Saturday, November 4, 2017

इतिहासात गणपतीचे अस्तित्व नव्हते याला बाहुबली सारखा सिनेमाही साक्ष आहे.

इतिहासात गणपतीचे अस्तित्व नव्हते याला बाहुबली सारखा सिनेमाही साक्ष आहे.
अस्तित्व फक्त शिवलिंग मंदिराचेच.....!

मी पहिला बाहुबली सिनेमा जेव्हा नवीन आला होता.तेव्हा मी इतिहास म्हणून बघायला गेलो होतो..मला सिनेमा बघायची आवड बिलकुल नाही....पण असे विषयाचे सिनेमा असेल तर मी आवर्जून पाहिला जात असतो.त्यामध्ये बाहुबलीची संगोपन आई शिवलिंगाला आवर्जून पाणी घालायला जात असते...आईचे चे कष्ट पाहून बाहुबलीला अत्यंत दु:ख होते.तो शिवलिंग उचलतो आणि पाण्याच्या झऱ्याखाली ठेऊन आईचे शिवलिंगाला पाणी घालायचे कष्ट कमी करतो....सांगायचे पूर्ण तात्पर्य असे आहे की,इतिहासात कोठेही गणपती दिसत नाही.जेव्हा हे सनातनी यांच्या लक्षात आले की,पहिल्या सिंमेमामध्ये कुठही गणपतीचे अस्तित्व नाही.आता देशात त्यांचे सरकार आहे.दिग्दर्शकाने बाहुबलीचा दुसरा भाग काढणार असे जाहीर केल्यावर त्या दिग्दर्शकाला सनातन्यांनी बोलावून घेतले आणि त्याला सांगितले की,बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात तू गणपतीचे अस्तित्व दाखविले नाही.आता तुला जर दुसरा भाग प्रसारित करायचा असेल तर तुला गणपतीचे अस्तित्व त्या सिनेमात दाखविले पाहिजे.दिग्दर्शक परेशान झाला तो म्हणाला या सिनेमात कोठेही गणपती दाखविता येणार नाही.पण काय करायचे सिनेमा बनवणे त्याचा व्यवसाय आहे.मग त्याने लेखकाला बोलाविले आणि सांगितले की,बाहुबलीच्या दुसऱ्या भागात गणपती दिसावा असा कोणते तरी दृश्य तयार कर तेव्हा त्या लेखकाने ३० ते ४० सेकंदाचे गणपतीचे अस्तित्व दिसावे म्हणून दृश्य तयार केले.ते असे होते की,"पहिल्या बाहुबलीची चुलती जेव्हा डोक्यावर अग्नी घेऊन फेरा करीत असती तेव्हा तो फेरा पूर्ण करण्यासाठी ज्या कोणत्याही अडचणी समोर येतील त्याला न घाबरता तो फेरा पूर्ण करायचा पण त्याच वेळेस एक हत्ती पिसाळतो आणि अग्नी घेतलेल्या चुलातीकडे धावून येतो तेव्हा तिच्या आजू बाजूचे लोक इकडे तिकडे घाबरून पळत असतात.तेव्हा बाहुबली एक रथ ओढून आणतो आणि तो त्या हत्तीच्या समोर उभा करतो पिसाळलेला हत्ती त्या रथाच्या वर बघतो तर काय गणपतीची मूर्ती पाहतो आणि तेथून पळ काढतो.आणि तिचा फेरा पूर्ण होतो" असे बळजबरीने घुसाविलेले अस्तित्व आहे.त्यामुळे इतिहासात गणपतीचे अस्तित्व नव्हते याला बाहुबली सारखा सिनेमाही साक्ष आहे

No comments:

Post a Comment