Friday, November 3, 2017

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळ्यांना निळा झेंडा हातात घेऊन राजेश खडके यांच्या नेतृत्वात जाहीर पाठींबा देण्यात आला होता....!

संभाजी ब्रिगेडचे ७२ मावळ्यांना निळा झेंडा हातात घेऊन राजेश खडके यांच्या नेतृत्वात जाहीर पाठींबा देण्यात आला होता....!
भगवा ध्वज “विचार” तर निळा ध्वज “संघर्ष”


पुरुषोत्तम खेडेकर साहेब कार्यकारी अभियंता असताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर आभ्यास करीत होते. छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करून त्यांचेवर कसा अन्याय झाला याबाबत ते मराठा समाजाचे आपल्या कार्यलयातून आपल्या घरून प्रबोधन करीत होते.त्यांचे बरोबर अधून मधून प्रवीण गायकवाड असायचे माझी खेडेकर साहेबांच्या कार्यालयात नेहमी भेट होत असायची....त्यांनी मराठा सेवा संघ स्थापन केला होता.मनुवादी विचारांनी कसे आपले वाटोळे केले ते याबाबत मराठा समाजाला समजावून सांगत असत.फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले स्वराज्य कसे एकच आहे ह्याबाबत मराठा समाजाचे ते प्रबोधन करायचे.तुळापुर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचेवर वैदिक धर्म पंडितांनी मनुस्मृती प्रमाणे शिक्षा दिली याची पूर्ण सत्य बाब ते उघड करीत असायचे.याच समाधी स्थळाला साक्ष ठेऊन त्यानी संभाजी ब्रिगेड नावाची संघटना स्थापन केली होती....त्याचा मी एक साक्षीदार आहे.
        दलित पॅन्थरचे राम डंबाळे आणि मी (राजेश खडके) एकत्र येऊन निळ्या झेंड्याच्या सन्मानासाठी काम करणारे कार्यकर्ते यांचा सत्कार करून त्यांना मान देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी “भिमसेवा प्रतिष्टान” या संस्थेची स्थापना केली होती.दलित समाजातील अन्याय ग्रस्तांना न्याय देण्यासाठी राम डंबाळे आणि मी (राजेश खडके) तसेच रतन जगताप आम्ही एकत्र येऊन “रिपब्लिकन युवा मोर्चा” या सामजिक संघटनेची २००२ मध्ये स्थापना केली होती.नंतरच्या काळात राम डंबाळे याचा लहान भाऊ राहुल याला आम्ही “रिपब्लिकन युवा मोर्चा” या संघटनेचे नेतृत्व सोपविले.संघटनेची बरीच सामजिक विषयावर आंदोलने झाली.मुख्यमंत्री यांची गाडी अडविणे त्यांना अत्याचारी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान करणे,तोरणागडाच्या पायथ्याशी वेल्हे गावात असणारे समाज मंदिरावर हल्ला झाला होता.त्यावेळी ३००० समुदायाच्या मोर्चाच्या जबाबदारी मी (राजेश खडके) घेतली होती.संपूर्ण बहुजन समाज आमच्यावर विश्वास करीत होता.आम्ही एका मोर्चाची तयारी करीत होतो त्यावेळी चर्चा सुरु असताना मला एक फोन आला की,छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो संभाजी ब्रिगेड झिंदाबाद संभाजी ब्रिगेड या संघटनेने भांडारकर इतिहास संशोधन मंडळाची तोडफोड केली.मी अत्यंत आनंदित झालो.जेम्स लेन या लेखकाने माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी त्याने लेखन केलेले पुस्तक “द हिंदू किंग इस्लामिक इंडिया” यामध्ये केले होते.त्याला याच भांडारकर इतिहास संशोधन मंडळातीचे सदस्य असणारे १२ वैदिक धर्म पंडितांनी मदत केली होती....त्याचा निषेध म्हणून भांडारकर इतिहास संशोधन मंडळाची तोडफोड करण्यात आली होती....त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या घरावर हल्ला होण्याची भीती निर्माण झाली होती.....परंतु हल्ला हा मनुवादी विचारावर हल्ला होता...त्यामुळे फुले शाहू आंबेडकर चळवळ निळा झेंडा घेऊन त्यांना पाठींबा देण्यासाठी उभी राहिली होती....मी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून २५० दलित कार्यकर्ते निळा झेंडा घेऊन त्या संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यानी इतिहास घडविला म्हणून त्यांना पाठींबा द्यायला गेलो होतो.

No comments:

Post a Comment