज्याचे हिरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हापासून मराठा अस्मिता परिषद ऐवजी "लाल महाल नामांतर परिषद" घेण्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन आम्ही केलेले आहे.तेव्हापासून बरेच बहुजनांचे मला वैयक्तीक फोन आलेले आहेत.आम्ही करीत असलेल्या कार्यक्षेत्रात येऊन आमची भेट घेऊन सदरच्या कार्यक्रमा संदर्भात आमची भेट ते घेत आहे.त्यांचे असे म्हणणे की,काही राजकीय नेत्यांचा आणि मराठा क्रांती मुख मोर्चातील हिंदुवादी मराठा यांचा आमच्यावर दबाव निर्माण झालेला आहे.त्यामुळेच आम्ही खोले बाईच्या विरोधातील काढलेला मोर्चा आम्हाला स्थगित करावा लागला....आणि त्यासाठी खोले बाईच्या मनुवादी विचारांच्या विरोधात "मराठा अस्मिता परिषद" आयोजित करावी लागली आहे....आपण सदरची मराठा परिषद ऐवजी लाल महाल नामांतर परिषद घेण्याचे जे भावनिक आवाहन केले आहे.त्याबाबत आम्ही खेडेकर साहेब यांचे बरोबर चर्चा केली आहे.त्यांनी विषय चांगला आहे घेण्यास काही हरकत नाही.परंतु आता मराठा अस्मिता परिषद कार्यक्रमाची प्रसिद्धी भरपूर झालेली असून त्यात बदल करता येत नाही.परंतु सदरच्या कार्यक्रमात फोकस हा मराठा अस्मिता आणि लाल महाल अशीच राहणार आहे.तेव्हा आम्ही खेडेकर साहेब यांचे बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे उद्या मराठा अस्मिता परिषदेच्या माध्यमातून लाल महाल परिषद होणार अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.त्यामुळे सर्व बहुजन बांधवांना विनम्रतेची विनंती आहे की,शनिवार वाड्याचे नाव बदलून लाल महाल असे नामांतर करण्याचा ठराव संमत होणार असून सर्व बहुजन समाजाने सदरच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवावी.

                                                         लोकांच्या प्रतिक्रिया

१) चंद्रकांतजी डोक्य़ातील असल नसल तेव्हढी घाण बाहेर काढून टाका. कोणाशी काय बोलताय याचं तळतंत्र नाही तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या मारामरीचा फोटो टाकला म्हणजे शिवभक्त ठरत नाही. या शेवटच्या उत्तरात पक्के ठरले की तुम्ह शिनभक्त नसून युरेशियन आर्य ब्राम्हण आहात. याचे कारण तुम्ही स्वराज्याचे गद्दार वंशातील आहात. हे सिध्द होते.
तुम्हाला शिवाजी महाराज कळणार नही. समजले तर बिलकुल नाही.
आमचे घराणेच स्वराज्य व शिवरायांच्या घराणयाला जोडलेले आहे. त्यामुळे स्वराज्याचा इतीहास आम्हाला शिकवायची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडूनच शिकण्याची गरज आहे.


२) स्वराज्यातील गद्दार मराठ्यांच्या सहकार्याने महाराजांनी रयतेसाठी कमवलेली स्वराज्य नावाची कमाईवर ब्राम्हणानी डल्ला मारला आहे. शिवरायांच्या ख-या पाईकांचे सोडा वंशजाना पण ही टिळाधारी जमात जुमाणत नाही.
खडके साहेब टिळाधारी गद्दार मराठ्याना काय मिळाले ?


३)मिसाळ साहेब तुमचे एकदम बरोबर आहे.
पण खडहे साहेबांना असे वाटत असावे की ज्यांना जेव्हढी माहीती असेल त्यानी ती स्वताकडे न ठेवता ती सोशल मिडीयावर व्हायरल करावी. जेने करून नविन संशोधकाना व नविन पिढीला त्याचा उपयोग होईल.
तुमचेच उदाहरण घ्या तुम्ही गणोजी शिर्कें बाबत किती छान व अभ्यास पुर्ण विश्लेशन केले होते.असे एक एक वैचारीक पुढे आले तर फायदाच होईल !
 

४) खडके साहेबपोस्ट हिट किंवा फ्लॉप ही लाईक वर अवलंबून नसते
उलट ज्या पोस्टला लाईक कमी किंवा प्रतिक्रिया कमी ती पोस्ट हिट समजायला हरकत नसते

प्रवीणदादावर अंतर्गत कुरघोडी मुळे अन्यायच झाला आहे त्यांची कधी इच्छा नव्हती ब्रिगेड सोडायची ते भाजपच्या पण गळाला लागू शकले असते पण त्यांनी शेकाप निवडला


५) मराठा अस्मिता जागी होईल का ?
पुण्याची पाटीलकी झाबंरे पाटलांची किती पुणेरी मराठा झांबरे पाटलाना मान सन्मान देतो ? लाल महाल बांधण्यसाठी झांबरे पाटलांचे काय आणी किती योगदान आहे हे मराठा अस्मितावाल्याना काय माहीत ?
जे लोक लाल महालाला विसरून गेले त्यांनाझांबरे पाटील कधी समजणार ?

अस्मितावाले चव्हाणांचे नाव पण घेणार नाहीत.


६) खडके साहेब,
लाल महालामध्ये शाहीस्ते खानाने तळ ठोकला होता. त्या वेळेस महाराजांची राजधानी राजगडावर होती. महाराज आणी माता जिजाऊ लाल महालात नव्हत्या नोकर चाकर लाल महालाला संभाळत होते. पुणे परगण्यातील सर्वात मोठी वास्तू सात ताळाच्या माडीवर एैशोआराम करत बसल
े नाहीत. महाराज स्वराज्याने झपाटलेले होते. कुटूंबाच्या सुरक्षेसाठी महाराजानी लालमहालाला राजधानी बनवले नव्हते. म्हणून राजे राजगडावरच सुरक्षित होते. २५ वर्षे राजगडावरून स्वराज्याचा राज कारभार पाहीला. स्वकिय मराठा, ब्राम्हण आणी मोगल हे महाराजांचे व स्वराजेयाचे दुष्मन होते. सर्वात जास्त धोका स्वकीय मराठ्यांकडून होता. महाराजाना व माता जिजाऊना स्वराज्यामुळे लाल महालामचे सुख घेता आले नाही. आणी त्या सुखाची दोघा मायलेकरानी कधी आशा बाळगली नाही.
शाहीस्ते खानाने लालमहालाचा कब्जा घेतला. लाल महालाचा कब्जा घेतल्यावर शिवबा लाल महाल सोडवण्यासाठी निश्चित येइल याची शाहीस्ते खानाला खात्री होती. महराज मोठे सैन्य घेऊन येतील असे शाहीस्ते खानाला वाटले होते. पण महाराजाना स्वकीय मराठाची साथ नव्हती. त्याचे महत्वाचे कारणे असे की महाराज एकतर पश्च्छिम महाराष्ट्रातील नव्हते. नव्हते. महाराज मराठवाड्यातील होते. महाराजानी दलीत शोषित पिडीत लोकांच्या सहकार्याने राज्य उभे केले होते. शहाजी महाराजाना मोगलांकडून मिळालेल्या जहागीरीच्या भांडवलावर महाराजानी स्वराज्याची संकल्पना मांडली होती. महाराजानी जहागीरीची तमा न बाळगता स्वराज्य उभे केले होते. संपुर्ण जहागीरी स्वराज्यासाठी बहाल केली होती.
स्वराज्यातील पहीली वास्तू म्हणजे लाल महाल याच लालमहालावर शाहीस्ते खानाने कब्जा केल्यावर महाराजानी निवडक व विस्वासू सैन्य घेऊन लाल महालावर गनिमी काव्याने हल्ला चढवला आणी लालमहालाला पुन्हा ताब्यात घेतला. लालमहालातील घुसखोर शाहीस्तेखान हाकलून देण्यासाठी. राजगड व प्रचंडगडाच्या परीसरातील विस्वासू सैन्य घेऊन लाल महालतील कब्जेखोर शाहीस्तेखान हाकलण्यास यशस्वी ठरले.
लाल महाल संभाळण्यासाठी विस्वासू व मजबुत एकही मराठा पुढे येत नव्हता. लाल महालासाठी स्नराज्य सोडून देता येत नव्हते. काहीतरी पर्याय काढणे आवश्यक होते.
पुणे परगाण्यातील खंड (महसूल) गोळा करणयासाठी कोणाची तरी नियुक्ती करणे आवश्यक होते. म्हणून महाराजानी बाळाजी विश्वनाथ नातू या ब्राम्हणाची कारकुन ( पेशवा) म्हणून नियुक्ती केली.पुणे परगण्यातील खंड(महसूल) गोळा करण्याची व लेखा जोखा ठेवण्याची जबाबदारी दिली. मिळालेल्या खंडातून( महसूल) लालमहाल व परगणयाची सुरक्षा करयची पुणे परगणयाचा खंड स्वराज्यासाठी वापरायचा नाही .असे ठरउन दिल्यामुळे या खंडावर (महसूलावर) पेशवा माजला.
डयरेक्ट बामनाच्या हतात महाल गेल्यासारखे झाले.महाराज व संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर लाल महालावर बामनाचा कब्जा झाला. पेशवाई व लाल महाल सुरक्षित रहावी म्हणून लाल महालाला तट रक्षक भिंत बांधण्यात आली. आणी याच भिंतीला शनिवारवाडा नाव पडले. पेशव्यानी लाल महालाचे शनिवारवाडा असे नामकरण कधीच केले नाही. स्वराज्याच्या वास्तूला शनीग्रहण लागले. अशा कुस्चित भावनेने रयतेकडून पडलेले नाव आहे. नाहीतर दगडाच्या कोरीव शिलावर शनिवारवाडा नाव कोरले असते.
स्वराज्याच्या वास्तूला व स्वराज्याला लागलेला शनी आहे. शनी हा वाईट भावनेचे नाव आहे. कोण आपल्या स्वताच्यां वास्तूला "शनी" " यम" नाव देइल का ?No comments:

Post a Comment